Balbharti Maharashtra State Board Class 7 Marathi Solutions Sulabhbharati Chapter 7.2 आपली समस्या आपले उपाय Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.
Marathi Sulabhbharti Class 7 Solutions Chapter 7.2 आपली समस्या आपले उपाय Textbook Questions and Answers
1. चित्र पाहा. संवाद वाचा.
प्रश्न 1.
नदीचे पाणी कशामुळे प्रदूषित होते?
उत्तर:
शहाराच्या सांडपाण्यामुळे, रासायनिक खतांचा वापर केलेल्या शेतजमिनीतून झिरपणाऱ्या पाण्यामुळे, कारखान्यातील दूषित पाण्यामुळे नदीचे पाणी प्रदूषित होते.
प्रश्न 2.
नदीचे पाणी प्रदूषित होऊ नये, म्हणून काय उपाय करता येतील?
उत्तर:
नदीचे पाणी प्रदूषित होऊ नये म्हणून कारखान्यातील पाणी नदीत सोडू नये. तसेच शहरातील सांडपाणी’ नदीत सोडू नये.
प्रश्न 3.
जलपर्णी उगवल्याने पाण्यावर कोणता परिणाम होतो?
उत्तर:
जलपर्णी उगवल्याने पाणी अशुद्ध होते.
प्रश्न 4.
नदीमध्ये जलपर्णी होऊ नये, यासाठी काय करायला हवे, असे तुम्हांला वाटते?
उत्तर:
नदीमध्ये जलपर्णी होऊ नये यासाठी दूषित पाणी नदीमध्ये सोडू नये.
प्रश्न 5.
नदीतले पाणी का दिसत नव्हते?
उत्तर:
नदीतल्या पाण्यात जलपर्णी उगवल्यामुळे नदीचे पाणी दिसत नव्हते.
प्रश्न 6.
जलपर्णी म्हणजे काय?
उत्तर:
जलपर्णी म्हणजे पाण्यात उगवणारी वनस्पती.
शब्दार्थ:
1. सांडपाणी – मैला (sewage)