Balbharti Maharashtra State Board Class 5 Marathi Solutions Sulabhbharati Chapter 11 इंधनबचत Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

5th Standard Marathi Digest Chapter 11 इंधनबचत Textbook Questions and Answers

1. एका वाक्यात उत्तरे लिहा.

प्रश्न (अ)
हा संवाद कोठे झाला?
उत्तरः
हा संवाद स्वयंपाकघरात झाला.

प्रश्न (आ)
संवादात किती पात्रे आहेत?
उत्तरः
या संवादात दोन पात्रे आहेत.

प्रश्न (इ)
दिनूला कशाचे महत्त्व पटले?
उत्तरः
दिनूच्या इंधन बचतीचे महत्त्व पटले.

2. खालील चित्रे पाहा त्याखालील वाक्ये वाचा. इंधन बचतीचे आणखी मार्ग सांगा.

प्रश्न 1.
खालील चित्रे पाहा त्याखालील वाक्ये वाचा. इंधन बचतीचे आणखी मार्ग सांगा.



उत्तर:
इंधन बचतीचे मार्गः

3. खालील साधने ओळखा. ही साधने वापरण्यासाठी कोणते इंधन लागते? यांपैकी कोणते साधन वापरल्यामुळे सर्वांत जास्त इंधनबचत होते ते घरी चर्चा करून सांगा.

प्रश्न 1.
खालील साधने ओळखा. ही साधने वापरण्यासाठी कोणते इंधन लागते? यांपैकी कोणते साधन वापरल्यामुळे सर्वांत जास्त इंधनबचत होते ते घरी चर्चा करून सांगा.


उत्तर:
यांपैकी सौरपेटी व बायोगॅस संयंत्र वापरल्यास सर्वात जास्त इंधन बचत होते.

वाचू आणि हसू.


सनी: आई, बाढदिवसाला मी तुला आरसा देणार आहे.
आई: अरे सनी, पण आपल्याकडे आहे ना आरसा!
सनी: अगं आई, तो मघाशीच माझ्याकडून फुटला ना!

Marathi Sulabhbharati Class 5 Solutions Chapter 11 इंधनबचत Additional Important Questions and Answers

प्रश्न 1.
खालील प्रश्नांची उत्तरे एका शब्दात लिहा.

उत्तरः

1. खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा.

प्रश्न 1.
कोणाची आई आजारी होती?
उत्तरः
दिनूची आई आजारी होती.

प्रश्न 2.
दिनू आईसाठी काय बनवत होता?
उत्तरः
दिनू आईसाठी चहा बनवत होता.

प्रश्न 3.
दिनूच्या वर्गमैत्रिणीचे नाव काय होते?
उत्तरः
दिनूच्या वर्गमैत्रिणीचे नाव फातिमा होते.

प्रश्न 4.
फातिमाने कशासाठी नकार दिला?
उत्तरः
फातिमाने चहा घेण्यासाठी नकार दिला.

प्रश्न 5.
योग्य गोष्टींसमोर (✓) अशी खूण व अयोग्य गोष्टींसमोर (✗) अशी खूण करा.
उत्तरः

प्रश्न 6.
खालील चित्रे पहा व योग्य जोड्या लावा.


उत्तरः
(1 – क) (2 – ड) (3 – ब) (4 – अ)

थोडक्यात उत्तरे लिहा.

प्रश्न 1.
फातिमाने दिनूला इंधनाची बचत कशी करायला सांगितली?
उत्तरः
एक कप चहासाठी जर मोठ्या पातेल्याऐवजी लहान पातेले घेतले तर पाणी लवकर उकळते आणि गॅसचीही बचत होते, चहाही लवकर होतो, असे म्हणून फातिमाने दिनूला इंधनाची बचत करायला सांगितली.

प्रश्न 2.
तुमची आई घरात इंधनाची बचत कशाप्रकारे करते ते लिहा.
उत्तरः
आई वरण भात करताना प्रेशर कुकरचा वापर करते. भाजी शिजवताना भांड्यावर झाकण ठेवून त्यावर पाणी ठेवते. उगाचच गॅस चालू ठेवत नाही. बाहेर जाताना व रात्री झोपताना गॅसच्या सिलेंडरचे बटण बंद करते.

व्याकरण व भाषाभ्यास:

प्रश्न 1.
समानार्थी शब्द लिहा.

उत्तर:

प्रश्न 2.
विरुद्धार्थी शब्द लिहा.

उत्तर:

प्रश्न 3.
वचन बदला.

उत्तर:

प्रश्न 4.
लिंग बदला.

उत्तर:

पाठ्यपरिचय:

‘इंधन बचत’ या पाठात दिनूची वर्गमैत्रीण फातिमा त्याला इंधनबचतीचे महत्त्व व इंधनाची बचत कशाप्रकारे करायची ते समजावून सांगत आहे.

शब्दार्थ: