Balbharti Maharashtra State Board Class 6 Marathi Solutions Sulabhbharati Chapter 12 चंद्रावरची शाळा Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Marathi Sulabhbharti Class 6 Solutions Chapter 12 चंद्रावरची शाळा Textbook Questions and Answers

1. एका वाक्यात उत्तर लिहा.

प्रश्न अ.
चंद्रावरती शाळा कोणत्या शतकात भरेल ?
उत्तर:
चंद्रावरती शाळा एकविसाव्या शतकात भरेल.

प्रश्न आ.
चंद्रावरच्या शाळेत जाताना कशाचे ओझे नसेल?
उत्तर:
चंद्रावरच्या शाळेत जाताना दप्तराचे ओझे नसेल.

प्रश्न इ.
चंद्रावरच्या शाळेत कशाची कटकट राहणार नाही ?
उत्तर:
चंद्रावरच्या शाळेत भाजी पोळीच्या डब्याची कटकट राहणार नाही.

प्रश्न ई.
चंद्रावरच्या शाळेत अभ्यास कसा करावा लागेल?
उत्तर:
चंद्रावरच्या शाळेत फक्त बटणे दाबायचाच अभ्यास करावा लागेल.

2. दोन-तीन वाक्यात उत्तरे लिहा.

प्रश्न अ.
चंद्रावरच्या शाळेत पास केव्हा केले जाते?
उत्तर:
चंद्रावरच्या शाळेत खडू व फळा नाही. दप्तराचे ओझे मुलांच्या पाठीवर नाही. बटणे दाबायची एवढाच फक्त तिथे अभ्यास असतो. बटणे दाबून अभ्यास केला की तिथेच पास केले जाते.

प्रश्न आ.
चंद्रावरच्या शाळेत चांदण्यांशीच का खेळावे लागणार आहे?
उत्तर:
शाळेत गेल्यावर जसे खेळाचे साहित्य असते, खेळण्यासाठी मैदान असते. त्याप्रमाणे चंद्रावर कोणत्याही प्रकारचे खेळाचे साहित्य नसणार. तेथे फक्त चांदण्याच काय त्या खेळण्यासाठी उपलब्ध असणार म्हणून चंद्रावरच्या शाळेत मुलांना चांदण्यांशीच खेळावे लागणार आहे.

3. योग्य कारण शोधून उत्तर लिहा.

प्रश्न 1.
चंद्रावरच्या शाळेत जाताना ऑक्सिजनचा सिलिंडर न्यावा लागेल कारण ………………….
(अ) दप्तराऐवजी सिलिंडर न्यावा हा नियम असल्यामुळे.
(आ) चंद्रावरती प्राणवायूचे प्रमाण कमी असल्यामुळे.
(इ) सिलिंडर नेला तर शाळेत येऊ देतात म्हणून.
उत्तर:
(आ) चंद्रावरती प्राणवायूचे प्रमाण कमी असल्यामुळे.

प्रश्न 2.
चंद्रावर एक उडी मारताच तरंगत राहतात कारण ……………………
(अ) शिक्षक अशीच पी.टी. शिकवतात.
(आ) विदयार्थ्याचे वजन कमी असते म्हणून तरंगतात.
(इ) चंद्रावर गेल्यावर गुरुत्वाकर्षण कमी होते म्हणून तरंगतात.
उत्तर:
(इ) चंद्रावर गेल्यावर गुरुत्वाकर्षण कमी होते म्हणून तरंगतात.

4. शब्दातील शेवटचे अक्षर सारखे येणारे शब्द कवितेतून शोधा व लिहा.

प्रश्न 1.
शब्दातील शेवटचे अक्षर सारखे येणारे शब्द कवितेतून शोधा व लिहा. उदा., भरेल – नसेल
उत्तर:

5. ‘पटपट’ यासारखे शब्द लिहा.

प्रश्न 1.
‘पटपट’ यासारखे शब्द लिहा.
उत्तर:

6. कवितेत आलेले इंग्रजी शब्द शोधून यादी करा.

प्रश्न 1.
कवितेत आलेले इंग्रजी शब्द शोधून यादी करा.
उत्तर:

7. तुम्ही डब्यात रोज कोणकोणते पदार्थ नेता? त्याची नावे लिहा.

प्रश्न 1.
तुम्ही डब्यात रोज कोणकोणते पदार्थ नेता? त्याची नावे लिहा.
उत्तर:

8. कोणते पदार्थ डब्यात आणायचे नाहीत असे शिक्षक तुम्हाला वारंवार सांगतात? का ते लिहा.

प्रश्न 1.
कोणते पदार्थ डब्यात आणायचे नाहीत असे शिक्षक तुम्हाला वारंवार सांगतात? का ते लिहा.
उत्तर:
तिखट, चमचमीत पदार्थ खाऊ नका, असे शिक्षक नेहमी सांगत असतात. कारण तिखट व चमचमीत पदार्थ खाल्ले की, आपली प्रकृती बिघडते. अपचन होणे, ढेकर येणे यासारखे आजार होतात. मग शाळेत आपली अनुपस्थिती होते. आपण शाळेत गैरहजर राहतो. मग त्याचा परिणाम अभ्यासावर होतो. तेव्हा आपण शाळेत वडापाव, समोसे वगैरे सारखे पदार्थ आणू नयेत असे शिक्षक नेहमी सांगत असतात.

9. चंद्रावरच्या शाळेत तुम्ही शिकत आहात. तुम्हाला ‘पृथ्वीचे वर्णन करायला सांगितले आहे. कल्पना करा व लिहा.

प्रश्न 1.
उपक्रम: चंद्रावरच्या शाळेचे चित्र तुमच्या कल्पनेने काढून रंगवा.
प्रकल्प: चंद्रावरच्या पाच कविता मिळवा व संग्रह करा.
उत्तर:
चंद्रावरच्या शाळेत कोणत्याही सुख-सुविधा नसणार आहेत. त्या सर्व पृथ्वीवरील शाळेतच असतात. या सर्व सुविधा
पृथ्वीवरच्या शाळेत असणे याचे कारण पृथ्वीवरचा अजब, सुंदर, रमणीय व विलोभनीय परिसर होय. पृथ्वीवरचा निसर्ग आहेच असा! तिथे वाहणारी थंड, शीतल हवा आहे, पाणी आहे. मोकळा सूर्यप्रकाश आहे. त्यामुळे चंद्रापेक्षा पृथ्वीवर सजीव सृष्टीला अतिशय पोषक असेच वातावरण असल्यामुळे पृथ्वी कशी नव्या नवरीने हिरवा शालू नेसून सजून यावी अशीच वाटते. त्यामुळे मला चंद्रावरच्या शाळेपेक्षा पृथ्वीवरच्या शाळेतच शिकायला खूप आवडेल.

प्रश्न 2.
खालील वाक्ये वाचा.

प्रश्न अ.
गणेश आईला म्हणाला मी कधीही चुकीचे वागणार नाही.
उत्तर:
गणेश आईला म्हणाला, “मी कधीही चुकीचे वागणार नाही.”

प्रश्न आ.
ताई दादाला म्हणाली मला उदया शाळेला सोडशील का? बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द दाखवण्याकरता ” – ” असे दुहेरी अवतरणचिन्ह वापरले जाते.
उत्तर:
ताई दादाला म्हणाली, “मला उदया शाळेला सोडशील का?”

Class 6 Marathi Chapter 12 चंद्रावरची शाळा Additional Important Questions and Answers

खाली दिलेल्या कवितेच्या ओळी पूर्ण करा.

प्रश्न 1.
एकविसाव्या शतकात भरेल …………………
………………… खडू आणि फळा
उत्तर:
चंद्रावरती शाळा, चंद्रावरच्या शाळेत नसेल

प्रश्न 2.
पी.टी. चा तास
……………….. तसेच तरंगत रहाल.
उत्तर:
कसा होतो ते पहाल, एक उडी मारताच

प्रश्न 3.
अशी असेल भारी ………………….
……………………. चांदण्यांशीच खेळा.
उत्तर:
चंद्रावरची शाळा, चंद्रावरच्या शाळेत फक्त

खालील प्रश्नांची एक-दोन वाक्यांत उत्तरे लिहा.

प्रश्न 1.
चंद्रावरच्या शाळेत कोणत्या गोष्टी नसणार आहेत?
उत्तर:
चंद्रावरच्या शाळेत ‘खडू’ आणि ‘फळा’ या दोन गोष्टी नसणार आहेत.

प्रश्न 2.
चंद्रावरती मुले कशातून शाळेत जाणार आहेत?
उत्तर:
चंद्रावरती मुले छोट्या छोट्या यानांतून शाळेत जाणार आहेत.

प्रश्न 3.
शाळेचे दार कधी खुले होईल?
उत्तर:
बटण दाबताच शाळेचे दार खुले होईल.

प्रश्न 4.
पी.टी.च्या तासाला काय होईल?
उत्तर:
पी.टीच्या तासाला एक उडी मारताच मुले तशीच तरंगत राहतील.

प्रश्न 5.
चंद्रावरच्या शाळेत फक्त कोणासोबत खेळता येईल?
उत्तर:
चंद्रावरच्या शाळेत फक्त चांदण्यांशीच खेळता येईल.

प्रश्न 6.
‘चंद्रावरची शाळा’ या कवितेच्या कवयित्रीचे नाव काय आहे?
उत्तर:
‘चंद्रावरची शाळा’ या कवितेच्या कवयित्रीचे नाव ‘चारूता पेंढरकर’ आहे.

खालील प्रश्नांची दोन-तीन वाक्यात उत्तरे लिहा.

प्रश्न 1.
चंद्रावरच्या शाळेत कोणकोणत्या गोष्टी नसणार आहेत?
उत्तर:
चंद्रावरच्या शाळेत खडू आणि फळा नसणार आहे. तेथील शाळेच्या दारांना कडी व कुलूप नसणार आहे. मुलांच्या पाठीवर दप्तराचे ओझे नसणार आहे. भाजी-पोळीच्या डब्याची कटकट तेथे नसणार आहे. तेथे तासन् तास बसून करण्याचा अभ्यास नसणार आहे. तेथील शाळेत कोणत्याच प्रकारची
खेळाची साधनं नसणार आहेत.

व्याकरण व भाषाभ्यास.

प्रश्न 1.
खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा.

उत्तरः

खालील वाक्यांत दुहेरी अवतरण चिन्हांचा वापर करून लिहा.

प्रश्न 1.
मला माहीत नाही बाळ आई म्हणायची.
उत्तर:
“मला माहीत नाही बाळ.” आई म्हणायची.

काव्यपरिचयः

एकविसावे शतक हे विज्ञानाचे शतक म्हणून ओळखले जाते. या शतकात विज्ञानाने खूप प्रगती केली व माणूस चंद्रावरती जाऊन पोहोचला. शाळेतील मुलांनासुद्धा चंद्राविषयी माहिती मिळाली. परंतु चंद्रावरच्या शाळेत कोणत्या गोष्टी नसतील याचे सुंदर वर्णन या कवितेत कवयित्रीने केले आहे. व चंद्रावरची व पृथ्वीवरच्या शाळेची तुलना केली आहे.

शब्दार्थ: