Balbharti Maharashtra State Board Class 8 Marathi Solutions Sulabhbharati Chapter 9 झुळूक Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Marathi Sulabhbharti Class 8 Solutions Chapter 9 झुळूक Textbook Questions and Answers

1. आकृत्या पूर्ण करा.

प्रश्न 1.
आकृत्या पूर्ण करा.


उत्तरः
अ.

आ.

इ.

2. योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा.

प्रश्न अ.
झुळकेला स्वैर झुकावे वाटते, कारण …………….

उत्तरः
झुळकेला स्वैर झुकावे वाटते, कारण तिचे मन तिकडे ओढ घेते.

प्रश्न आ.
वेळूच्या वनात अलगूज वाजते, कारण …………………

उत्तरः
वेळूच्या वनात अलगूज वाजते, कारण झुळूकेच्या स्पर्शामुळे वेळूतून अलगूजाचा आवाज निघतो.

3. परिणाम लिहा.

प्रश्न 1.
परिणाम लिहा.
उत्तरः
अ. झुलकेने कलिकेला स्पर्श केला – [का कळी फुलून सुगंध पसरतो]
आ. बकुळीच्या फुलांना स्पर्श केला – [डाहामध्य बकुळीची फुले शिंपतात]

4. खालील शब्दसमूहांचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.

प्रश्न 1.
खालील शब्दसमूहांचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.
उत्तरः
अ. चुकलीमुकली लकेर – झुळझुळ झऱ्यावर झुळूक येते व झऱ्याच्या ओघाने झुळूकेचे गाणे ही चौफेर पसरते.
आ. पाचूचे मखमली शेत – पाचू या रत्नासारखे हिरवेगार असलेले मऊशार शेत.

5. एक ते दोन शब्दांत उत्तरे लिहा.

प्रश्न 1.
एक ते दोन शब्दांत उत्तरे लिहा.
उत्तरः
अ. झुळूकेने भेट दिलेली नैसर्गिक ठिकाणे – [नदी, झरा]
आ. कवितेतील वर्णनावरून कवीने वर्णन केलेला ऋतु – [उन्हाळा]
इ. झुळूकेचा विश्रांतीचा प्रहर – [तिन्हीसांजा]

खेळूया शब्दांशी

प्रश्न अ.
कवितेतील यमक जुळणाऱ्या शब्दांच्या जोड्या शोधून लिहा.
उत्तरः

प्रश्न आ.
खालील शब्दांना कवितेतील शब्द शोधा.
उत्तरः

इ. तुमच्या शब्दांत उत्तरे लिहा.

प्रश्न अ.
झुळूकेची परोपकरारी वृत्ती तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तरः
‘झुळूक’ या कवितेत कवीला वाऱ्याची झुळूक होऊन विविध गमती जमती करायच्या आहेत. परोपकारी वृत्तीने फिरता फिरता सर्वांना मदत करायची आहे. कळीला हळूच फुलवायचे आहे. फुलाचा सुगंध सर्वत्र पसरवायचा आहे. झऱ्याची गोड लकेर चौफेर पसरवायची आहे. वेळूच्या वनात जाऊन अलगद बासरीचे मधुर स्वर काढून आनंदाचे वातावरण निर्माण करायचे आहे. कणसांना फुलवायचे आहे. बकुळीचे पखरण करायची आहे. जांभळे गाळायची आहे. दमलेल्या, थकलेल्या चेहऱ्यावर गार वाऱ्याचा स्पर्श करून टवटवी आणायची आहे.

प्रश्न आ.
प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण सांगा.
उत्तरः
प्रस्तुत कविता ‘दामोदर कारे’ यांनी लिहिली असून, ती मला खूप आवडली. कविता आवडण्याची प्रमुख कारणे अशी की, कवितेची शब्दरचना अत्यंत साधी आहे. समर्पक शब्दमांडणी असल्याने कवितेत गेयता आहे. कवितेला आशयसौंदर्य प्राप्त झाले आहे. कवीची ‘झुळूक’ होऊन गमती जमती करण्याची कल्पना, परोपकारी वृत्ती यामुळे कविता अर्थपूर्ण झाली आहे. कवितेत चुकलीमुकली, झुळझुळ व यमक साधणाऱ्या शब्दांमुळे नादमाधुर्य निर्माण झाले आहे. कवितेतील स्वच्छंदपणा, स्वैरपणा मनाला भावतो.

कल्पक होऊया.

प्रश्न 1.
‘तुम्ही पक्षी आहात’ अशी कल्पना करून तुम्हांला स्वच्छंदीपणे कोणकोणत्या गोष्टी करायला आवडतील, ते लिहा.
उत्तरः
पक्षी होऊन मी घराघरांवरून उडेन. आकाशाशी मैत्री करेन स्वच्छंद विहार करेन. झाडांवरील पिकलेली गोड फळे खाईन. उंच उंच झाडावर झोके घेईन. घरांच्या कौलावर, मनोऱ्यांवर, उंच उंच डोंगरांवरील झाडांवर बसेन. मुक्तपणे सर्वत्र फिरून परीसर पाहीन. सर्वत्र बिया टाकून झाडे निर्माण करीन. रानावनात हिंडेन व गोड गाणी गाईन.

चला संवाद लिहूया.

प्रश्न 1.
नदी व झाड या दोघांमधील संवादाची कल्पना करून संवादलेखन करा.


नदी: ……………………………………………………………………
झाड: …………………………………………………………………..
नदी: ……………………………………………………………………
झाड: ……………………………………………………………………
नदी: ……………………………………………………………………
झाड: ……………………………………………………………………

Class 8 Marathi Chapter 9 झुळूक Additional Important Questions and Answers

पुढील कवितेच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा.

कृती 1: आकलन कृती

प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा.
उत्तरः

प्रश्न 2.
रिकाम्या जागा भरा.
1. हळु थबकत जावे कधी ……………. घेत. (आडोसा, आधार, कानोसा)
2. कधी ………………. वा कधी भरारी थेट. (चालत फिरत, रमत गमत, हसत हसत)
उत्तरः
1. कानोसा
2. रमत गमत

प्रश्न 3.
रिकाम्या जागेत योग्य शब्दांचा पर्याय निवडा व पंक्ती पूर्ण करा.
1. वाटते सानुली …………… झुळूक मी व्हावे. (मंद/गार)
2. घेईल ओढ मन तिकडे …………… झुकावे. (खोल/स्वैर)
उत्तर:
1. मंद
2. स्वैर

प्रश्न 4.
घटना क्रम लिहा.
उत्तर:

कृती 2: आकलन कृती

प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा.
उत्तर:

एका वाक्यात उत्तरे लिहा.

प्रश्न 1.
झुळूक कोणाच्या मुखावर टवटवी आणणार आहे?
उत्तरः
दिवसभर जो राबून दमला असेल, त्याच्या मुखावर झुळूक टवटवी आणणार आहे.

प्रश्न 2.
झुळूक विसावा केंव्हा घेईल?
उत्तरः
झुळूक विसावा तिन्हीसांजेला घेईल.

प्रश्न 3.
जोड्या जुळवा.

‘अ’ गट ‘ब’ गट
1. टवटवी अ. तीरी
2. भुळभुळ आ. झरा
3. झुळझुळ इ. तरंग
4. मखमली ई. मुखावर

उत्तरः

‘अ’ गट ‘ब’ गट
1. टवटवी ई. मुखावर
2. भुळभुळ अ. तीरी
3. झुळझुळ आ. झरा
4. मखमली इ. तरंग

कृती 3: काव्यसौंदर्य.

प्रश्न 1.
खालील काव्यपंक्तींचे भावसौंदर्य स्पष्ट करा.
वाटते सानुली मंद झुळूक मी व्हावे
घेईल ओढ मन तिकडे स्वैर झुकावे
उत्तरः
‘झुळूक’ या कवितेत कवी ‘दामोदर कारे’ यांनी आपण वाऱ्याची झुळूक झालो तर कोठे कोठे जाता येईल याचे वर्णन केले आहे. कवीला वाटते की आपण एक लहानशी, मंद झुळूक होऊन जेथे मन ओढ घेईल तेथे जावे. कधी बाजारात, कधी नदीकाठी, कधी बागेत, पडक्या वाड्याच्या मागे कानोसा घेत घेत जावे. रमत गमत किंवा भरारी मारून सर्वत्र फिरावे.

विविध ठिकाणी रमत गमत जाण्याचा भाव, मौजमजा करण्याची भरारी घेण्याची कल्पना कवितेचे भावसौंदर्य वाढविते. काठी-पाठी, घेत-थेट, व्हावे-झुकावे या शब्दांचे यमक साधले आहे.

प्रश्न 2.
खालील पंक्तीतील आशय स्पष्ट करा.
वेळूच्या कुंजी वाजवुनी अलगूज
कणसांच्या कानी सांगावे हितगुज
शिंपावी डोही फुले बकुळीची सारी
गाळुनी जांभळे पिकली भुळभुळ तीरी
उत्तर:
‘दामोदर कारे’ यांना झुळूक होऊन विविध गमती जमती करायच्या आहेत. वेळूच्या वनात जाऊन झुळूक होऊन हलकीच बासरी वाजवायची आहे. खरे तर बांबुच्या या वनात झुळूकेचा स्पर्श होताच बासरीचे सूर निघणार आहेत. कणसाच्या कानात गुजगोष्टी करायच्या आहेत. हलकाच स्पर्श करून बकुळीची सर्व फुले शिंपायची आहेत. झुळूकीने पिकलेल्या जांभळांचा वर्षाव करायचा आहे.

वेळूच्या वनातील अलगूज या शब्दरचनेने कवितेचे अर्थ सौंदर्य वाढले आहे. कवीची कल्पना रंजक असल्याने कविता रसपूर्ण झाली आहे. अलगुज-हितगुज, सारी-तीरी या शब्दांचे यमक साधले आहे.

प्रश्न 3.
तुम्ही झुळूक झालात तर …………… काय काय कराल? तुमच्या शब्दांत अभिव्यक्त व्हा.
उत्तरः
झुळूक होणे मला आवडेल. मी झुळूक झालो तर ‘व्हॅली ऑफ फ्लॉवर’ ला भेट देईन व सगळा सुगंध पसरवीन रानावनात एकटे फिरून येईन व गाभुळलेल्या चिंचा पाडीन. त्या चिंचा मुलांसाठी भेट असतील. प्रातः सकाळी पारिजातकाचा सडा शिंपडीन. रखरखत्या उन्हात सर्व जीवांना गारवा देऊन त्यांचे मन प्रसन्न करीन.

दिलेल्या मुद्यांच्या आधारे कवितेसंबंधी पुढील कृती सोडवा.

1. कवी/कवयित्री – दामोदर कारे
2. कवितेचा रचनाप्रकार – कल्पनारंजक कविता
3. कवितेचा विषय – आपण वाऱ्याची झुळूक झाले तर निरनिराळ्या ठिकाणी फिरू, मौजमजा करू अशी कवी कल्पना आहे.
4. कवितेतून व्यक्त होणारा भाव (स्थायी भाव) – कल्पनारंजनाद्वारे ‘झुळूक’ या कवितेत परोपकार भाव निदर्शित होतो.

5. कवी/कवयित्री लेखन वैशिष्ट्ये – अत्यंत साधी, सोपी, सरळ शब्दरचना आहे. कवितेत स्वच्छंदीपणा, स्वैरपणा असूनही परोपकारी वृत्ती जोपासली आहे. निसर्गाशी नाते बांधण्याची कल्पना अप्रतिम आहे. कल्पनारंजन रंजक आहे.

6. कवितेतून व्यक्त होणारा विचार – वाऱ्याची झुळूक होऊन नदीच्या काठी फिरावे, फुलांचा सुगंध दिशादिशांतून उधळावा. निसर्गात रममाण व्हावे, शेतात जावे व बकुळाची पखरण करावी. जांभळे गाळावी व स्वच्छंदपणे बागडावे. तिन्हीसांजेला विश्रांती घ्यावी असे सुंदर विचार कवितेतून मांडले आहेत. परोपकार वृत्तीने सर्वांना आनंद दयावा हा ही विचार सुंदर आहे. कवितेतील आवडलेली ओळ – दिनभरी राबुनी दमला दिसता कोणी टवटवी मुखावर आणावी बिलगोनी.

7. कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे – कवितेची शब्दरचना अत्यंत साधी असून समर्पक शब्दमांडणी आहे. झुळूक होऊन गमती जमती करण्याची कल्पना, परोपकारी वृत्ती यामुळे कविता अर्थपूर्ण झाली आहे. कवितेतील स्वच्छंदपणा, स्वैरपणा मनाला भावतो.

8. कवितेतून मिळणारा संदेश – झूळूक होऊन परोपकारी वृत्तीने फिरून सर्वांना मदत करणे, बासरीचे मधूर स्वर काढून आनंदाचे वातावरण निर्माण करणे व श्रमलेल्यांच्या चेहऱ्यावर टवटवी आणणे ईत्यादी गोष्टी आपल्याला वास्तव जीवनात करता येतील असा संदेश कवितेतून मिळतो.

खालील काव्यपंक्तीचे रसग्रहण करा.

प्रश्न 1.
वाटते सानुली मंद झुळूक मी व्हावे
घेईल ओढ मन तिकडे स्वैर झुकावे
कधी बाजारी कधी नदीच्या काठी
राईत कधी वा पडक्या वाड्यापाठी
हळु थबकत जावे कधी कानोसा घेत
कधी रमत गमत वा कधी भरारी थेट
उत्तरः
‘झुळूक’ या कवितेत कवी ‘दामोदर कारे’ यांनी आपण वाऱ्याची झुळूक झालो तर कोठे कोठे जाता येईल, काय काय पाहता येईल आणि कोणकोणत्या गमती जमती करता येतील याचे मजेदार वर्णन केले आहे. कवीला वाटते की आपण एक लहानशी मंद झुळूक होऊन जेथे मन ओढ घेईल तेथे जावे. कधी बाजारात, कधी नदीकाठी, कधी बागेत, पडक्या वाड्याच्या मागे कानोसा घेत घेत जावे. रमत गमत किंवा भरारी मारून सर्वत्र स्वच्छंदपणे हिंडावे. विविध ठिकाणी रमत गमत जाणे, भरारी घेणे या कल्पनेनेच कवितेचे भावसौंदर्य वाढले आहे. काठी-पाठी, घेत-थेट, व्हावे-झुकावे या शब्दांनी यमक साधले आहे.

प्रश्न 2.
लावूनी अंगुली कलिकेला हळुवार
ती फुलून बघे तो व्हावे पार पसार
परि जाता जाता सुगंध संगे न्यावा
तो दिशादिशांतुनी फिरता उधळुनी दयावा.
उत्तर:
‘झुळूक’ या कवितेत कवी ‘दामोदर कारे’ यांनी आपण वाऱ्याची झुळूक झालो तर कोठे कोठे जाता येईल, काय काय पाहता येईल आणि कोणकोणत्या गमती जमती करता येतील याचे मजेदार वर्णन केले आहे.

प्रसिद्ध कवी दामोदर कारे यांची कल्पनाशक्ती अप्रतिम आहे. झुळूक होऊन कवीला कळीला बोट लावायचे आहे. ती फुलायला लागताच तेथून पसार व्हायचे आहे. पण जाता जाता मात्र सुगंध बरोबर न्यावा व चारही दिशांना उधळावा असे त्याला वाटते. कळीला फुलवणे, त्याचा सुगंध दरवळणे या नैसर्गिक घटना दर्शवून काव्यसौंदर्य वाढविले आहे. हळुवार-पसार, न्यावा – दयावा शब्दांचे यमक साधले आहे.

प्रश्न 3.
गाण्याची चुकलीमुकली गोड लकेर
झुळझुळ झऱ्याची पसरावी चौफेर
शेतात पाचुच्या, निळ्या नदीवर शांत
खुलवीत मखमली तरंग जावे गात
उत्तरः
‘झुळूक’ या कवितेत कवी ‘दामोदर कारे’ यांनी आपण वाऱ्याची झुळूक झालो तर कोठे कोठे जाता येईल, काय काय पाहता येईल आणि कोणकोणत्या गमती जमती करता येतील याचे मजेदार वर्णन केले आहे.

‘झुळूक’ कवितेत दामोदर कारे यांना झुळूक होऊन ठिकठिकाणी जायचे आहे. झुळूकीने झऱ्याच्या गाण्याची लकेर चौफेर पसरवायची आहे. पाचूच्या शेतात जायचे आहे. हिरव्यागार शेतातून फिरायचे आहे. निळ्याशांत नदीवर झुळूकीने मखमली तरंग खुलवायचे आहेत. गात गात सर्वत्र हिंडायचे आहे. पाचुचे शेत या रूपकाने कवितेचे सौंदर्य वाढले आहे. निळे, गोड, मखमली या विशेषणांनी कवितेचे भावसौंदर्य वाढले आहे. लकेर-चौफेर हे यमक साधले आहे.

प्रश्न 4.
वेळूच्या कुंजी वाजवुनी अलगूज
कणसांच्या कानी सांगावे हितगूज
शिंपावी डोही फुले बकुळीची सारी
गाळुनी जांभळे पिकली भुळभुळ तीरी
उत्तरः
‘झुळूक’ या कवितेत कवी ‘दामोदर कारे’ यांनी आपण वाऱ्याची झुळूक झालो तर कोठे कोठे जाता येईल, काय काय पाहता येईल आणि कोणकोणत्या गमती जमती करता येतील याचे मजेदार वर्णन केले आहे. वेळूच्या वनात जाऊन हलकीच बासरी वाजवायची, कणसाच्या कानात गुजगोष्टी करायच्या, बकुळीची फुले डोहात शिंपायची व पिकलेली जांभळे झुळूकीने खाली पाडायची. बांबूच्या बनात झुळूकीचा प्रवेश होताच बासरीचे हलके सूर निघतील, ही कल्पनाच किती सुंदर आहे. निसर्गातल्या घटकांचे वर्णन सांगून कवितेच्या अर्थसौंदर्यात भर घातली आहे. अलगूज-हितगूज, सारी-तीरी या शब्दांचे यमक साधले आहे.

प्रश्न 5.
दिनभरी राबुनी दमला दिसता कोणी
टवटवी मुखावर आणावी बिलगोनी
स्वच्छंद अशा या करुनी नाना मौजा
घ्यावया विसावा यावे मी तिन्हीसांजा
उत्तरः
‘झुळूक’ या कवितेत कवी ‘दामोदर कारे’ यांनी आपण वाऱ्याची झुळूक झालो तर कोठे कोठे जाता येईल, काय काय पाहता येईल आणि कोणकोणत्या गमती जमती करता येतील याचे मजेदार वर्णन केले आहे.

दिवसभर कष्ट करून दमलेल्यांच्या मुखावर टवटवी आणण्यासाठी कविला वाटते आपण झुळूक होऊन त्यांना गार वारा दयावा. त्यांचा थकवा घालवावा, त्यांच्यात नवे चैतन्य फुलवावे, विविध ठिकाणी स्वच्छंदपणे फिरून मौजमजा करावी व तिन्हीसांजेला मात्र झुळूकीने विश्रांती घ्यावी. मदतीच्या भावनेने कवितेचे भावसौंदर्य खुलले आहे. कोणी-बिलगोनी, मौजा-तिन्हीसांजा या शब्दांचे यमक साधले आहे.

काव्यपरिचय:

आपण वाऱ्याची झुळूक झालो तर निरनिराळ्या ठिकाणी फिरू, मौजमजा करू, गमती जमती करू अशी कवी कल्पना आहे आणि याचे मजेदार वर्णन प्रस्तुत कवितेत कवीने केले आहे.

The poet imagines the places he would wonder to and the fun he would have if he were a gentle wind (breeze). The poet has provided these interesting descriptions in the poem.

भावार्थ:

वाटते सानुली मंद झुळूक मी व्हावे
घेईल ओढ मन तिकडे स्वैर झुकावे

कवीची कल्पना आहे की आपण वाऱ्याची झुळूक व्हावे.
मंद मंद झुळूक होऊन जिथे मन ओढ घेईल तेथे मुक्तपणे झुकावे.

कधी बाजारी कधी नदीच्या काठी
राईत कधी वा पडक्या वाड्यापाठी
हळु थबकत जावे कधी कानोसा घेत
कधी रमत गतम वा कधी भरारी थेट

कवीला वाटते आपण वाऱ्याची झुळूक होऊन कधी बाजारी जावे तर कधी नदीच्या काठी जावे. कधी राईत जावे किंवा कधी पडक्या वाड्याच्या मागे जावे. कधी कधी कानोसा घेत हळूच जावे, कधी थबकत जाऊन रमत गमत सर्वत्र फिरावे किंवा कधी थेट भरारी घ्यावी असे कवीला वाटते.

लावून अंगुली कलिकेला हळुवार
ती फुलून बघे तो व्हावे पार पसार
परि जाता जाता सुगंध संगे न्यावा
तो दिशादिशांतुनी फिरता उधळुनी दयावा

कवीला असेही वाटते की फुलांच्या कळीला हळूच बोट लावावे. ती जशी उमलायला लागेल तसे तेथून पसार व्हावे. पण | तेथून जाताना बरोबर सुगंध घेऊन जावा व सर्व दिशादिशांतून तो उधळावा. सर्व परिसर सुगंधित करावा.

गाण्याची चुकलीमुकली गोड लकेर
झुळझुळ झऱ्याची पसरावी चौफेर
शेतात पाचुच्या, निळ्या नदीवर शांत
खुलवीत मखमली तरंग जावे गात

गाण्याची लकेर जशी सर्वत्र पसरते तशीच झुळझुळ झऱ्याच्या गाण्याची लकेर चौफेर, चारीदिशांना पसरावी. पाचुप्रमाणे हिरव्यागार डोलणाऱ्या शेतात, निळ्या शांत नदीवर ही झुळूक पसरावी. पाण्यावरचे मखमली तरंग खुलवीत जावे असे कवीला वाटते.

वेळूच्या कुंजी वाजवुनी अलगूज
कणसांच्या कानी सांगावे हितगुज
शिंपावी डोही फुले बकुळीची सारी
गाळुनी जांभळे पिकली भुळभुळ तीरी

वेळूच्या वनात मनसोक्त हिंडावे. हळूवार बासरीचे सूर काढावेत, कणसांच्या कानात मनातील गोष्टी सांगाव्या. बकुळीच्या फुलांना झुळूकीने डोहांत शिंपावे. जांभळाच्या झाडांवरून झुळूकीने जाऊन पिकलेली जांभळे गाळावीत (पाडावीत).

दिनभरी राबुनी दमला दिसता कोणी
टवटवी मुखावर आणावी बिलगोनी
स्वच्छंद अशा या करुनी नाना मौजा
घ्यावया विसावा यावे मी तिन्हीसांजा

दिवसभर काम करून जो दमला असेल, अशा थकलेल्या जीवाला झुळूक होऊन बिलगावे. त्याला कवटाळून त्याच्या चेहऱ्यावर टवटवी आणावी. अशाप्रकारे दुसऱ्याला सुख दयावे असे कवी म्हणतो. दिवसभर अशा विविध मौजा करून मुक्तपणे, स्वच्छंद असे बागडावे व तिन्हीसांजेला शांतपणे विश्रांती घ्यावी असे कवी म्हणतो.

शब्दार्थ:

वाक्प्रचार: