Balbharti Maharashtra State Board Class 8 Marathi Solutions Sulabhbharati Chapter 12 शब्दकोश (स्थूलवाचन) Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Marathi Sulabhbharti Class 8 Solutions Chapter 12 शब्दकोश (स्थूलवाचन)Textbook Questions and Answers

प्रश्न 1.
नम्रता, अंबर, आलोक, वरद, वनिता, समीर, शर्वरी, शेखर, समिरा, मानसी, माधवी हे शब्द अकारविल्हे प्रमाणे लावा.
उत्तरः
अंबर, आलोक, नम्रता, माधवी, मानसी, वनिता, वरद, शर्वरी, शेखर, समिरा, समीर.

प्रश्न 2.
तुम्हांला पाठातील एखादया शब्दाचा अर्थ शोधायचा असेल तर यापुढे तुम्ही तो कसा शोधाल? सोदाहरण सांगा.
उत्तरः
अकारविल्हे म्हणजे ‘अ’ या अक्षरापासून लावलेला क्रम होय. उदाहरणार्थः ‘झुळूक’ हा दामोदर कारे यांच्या कवितेतील शब्द शोधायचा असेल तर शब्दांना लागलेले प्रत्यय वगळून मूळचा शब्द शोधू. क्रियापदाचा मूळ धातू कोणता ते पाहू. च, छ, ज, झ या क्रमाने ‘झ’ ने सुरू होणारे शब्द काढून झ च्या बाराखडीत झ, झा, झि, झी, झु पर्यंत येऊन शब्दातील दुसरे अक्षर ‘ळ’ अकारविल्हेनुसार पाहू. अशा त-हेने सरावाने शब्द पहाणे सोपे होईल.

प्रश्न 3.
शब्दकोशाचा तुम्हांला कळलेला उपयोग तुमच्या शब्दांत सांगा.
उत्तरः
शब्दकोशात आपण नवीन शब्दांचे अर्थ पाहू शकतो. त्यात प्रमाण उच्चार असतात. तेही आपणास कळतात. एकाच शब्दाचे अनेक अर्थ असतात. संदर्भानुसार कोणता अर्थ घेणे उचित आहे ते कळू शकते. काही शब्दांचे अर्थ लिहून ही संकल्पना स्पष्ट होत नाही. त्याकरिता अर्थाचे स्पष्टीकरण करणारी चित्रेही दिलेली असतात. त्यावरून त्या शब्दाचा अर्थ कळतो. अशा प्रकारे शब्दकोश समर्पक अर्थ सांगतात.

प्रश्न 4.
शब्दकोशासंबंधी खालील मुद्द्यांना धरून परिच्छेद तयार करा.
उत्तरः
(अ) शब्दकोशाचा उपयोग:

शब्दकोशात आपण नवीन शब्दांचे अर्थ पाहू शकतो. त्यात प्रमाण उच्चार असतात. तेही आपणास कळतात. एकाच शब्दाचे अनेक अर्थ असतात. संदर्भानुसार कोणता अर्थ घेणे उचित आहे ते कळू शकते. काही शब्दांचे अर्थ लिहूनही संकल्पना स्पष्ट होत नाही. त्याकरिता अर्थाचे स्पष्टीकरण करणारी चित्रेही दिलेली असतात. त्यावरून त्या शब्दाचा अर्थ कळतो. अशा प्रकारे शब्दकोश समर्पक अर्थ सांगतात.

(आ) शब्दकोश पाहण्याची उद्दिष्टे:

भाषिक समृद्धीसाठी प्रत्येक शब्दाचा योग्य अर्थ माहित करून घ्यावा लागतो. त्यासाठी शब्दकोश पहाणे गरजेचे असते. प्रत्येक शब्दाचा अर्थ कळणे, त्या अर्थाच्या छटा समजणे ही प्रमुख उद्दिष्टे आहेत. शब्दकोश म्हणजे काय हे कळण्यासाठी तो प्रत्यक्ष पाहणे, शब्दकोश हाताळता येणे आवश्यक असते. शब्दकोशाची गरज व महत्त्व लक्षात घेणे हे शब्दकोश पाहण्याचे उद्दिष्ट आहे.

Class 8 Marathi Chapter 11 जीवन गाणे Additional Important Questions and Answers

प्रश्न 1.
शाळेत येताना दोन मित्रांमधील शब्दकोशासंबंधी संवाद लिहा.
उत्तरः
दोन मित्रांमधील शब्दकोशासंबंधीचा संवाद खालीलप्रमाणे:

पाठपरिचय:

दैनंदिन जीवनात आपण अनेक शब्द वापरतो. पण प्रसंगानुरूप त्यांचे अर्थ विविध असतात. ते समजून घेणे आवश्यक असते. त्याकरिता शब्दकोश अत्यंत उपयोगी पडतो. हे शब्द शब्दकोशातून कसे शोधता येतात त्याचे मार्गदर्शन या पाठातून मिळते.

We use many words in our day to day life. Words have different meanings according to their context. It is necessary to us understand the correct meaning of the term. In that case dictionary is very helpful to us. This lesson guides to understand how to search the words in the dictionary.

शब्दार्थ: