Balbharti Maharashtra State Board Class 5 Marathi Solutions Sulabhbharati Chapter 26 पतंग Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

5th Standard Marathi Digest Chapter 26 पतंग Textbook Questions and Answers

1. एका वाक्यात उत्तरे लिहा.

प्रश्न (अ)
सूर्य मावळण्याच्या वेळेस ढगांवर कोणता रंग दिसतो?
उत्तरः
सूर्य मावळण्याच्या वेळेस ढगांवर लाल पिवळसर रंग दिसतो.

प्रश्न (आ)
पतंग कोणासारखे तरंगतात?
उत्तर:
आभाळात पंख पसरून उडणाऱ्या पाखरांप्रमाणे पतंग तरंगतात.

2. विरुद्ध अर्थाचे शब्द माहीत करून घ्या. लिहा.

प्रश्न 1.
विरुद्ध अर्थाचे शब्द माहीत करून घ्या. लिहा.
(अ) चढणे
(आ) ओढणे
(इ) मावळणे
(ई) मऊ
(उ) चांगला
(ऊ) भराभर
उत्तर:
(अ) उतरणे
(२) ढकलणे
(इ) उगवणे
(ई) कडक
(उ) वाईट
(ऊ) हळूहळू

3. खालील शब्दांना ‘सर’ शब्द जोडून नवीन शब्द तयार करा व लिहा.

प्रश्न 1.
खालील शब्दांना ‘सर’ शब्द जोडून नवीन शब्द तयार करा.
उदा., पिवळा – पिवळसर.

उत्तर:

4. मोकळ्या जागी कवितेतील योग्य शब्द लिहा व या कडव्याचा अर्थ समजून घ्या.

1. जशी ……………… आभाळात,
…………………….. पसरुनी तरंगतात,
दिसतिल तैसे ……………….. रंगित,
खेळ किती …………….!
उत्तर:
1. पाखरे, पंख, पतंग, चांगला

5. तुम्हांला आवडणाऱ्या पाच खेळांची नावे सांगा.

प्रश्न 1.
तुम्हांला आवडणाऱ्या पाच खेळांची नावे सांगा.
उत्तरः

6. हे शब्द असेच लिहा.

प्रश्न 1.
हे शब्द असेच लिहा.
झुळझुळ, रीळ, पिवळसर, पतंग, रंगित.

7. खालील शब्द वाचा. असे आणखी शब्द लिहा.

प्रश्न 1.
खालील शब्द वाचा. असे आणखी शब्द लिहा.
(अ) पळापळ, रडारड, पडापड़,
(अ) मऊमऊ, वरवर, कळकळ,
(इ) रडतखडत, हसतखेळत, वाजतगाजत,
उत्तरः
(अ) धडाधड, पटापट
(आ) कटकट, झुळूझुळू, फडफड, सरसर, करकर
(इ) अटकमटक, पडतसडत

8. समान अक्षराने शेवट होणारे कवितेतील शब्द लिहा.

प्रश्न 1.
समान अक्षराने शेवट होणारे कवितेतील शब्द लिहा.
उत्तरः
(अ) मावळतीचा – मजेचा
(अ) रोवूनी – ओढुनि, चढुनी
(इ) बरोबर – भराभर
(ई) आभाळात – तरंगतात

9. गोलातील शब्द जोडून वाक्ये बनवा.

प्रश्न 1.
गोलातील शब्द जोडून वाक्ये बनवा.
उदा., चेंडू झेलणे.
वाक्ये: 1. मी चेंडू झेलतो.
2. शिवानी चेंडू झेलते.


उत्तरः

वाचा. लक्षात ठेवा:

घराच्या छतावर उभे राहून पतंग उडवू नका. मोकळ्या मैदानात पतंग उडवा. काटलेला पतंग पकडण्यासाठी रस्त्यावर धावू नका. अवघड ठिकाणी चढू नका.

Marathi Sulabhbharati Class 5 Solutions Chapter 26 पतंग Additional Important Questions and Answers

प्रश्न 1.
एका शब्दात उत्तरे लिहा.

उत्तरः

एका वाक्यात उत्तरे लिहा.

प्रश्न 1.
नदीकाठचा वारा कसा वाहतो आहे?
उत्तर:
नदीकाठचा वारा झुळझुळ वाहतो आहे.

प्रश्न 2.
नदीकाठच्या बाजूला काय आहे?
उत्तर:
नदीकाठच्या बाजूला डोंगरमळा आहे.

प्रश्न 3.
पतंग कोणाला भेटायला जात आहे?
उत्तर:
पतंग ढगांना भेटायला जात आहे.

प्रश्न 4.
पतंगाला कोणती उपमा दिली आहे?
उत्तर:
पतंगाला उडणाऱ्या पाखरांची उपमा दिली आहे.

प्रश्न 5.
‘पतंग’ या कवितेचे कवी कोण आहेत?
उत्तर:
पतंग’ या कवितेचे कवी ‘अ. ज्ञा. पुराणिक’ आहेत.

कविता पूर्ण करा.

प्रश्न 1.
रंग ढगांवर ……………………… डोंगरमळा
उत्तर:
रंग ढगांवर मावळतीचा,
लाल पिवळसर किती मजेचा,
झुळझुळ वारा नदीकाठचा.
बाजुस डोंगरमळा.

प्रश्न 2.
करू चला ……………. भेटायला
उत्तर:
करू चला सुरवात बरोबर,
सोडा सोडा रीळ भराभर,
पतंग चढवा हे वाऱ्यावर
ढगांस भेटायला.

प्रश्न 3.
खालील शब्दांना कवितेत कोणते शब्द आले आहेत ते सांगा.
उत्तरः

प्रश्न 4.
रिकाम्या जागी कवितेतील योग्य शब्द लिहा.
मउमउ ………………. पाय रोवुनी,
……………………. झटका दोरा ओढुनि,
………………….. जातिल वर वर चढुनी,
पंख नको ………………………………
उत्तर:
वाळुत, देऊ, पतंग, त्याजला

व्याकरण व भाषाभ्यास:

प्रश्न 1.
समानार्थी शब्द लिहा.

उत्तरः

प्रश्न 2.
विरुद्धार्थी शब्द लिहा.

उत्तर:

प्रश्न 3.
खाली एक षट्कोन दिला आहे. षट्कोनाच्या मधोमध एक शब्द दिला आहे व बाहेर त्या शब्दाशी संबंधित क्रियापदे दिली आहेत. त्या क्रियापदाचे योग्य रूप वापरून व गोलातील शब्द वापरून वाक्य बनवा.


उत्तर:

प्रश्न 4.
‘प’ या अक्षरापासून तयार होणारे शब्द लिहा.
उत्तर:
पतंग, पंगत, परात, पगार, पवन, पक्षी, पर्वत

पदयपरिचय:

‘पतंग’ या कवितेत पतंग उडवण्याच्या खेळाचे रंजक वर्णन कवीने केले आहे. मुलांना हा खेळ खेळताना आलेला अनुभव कवीने वर्णन केला आहे.

शब्दार्थ: