Balbharti Maharashtra State Board Class 7 Marathi Solutions Sulabhbharati Chapter 11.1 लेक Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Marathi Sulabhbharti Class 7 Solutions Chapter 11.1 लेक Textbook Questions and Answers

खालील प्रश्नांची एक-दोन वाक्यांत उत्तरे लिहा.

प्रश्न 1.
लेक घरात नसताना कवयित्रीची अवस्था कशी होते?
उत्तर:
लेक घरात नसताना कवयित्रीच्या उरास लेकीची आस उदास होते.

प्रश्न 2.
कवयित्रीने लेकीला बोलकी चिमणी का म्हटले आहे?
उत्तर:
लेक चिमणीप्रमाणे घरात सतत चिवचिवत राहते म्हणजे बोलत राहते, हसत राहते, म्हणून कवयित्रीने लेकीला बोलकी चिमणी म्हटले आहे.

प्रश्न 3.
कवितेतील लेक केव्हा रुसून बसते?
उत्तर:
कवितेतील लेक थोडे रागावले तरी रुसून बसते.

2. खालील आकृती पूर्ण करा.


प्रश्न 1.
खालील आकृती पूर्ण करा.


उत्तरः

3. तुमची लाडकी ताई घरात नसली, तर तुम्हांला काय वाटते?

प्रश्न 1.
तुमची लाडकी ताई घरात नसली, तर तुम्हांला काय वाटते?
उत्तरः
माझी ताई घरात नसली की मला काही काळापुरते दटावणारे कोणी नाही हे पाहून आनंद होतो. पण काही वेळातच एकटेपणाची जाणीव होऊ लागते. हक्काने कामे सांगण्यासाठी, खोड्या काढण्यासाठी ताई हवी असते. अभ्यासातही तिची फार मदत होते. ताई घरात नसली की सुने-सुने वाटते.

4. पाठ क्रमांक 1 ते पाठ क्रमांक 22 यामध्ये आलेल्या नवीन शब्दांची शब्दकोशाप्रमाणे मांडणी करा.

प्रश्न 1.
पाठ क्रमांक 1 ते पाठ क्रमांक 22 यामध्ये आलेल्या नवीन शब्दांची शब्दकोशाप्रमाणे मांडणी करा.

खेळूया शब्दांशी.

प्रश्न अ.
कवितेतील शेवट समान असणारे शब्द लिहा.
उदा. कुंदन – गोंदन
उत्तरः

वाचा.

आई म्हणते माझा छावा,
बाबांचा मी बोलका रावा,
ताई म्हणते मला राजा,
तिच्याशी खेळताना येते मजा.

आजोबांचा मी गुणांचा ठेवा,
आजी करते माझी वाहवा,
धावून करतो कामे चार,
सर्वांचा मी लाडका फार.

मुलगा-मुलगी एकसमान, दोघांनाही दया सन्मान.

प्रश्न 1.
मुलगा-मुलगी एकसमान, दोघांनाही दया सन्मान.

भाषेची गंमत पाहूया.

प्रश्न 1.
मराठी विलोमपद म्हणजे असे वाक्य जे उलटे वाचले तरी अगदी तसेच असते.
उदा.,

तुम्हीही अशा प्रकारची वाक्ये तयार करून लिहा. पाहा कशी गंमत येते.

प्रश्न 2.
खालील चित्रे पाहून आपल्या भावना व्यक्त करणारी वाक्ये लिहा.


उत्तरः

वाचा. समजून घ्या.

आपल्या मनात जितक्या प्रकारच्या भावना असतात, तितके केवलप्रयोगी अव्ययाचे प्रकार असतात. या विविध भावना व त्या भावना व्यक्त करणारे शब्द खालील तक्त्यात दिले आहेत.

Class 7 Marathi Chapter 11.1 लेक Additional Important Questions and Answers

एका वाक्यात उत्तरे लिहा.

प्रश्न 1.
लेखिकेच्या मते, उरास’ आसकेव्हा लागते?
उत्तरः
लेखिकेच्या मते, लेक घरात नसली की उरास आस लागते.

प्रश्न 2.
मनाची काळजी केव्हां मिटणार आहे?
उत्तर:
लेक असली की मनाची काळजी मिटणार आहे.

प्रश्न 3.
वेळ जागीच थांबते, असे लेखिका केव्हा म्हणते?
उत्तर:
लेक घरात नसल्यावर, उरास आस लागते आणि वेळ जागीच थांबते, असे लेखिका म्हणते.

प्रश्न 4.
कोण रुसले तरी पर्वा करू नये?
उत्तरः
सारे जगही रुसले तरी पर्वा करू नये.

प्रश्न 5.
निसर्गाची भाषा फक्त कोणाला कळते?
उत्तर:
निसर्गाची भाषा फक्त लेकीला कळते.

कवितेच्या ओळी पूर्ण करा.

प्रश्न 1.
1. लेक असता मनाची, ……………………
……………………………., रोज समई पेटते.
2. अशी चिमणी बोलकी, …………………..
…………………………….., मग रुसून बसते.
3. फक्त लेकीला कळते, …………………….
काळ्या रात्रीला लागते, ………………………..
उत्तरः
1. लेक असता मनाची, सारी काळजी मिटते,
लेक असता घराची, रोज समई पेटते.
2. अशी चिमणी बोलकी, साऱ्या घरात हसते,
थोडे रागावले तर, मग रुसून बसते.
3. फक्त लेकीला कळते, अरे निसर्गाची भाषा,
काळ्या रात्रीला लागते, कशी सकाळची आशा.

प्रश्न 2.
जोड्या जुळवा.

‘अ’ गट ‘ब’ गट
1. तांबडं अ. गोंदण
2. हिरवं ब. कुंदन
3. हाडाचं क. पालवी
4. झाडाची ड. चंदन

उत्तरः

‘अ’ गट ‘ब’ गट
1. तांबडं ब. कुंदन
2. हिरवं अ. गोंदण
3. हाडाचं ड. चंदन
4. झाडाची क. पालवी

खालील प्रश्नांची एक-दोन वाक्यांत उत्तरे लिहा.

प्रश्न 1.
लेकीसाठी कोणती विशेषणे वापरली आहेत?
उत्तरः
लेकीसाठी तांबडं कुंदन, हिरवं गोंदण, झाडाची पालवी, हाडाचं चंदन, बोलकी चिमणी अशी विशेषणे वापरली आहेत.

प्रश्न 2.
लेक रुसू नये, असे कवयित्रीला का वाटते?
उत्तरः
सारे जग रुसले तरी पर्वा न करणाऱ्या कवयित्रीला आपली लेक कधी रुसू नये, असे वाटते कारण तिच्या रुसण्याने घरासही एक उदासीनता येते.

पुढील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.

कृती 1: आकलन कृती

प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा.

2. एका शब्दात उत्तरे दया.

1. लेक घरात असताना काय पेटते? [ ]
2. काळ्या रात्रीला कशाची आशा लागते? [ ]
उत्तर:
1. समई
2. सकाळची

कविता – पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक 40 लेक तांबडं कुंदन

लेक तांबडं कुंदन …………………….
………………. कशी सकाळची आशा.

कृती 2: आकलन कृती

रिकाम्या जागी कंसातील योग्य शब्द लिहा.

प्रश्न 1.
1. अशी ……………… बोलकी, साऱ्या घरात हसते. (चिमणी / ताई)
2. लेक असता घराची, रोज …………………. पेटते. (चूल / समई)
3. पण आपली ……………., कधी कधी रूसू नये. (पाकळी / छकुली)
उत्तर:
1. समई
2. चिमणी
3. पाकळी

2. खालील प्रश्नांची एक – दोन वाक्यांत उत्तरे लिहा.

प्रश्न 1.
लेक घरी असताना काय होते?
उत्तर:
लेक घरी असताना मनाची सारी काळजी मिटते. घरात नियमित समई पेटते.

प्रश्न 2.
लेकीला काय कळते?
उत्तर:
लेकीला निसर्गाची भाषा कळते.

कृती 3: काव्यसौंदर्य

प्रश्न 1.
‘सारे जगही रुसले, तरी पर्वा करू नये,
पण आपली पाकळी, कधी कधी रुसू नये’.
वरील ओळींतील आशय स्पष्ट करा.
उत्तरे:
कवयित्री अस्मिता जोगदंड यांनी ‘लेक’ या कवितेत मुलीचे घरात असणे किती आनंददायी असते हे मांडले आहे. घरातील लेकीच्या असण्याचे महत्त्व सांगताना त्या म्हणतात; माझ्यावर सारे जग नाराज झाले तरी चालेल, मी त्याची काळजी करणार नाही. मात्र माझी मुलगी, चिमुकल्या पाकळीसारखी लेक कधीही रुसू नये. लेकीची माया प्रस्तुत काव्यपंक्तीतून दिसून येते.

व्याकरण व भाषाभ्यास

प्रश्न 1.
खालील शब्दांना समानार्थी शब्द लिहा.

उत्तर:

प्रश्न 2.
खालील शब्दांचे वचन बदला.

उत्तर:

प्रश्न 3.
खालील शब्दांचे लिंग बदला.
1. लेक
2. चिमणी
उत्तरः
1. लेक
2. चिमणा

विलोमपद

व्याख्या: असे वाक्य जे उलटे वाचले तरी तसेच असते, असे वाक्य म्हणजे ‘विलोमपद’ होय.
उदा. :
1. टेप आणा आपटे
2. ती होडी जाडी होती.

काव्य परिचयः

कवयित्री अस्मिता जोगदंड यांनी ‘लेक’ या आपल्या कवितेतून लेकीच्या निरागसपणाचे सुंदर वर्णन केले आहे. लेकीची विविध रूपे सांगतानाच तिच्या अस्तित्वाने सगळे घर हसरे, प्रसन्न व बोलके होत असल्याचे कवयित्री सांगतात. जिच्या हसण्या-रूसण्याने घरात घरपण रहाते अशा लेकीचे सुयोग्य वर्णन म्हणजे प्रस्तुत कविता होय.

Poetess Asmita Jogdand has beautifully narrated the innocence of a daughter through her poem ‘Lek’. A daughter’s presence makes a home happy, cheerful and full of life. Her existence has different shades. Daughter’s smile as well as anger, her presence make home sweet home. This poem has very aptly narrated how a daughter brings happiness to a home and how the entire house withers with her slightest of the sorrows.

कवितेचा भावार्थ:

मुलीच्या निरागसपणाचे, तिच्या घरात असण्याचे महत्त्व नमूद करताना कवयित्री म्हणतात, लेक म्हणजे जणू लाल रत्नाचा खडा, लेक म्हणजे कायम जवळ राहणारे हिरवे गोंदण, लेक म्हणजे झाडाला नुकतीच फुटलेली पालवी तर लेक म्हणजे साऱ्या घरासाठी झिजणारी, घराला सुगंधित करणारी चंदनस्वरूप सदस्य होय. लेक मनात सतत नांदत असते, तिच्या अस्तित्वाने सगळी चिंता दूर होते. लेक घरात असली की रोज समई तेवत असल्याचा भास होतो.

तिच्या असण्याने घर प्रकाशमान होते. लेक घरात नसली की मात्र तिची ओढ लागते. वेळ जागीच थांबल्याचा भास होतो, मन उदास होते. सतत चिमणीसारखी चिवचिवणारी, बोलकी लेक सगळ्या घरात हास्य पसरवते. मात्र तिच्यावर थोडे रागावताच ती रूसून बसते. सारे जग नाराज झाले तरी त्याची पर्वा करावीशी वाटत नाही. मात्र नाजूक पाकळीसारखी लेक आपल्यावर कधीच रूसू नये, असे वाटते. फक्त लेकीलाच निसर्गाची भाषा कळते. ज्याप्रमाणे काळ्या, अंधाऱ्या रात्रीला सकाळची आशा लागते, त्याप्रमाणे लेक जीवन प्रकाशमान करते.

शब्दार्थ:

वाक्प्रचार: