Balbharti Maharashtra State Board Class 10 Marathi Solutions Aksharbharati Chapter 16.1 व्युत्पत्ती कोश (स्थूलवाचन) Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.
Marathi Aksharbharati Std 10 Digest Chapter 16.1 व्युत्पत्ती कोश Textbook Questions and Answers
प्रश्न 1.
टीप लिहा.
व्युत्पत्ती कोशाचे कार्य
उत्तर:
वाचन करताना अनेक वेगवेगळे शब्द डोळ्यांखालून जातात, काही शब्द लक्ष वेधून घेतात. हे शब्द कसे तयार होत असावेत याची उत्सुकता निर्माण होते. मग अशावेळेस त्या शब्दाची निर्मिती कशी झाली हे पडताळण्यासाठी व्युत्पत्ती कोश उपयोगी पडतो. व्युत्पत्ती कोश शब्दाचे मूळ रूप दाखवतो. इतकेच नव्हे तर त्यातील विस्तार संदर्भ, उच्चारातील बदल व फरक दाखवतो. शब्दांची उत्पत्ती पाहणे, उच्चार जाणून घेणे ही भाषासमृद्धीच्या दृष्टीने आनंददायी क्रिया आहे. एकाच शब्दाचे वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये वेगवेगळे अर्थ असतात, हे जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. उदा. धूळ चारणे; खरे पाहता धूळ चारणे व फसवणे हे दोन अर्थ आहेत. वेगवेगळ्या संदर्भानुसार ते ते अर्थ जुळवले जातात. व्युत्पत्ती कोशातून उच्चारातील बदलांचे कारण स्पष्ट होते. अर्थातील स्पष्ट केलेला बदल अभ्यासता येतो, व्युत्पत्ती कोशातून एखादया शब्दाची अन्य कोणी मांडलेली व्युत्पत्ती सांगून ती योग्य की अयोग्य हे ही कळते. भाषेचे कालिक स्वरूप स्पष्ट करणे हे व्युत्पत्ती कोशाचे प्रमुख कार्य आहे.
प्रश्न 2.
खालील मुद्यांच्या आधारे एक परिच्छेद तयार करा. (७ ते ८ वाक्यांत)
उत्तर:
१९३८ साली मुंबई येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरले होते. स्वातंत्र्यवीर सावरकर या संमेलनाचे अध्यक्ष होते. ‘व्युत्पत्ती कोश रचनेचे कार्य हाती घ्यावे’ असा ठराव संमेलनात मंजूर करण्यात आला. सर्वांच्या मतानुसार हे निर्मिती कार्य कृ.पां.कुलकर्णी यांच्यावर सोपविण्यात आले. बॅ. मुकुंदराव जयकर यांच्या आर्थिक सहकार्यामुळे व श्री. दाजीसाहेब तुळजापूरकर यांनी पुरस्कृत केल्यामुळे व्युत्पत्ती कोश निर्मितीस भरीव मदत झाली. तसेच सर्वांच्या सहकार्यामुळे १९४६ साली ‘मराठी व्युत्पत्ती कोशाचे’ पहिले प्रकाशन झाले.
प्रश्न 3.
पाठाबाहेरची उदाहरणे शोधून खालील कृती करा.
(ii) शब्द एक, अर्थ अनेक
एकच शब्द वेगवेगळ्या संदर्भात वेगवेगळे अर्थ धारण करतो.
प्रश्न 4.
टिपा लिहा.
(i) शब्द तयार होण्याचे विविध प्रकार.
(अ) भाषेत बदल होण्यामागे बऱ्याचदा सुलभीकरणाची अर्थात सोपे करण्याची प्रवृत्ती असते.
उदा.
जसे अग्निपासून अग्नि व नंतर आग हा सोपा शब्द तयार झाला.
(आ) कुठल्याही दोन भाषा बोलणारे भाषिक जेव्हा एकमेकांच्या संपर्कात येतात, तेव्हा त्यांच्या भाषांतील शब्दांची देवाणघेवाण होते. त्यावरून शब्द तयार होतात.
उदा.
(इ) आपलाच शब्द थोडेसे रूप बदलून इतर भाषांमध्येही वापरला जातो.
उदा.
दिवाळी हा शब्द मूळ संस्कृत शब्द दीपावलि पासून आला आहे.
प्रश्न 5.
‘काळाप्रमाणश ‘काळाप्रमाणे शब्दाच्या स्वरूपात, त्यांच्या अर्थात, त्यांच्या परस्पर संबंधात बदल होतात’ हे सोदाहरण स्पष्ट करा.
उत्तरः
काळाप्रमाणे, पिढ्यांप्रमाणे बोलण्याची भाषा, त्यांचे अर्थ बदलत जातात. आपले आजी-आजोबा बोलत असलेली भाषा, आई बाबा बोलत असलेली भाषा आपली व आपल्या भावंडांची भाषा यात तफावत असते. मित्रांच्या समुहातील भाषा, ही अगदी भिन्न असते.
उदा.
आजी म्हणते, “आज माझे मामजी येणार आहेत”.
आई म्हणते, “आज माझे सासरे येतील”.
मुलगी म्हणते, “आज माझे इन लॉज येणार’.
मित्रांमध्ये – ‘आज सगळ्या सिनीअर सिटीझन्स चे गेट टुगेदर
आहे’. एकच बातमी विविध शब्दयोजनेनी विविध लोकांकडून
सांगितली जाते. नवऱ्याच्या वडिलांसाठी मामंजी. सासरे, इन
लॉज, दादा, बाबा, डॅडी असे अनेक शब्द वापरात येतात.
प्रश्न 6.
पाठाबाहेरची उदाहरणे शोधून खालील कृती करा.
उत्तरः
प्रश्न 7.
व्युत्पत्ती कोशातून खालील शब्दांची व्युत्पत्ती शोधून लिहा.
उत्तरः
व्युत्पत्ती कोश पाठपरिचय
इयत्ता नववीमध्ये आपण विश्वकोशाची ओळख करून घेतली. कोणत्याही शब्दाचे वेगवेगळे संदर्भ विश्वकोशातून मिळू शकतात हे आपण अनुभवले. हे शब्द तयार कसे होतात किंवा हे शब्द तयार कसे झाले असावेत, हे अनुभवण्यासाठी व्युत्पत्ती कोश पाहणे गरजेचे आहे. व्युत्पत्तीकोश पाहण्याची गरज कळावी व व्युत्पत्ती कोश अभ्यासण्याची सवय लागावी हा हेतू ‘व्युत्पत्ती कोश’ या पाठातून दिसून येतो.
We have studied about the world dictionary in Std. IX. We have seen how we can get different references for any word from the world dictionary. How have these words come into being? To figure this out, it is necessary to refer to the etymological dictionary. To recognize the need for, and to get habituated to the etymological dictionary is the aim of this lesson.
व्युत्पत्ती कोश शब्दार्थ