Balbharti Maharashtra State Board Class 10 Marathi Solutions Aksharbharati Chapter 2.2 संतवाणी योगी सर्वकाळ सुखदाता-संत एकनाथ Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.
Marathi Aksharbharati Std 10 Digest Chapter 2.2 संतवाणी योगी सर्वकाळ सुखदाता-संत एकनाथ Textbook Questions and Answers
प्रश्न 1.
खालील चौकटी पूर्ण करा.
(अ) अभंगात वर्णिलेला चंद्रकिरण पिऊन जगणारा पक्षी – [ ]
(आ) पिलांना सुरक्षितता देणारे – [ ]
(इ) स्वत:ला मिळणारा आनंद – [ ]
(ई) व्यक्तीला सदैव सुख देणारा – [ ]
उत्तरः
(i) अभंगात वर्णिलेला चंद्रकिरण पिऊन जगणारा पक्षी – [चकोर]
(ii) पिलांना सुरक्षितता देणारे – [पक्षिणीचे पंख]
(iii) चिरकाल टिकणारा आनंद – [स्वानंदतृप्ती]
(iv) व्यक्तीला सदैव सुख देणारा – [योगी]
प्रश्न 2.
खालील आकृती पूर्ण करा.
प्रश्न 3.
खालील तक्ता पूर्ण करा.
योगीपुरुष आणि जीवन (पाणी) यांच्यातील फरक स्पष्ट करा.
प्रश्न 4.
खालील शब्दांसाठी कवितेतील समानार्थी शब्द शोधा.
(अ) जीभ –
(आ) पाणी –
(इ) गोडपणा –
(ई) ढग –
उत्तरः
(i) जीभ – रसना
(ii) पाणी – जीवन, उदक, जल
(iii) गोडपणा – मधुरता
(iv) ढग – मेघ
प्रश्न 5.
काव्यसौंदर्य.
(अ) खालील ओळींचे रसग्रहण करा.
तैसे योगियासी खालुतें येणें। जे इहलोकी जन्म पावणें।
जन निववी श्रवणकीर्तनें। निजज्ञानें उद्धरी।।
उत्तरः
उपरोक्त पंक्ती ‘योगी सर्वकाळ सुखाचा’ या अभंगातील असून, त्या संत श्री एकनाथ महाराजांनी लिहिल्या आहेत. त्यांनी योगी पुरूषाची तुलना पाण्याशी करून योगी पुरूष पाण्यापेक्षाही श्रेष्ठ आहे हे सांगितले आहे. एकनाथांनी योग्यांची तुलना पाण्याशी केली आहे, पण योगी पाण्यापेक्षा अतिश्रेष्ठ कसे हे उदाहरणाद्वारे पटवून दिले आहे. ज्याप्रमाणे मेघांच्या पाण्याने अन्नधान्य उगवते. सर्वलोक तृप्त होतात. त्याप्रमाणे योगी सर्वश्रेष्ठ असून ते केवळ लोकांकरीता उच्च लोकांतून इहलोकात खाली येतात. जन्म घेऊन हालअपेष्टा भोगतात ते केवळ लोकांच्या कल्याणाकरिता हालअपेष्टा भोगतात. कीर्तन कथेच्या माध्यमातून जनाना (लोकांना) संतुष्ट करतात. आत्मज्ञानाने लोकांचा उद्धार करतात.
(आ) ‘योगी पुरुष पाण्यापेक्षा श्रेष्ठ आहे’ हे तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
उत्तर:
‘योगी सर्वकाळ सुखदाता’ या अभंगात संत श्री एकनाथ यांनी योगी पुरुषाची महानता अत्यंत समर्पक शब्दांत दाखवली आहे. त्यांनी योगी पुरुषाची तुलना ‘जीवन’ अर्थात पाण्याशी केली आहे. पाण्यापेक्षा योगी श्रेष्ठ आहेत. पाण्याने वरवरचा मळ निघतो; पण योग्यांच्या ज्ञानाने अंतर्बाहय निर्मळता होते. पाण्याने एकदा संतुष्टता मिळते आणि परत तहान लागते, पण योगी चिरकाल टिकणारी स्वानंदतृप्ती देतात. उदकाचा म्हणजे पाण्याचा गोडवा फक्त जिभेलाच कळतो पण योग्यांचा गोडवा, त्यांचे ज्ञानाचे शब्द, प्रेम सर्व इंद्रियांना तृप्त करतात. मेघांच्या पाण्याने अन्नधान्य पिकते व जनांची भूक भागते. पण योग्यांच्या कीर्तनाने, निजज्ञानाने जनांचा उद्धार होतो. त्यांचे पूर्ण जीवन सफल होते.
(इ) योगी पुरुष आणि पाणी हे दोघेही सामाजिक कार्य करतात, हे स्पष्ट करा.
उत्तरः
संत एकनाथांनी ‘योगी सर्वकाळ सुखदाता’ या अभंगात योगी पुरुष आणि पाणी यांचे समाजासाठीचे योगदान दाखवून दिले आहे. पाणी तहान शमवते. काही काळापुरती संतुष्टी देते. मेघांच्या पाण्याने शेती पिकते. अन्नधान्य पिकते. सर्वांची भूक भागवली जाते. रसनेला तृप्ती मिळते, मळ घालवते, स्वच्छता करते, योगी पुरुष ज्ञानदानाने लोकांना सुखी समाधानी करतो. त्यांना कायमची तृप्तता देतो. सर्वेद्रिय तृप्त करतो. मेघांचे पाणी खाली पडून शेती पिकवते. पण योगीपुरुष तर स्वत:च उच्च अवस्थेतून इहलोकात जन्म घेतात. सर्व दीनांना, जनांना कीर्तन, प्रबोधनाद्वारे आत्मज्ञानाचे चिरंतर सुख देतात. त्यांच्या जीवनाचा उद्धार करतात. योगीपुरुष आणि पाणी दोघेही समाजासाठी अमूल्य आहेत.
Marathi Akshar Bharati Class 10 Textbook Solutions Chapter 2.2 संतवाणी योगी सर्वकाळ सुखदाता-संत एकनाथ Additional Important Questions and Answers
प्रश्न १.
पुढील कवितेच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा.
कृती १ : आकलन कृती
प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा.
प्रश्न 2.
सहसंबंध लिहा.
जळ वरिवरी क्षाळी : मळ : : योगी सबाह्य करी : …………………….
उत्तरः
निर्मळ
प्रश्न 3.
चौकट पूर्ण करा.
उत्तरः
(i) क्षणात तृषित करणारे – [उदक]
(ii) सर्वकाळ सुख देणारा – [योगी]
(iii) योगी हे देतो – [स्वानंदतृप्ती]
(iv) योग्याने दिलेल्या सुखाला हे नाही – [विकृती]
प्रश्न 4.
कंसातील योग्य शब्द वापरून रिकाम्या जागा भरा.
(i) जेवीं चंद्रकिरण चकोरांसी। ………………………………. जेवीं पिलियांसी। (चखोवा, बकोवा, पांखोवा, ठकोवा)
(ii) ………………………………. जैसे कां जीवांसी। तेवीं सर्वांसी मृदुत्व।। (जीवन, मन, सुख, समाधान)
(iii) जळ वरिवरी क्षाळी ……………………………….। योगिया सबाह्य करी निर्मळ।। (पाणी, बळ, मळ, तळमळ)
(iv) ………………………………. सुखी करी एक वेळ। योगी सर्वकाळ सुखदाता। (पाणी, बदक, उदक, जल)
(v) तैसे योगियासी खालुतें येणें। इहलोकी ……………………………….” पावणें। (जन्म, मृत्यू, जीवन, जीव)
(vi) अध:पातें निवती ………………………………. अन्नदान सकळांसी।। (जन, लोक, जनता, जीव)
उत्तर:
(i) पांखोवा
(ii) जीवन
(iii) मळ
(iv) उदक
(v) जन्म
(vi) जन
प्रश्न 5.
काव्यपंक्तीचा योग्य क्रम लावा.
(i) मेघमुखें अध:पतन। उदकाचे देखोनि जाण।
(ii) जन निववी श्रवणकीर्तनें। निजज्ञानें उद्धरी।।
(iii) जेवी चंद्रकिरण चकोरांसी। पांखोवा जेवीं पिलियांसी।।
(iv) योगिया दे स्वानंदतृप्ती। सुखासी विकृती पैं नाही।।
उत्तर:
(i) जेवी चंद्रकिरण चकोरांसी। पांखोवा जेवीं पिलियांसी।।
(ii) योगिया दे स्वानंदतृप्ती। सुखासी विकृती पैं नाही।।
(iii) मेघमुखें अध:पतन। उदकाचें देखोनि जाण।
(iv) जन निववी श्रवणकीर्तनं। निजज्ञानें उद्धरी।।
कृती २ : आकलन कृती
प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा.
प्रश्न 2.
समानार्थी शब्दांच्या जोड्या लावा. (पाणी मुख रसना मधुर)
प्रश्न 3.
ओघतक्ता पूर्ण करा.
प्रश्न 4.
एका शब्दात उत्तरे लिहा.
(i) योगी याद्वारे जनांना निववितात – श्रवणकीर्तन
(ii) योगी येथे जन्माला येतात – इहलोक
(ii) जनांचा यामुळे उद्धार होतो . निजज्ञान
प्रश्न 5.
एका वाक्यात उत्तरे लिहा.
(i) पाण्याची मधुरता कोणाला संतुष्ट करते?
उत्तरः
पाण्याची मधुरता रसनेला (जिभेला) संतुष्ट करते.
(ii) योग्यांचे गोडपण कोणाला संतुष्ट करते?
उत्तरः
योग्यांचे गोडपण सर्व इंद्रियांना संतुष्ट करते.
(iii) कोणाच्या अध:पाताने लोक समाधानी होतात?
उत्तरः
पाण्याच्या अध:पाताने लोक समाधानी होतात.
(iv) स्वानंदतृप्ती कोण देतो?
उत्तरः
स्वानंदतृप्ती योगी देतो.
पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक ४
२. संतवाणी
(आ) योगी सर्वकाळ सुखदाता
जेवीं चंद्रकिरण चकोरांसी। पांखोवा जेवीं पिलियांसी।
जीवन जैसे कां जीवांसी। तेवीं सर्वांसी मृदुत्व।।
जळ वरिवरी क्षाळी मळ। योगिया सबाह्य करी निर्मळ।
उदक सुखी करी एक वेळ। योगी सर्वकाळ सुखदाता।।
उदकाचे सुख ते किती। सर्वेचि क्षणे तृषितें होती।
योगिया दे स्वानंदतृप्ती। सुखासी विकृती पैं नाही।।
उदकाची जे मधुरता। ते रसनेसीचि तत्त्वतां।
योगियांचे गोडपण पाहतां। होय निवविता सर्वेद्रियां।।
मेघमुखें अध:पतन। उदकाचे देखोनि जाण।।
अध:पातें निवती जन। अन्नदान सकळांसी।।
तैसे योगियासी खालुतें येणें। जे इहलोकी जन्म पावणे।
जन निववी श्रवणकीर्तनें। निजज्ञानें उद्धरी।।
कृती ३: कवितेतील शब्दांचा अर्थ
प्रश्न 1.
खालील कवितेतील शब्दांचा अर्थ लिहा.
(i) जेवि
(ii) चंद्र
(iii) पांखोवा
(iv) जीवन
उत्तर:
(i) ज्याप्रमाणे
(ii) शशी, सुधाकर
(iii) पक्षिणीचे पंख
(iv) पाणी कृती
काव्यसौंदर्य.
प्रश्न 1.
पुढील काव्यपंक्तीतील आशयसौंदर्य स्पष्ट करा.
जेवीं चंद्रकिरण चकोरांसी। पांखोवा जेवीं पिलीयासी।
जीवन जैसे कां जीवांसी। तेवीं सर्वांसी मृदुत्व।।
उत्तरः
योगी पुरूषाचे श्रेष्ठत्व स्पष्ट करताना संत एकनाथ सांगतात की, जो आत्म्याला परमेश्वराशी थेट जोडतो तो योगी असतो. त्याप्रमाणे चकोर पक्ष्यासाठी चंद्रकिरण हे त्यांचे जीवन असते. चंद्राची किरणे पिऊन तो जगतो अशी कल्पना आहे. तसेच पक्षिणी आपल्या लहान पिल्लांना पंखाखाली घेते, त्यांना मायेची ऊब देते. पिल्लांना पक्षिणीचे पंख सुरक्षित ठेवतात. पाणी हे पृथ्वीवरील सर्व सजीवांचे जीवन असते. पाण्याशिवाय सजीवांचे जीवन अशक्य आहे. त्याचप्रमाणे योग्यांचे स्थान समाजात असते. ते अत्यंत मृदू, प्रेमळ असतात. सर्वांशी त्यांचे वागणे प्रेमाचे आणि मृदू असते. असा हा योगी पुरुष आपल्या विचारांच्या ज्ञानाच्या पंखाखाली आपणा सर्वांना एकत्र आणतो आणि आपले जीवन सुख समाधानाने भरून टाकतो.
प्रश्न 2.
दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कवितेसंबंधी पुढील कृती सोडवा.
(१) प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री:
संत एकनाथ
(२) प्रस्तुत कवितेचा विषयः
योगीपुरूष व पाण्याची तुलना करून योगी पुरूषाचे श्रेष्ठत्व स्पष्ट केले आहे.
(३) प्रस्तुत कवितेतील दिलेल्या दोन ओळींचा सरळ अर्थ:
उदकाची जे मधुरता। ते रसनेसीचि तत्वतां।
योगियांचे गोडपण पाहतां। होय निवविता सर्वेद्रियां।।
पाण्यापेक्षाही योगी पुरुषाचे श्रेष्ठत्व स्पष्ट करताना एकनाथ
महाराज म्हणतात की, पाण्याचा गोडवा जिभेला कळतो. तो जिभेपुरता मर्यादित असतो. परंतु योग्याच्या सहवासाने लाभलेले माधुर्य मनुष्याच्या सर्वच इंद्रियांना संतुष्ट करते. मानवी मनातील कटुता नष्ट होऊन मनाला एक आंतरिक समाधान लाभते ते चिरकाल टिकणारे असते.
(४) प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेशः
संत एकनाथांनी ‘योगी सर्वकाळ सुखदाता’ या अभंगात योगी पुरूष आणि पाणी यांचे समाजासाठीचे योगदान दाखवून दिले आहे. पाणी आणि योगी पुरूष आपापल्या परीने समाजासाठी योग्य असे सामाजिक कार्य करीत असतात. आपल्याला त्यांच्यासारखे समाजोपयोगी कार्य करायला नाही जमले तरी निदान योगी पुरूषांनी दाखवलेल्या सन्मार्गावरून आपण गेले पाहिजे व आपल्या जीवनाचे कल्याण करून घ्यायला हवे, असा संदेश आपल्याला मिळतो.
(५) प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण:
संत एकनाथांनी योगी पुरूष आणि पाणी यांचे समाजासाठीचे योगदान दाखवून दिले आहे. चंद्रकिरण व चकोर, पांखोवा व पिल्ले, जीवन (पाणी) व जीव या उदाहरणांच्या अप्रतिम वापराने मनातील भाव समर्पकरित्या व्यक्त झालेला आहे. त्यामुळे हा अभंग मनापर्यंत पोहोचतो. मेघांचे रूपक घेऊन योगी पुरूषांचे खालुते येणे ही एकनाथ महाराजांनी योजलेली कल्पना मनाला भावल्यामुळे हा अभंग मला खूप आवडला आहे.
(६) प्रस्तुत कवितेतील शब्दांचे अर्थ:
(i) तेवी – त्याप्रमाणे
(ii) जळ – पाणी
(iii) क्षाळणे – धुणे
(iv) मळ – मल, मैला
(स्वाध्याय कती)
*(५) काव्यसौंदर्य
(१) तैसे योगियांसी खालुतें येणे। जे इहलोकी जन्म पावणे।
जन निववी श्रवणकीर्तनें। निजज्ञानें उद्धरी।।
उत्तरः
उपरोक्त पंक्ती ‘योगी सर्वकाळ सुखाचा’ या अभंगातील असून, त्या संत श्री एकनाथ महाराजांनी लिहिल्या आहेत. त्यांनी योगी पुरूषाची तुलना पाण्याशी करून योगी पुरूष पाण्यापेक्षाही श्रेष्ठ आहे हे सांगितले आहे. एकनाथांनी योग्यांची तुलना पाण्याशी केली आहे, पण योगी पाण्यापेक्षा अतिश्रेष्ठ कसे हे उदाहरणाद्वारे पटवून दिले आहे. ज्याप्रमाणे मेघांच्या पाण्याने अन्नधान्य उगवते. सर्वलोक तृप्त होतात. त्याप्रमाणे योगी सर्वश्रेष्ठ असून ते केवळ लोकांकरीता उच्च लोकांतून इहलोकात खाली येतात. जन्म घेऊन हालअपेष्टा भोगतात ते केवळ लोकांच्या कल्याणाकरिता हालअपेष्टा भोगतात. कीर्तन कथेच्या माध्यमातून जनाना (लोकांना) संतुष्ट करतात. आत्मज्ञानाने लोकांचा उद्धार करतात.
(२) ‘योगी पुरुष पाण्यापेक्षा श्रेष्ठ आहे’ हे तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
उत्तर:
‘योगी सर्वकाळ सुखदाता’ या अभंगात संत श्री एकनाथ यांनी योगी पुरुषाची महानता अत्यंत समर्पक शब्दांत दाखवली आहे. त्यांनी योगी पुरुषाची तुलना ‘जीवन’ अर्थात पाण्याशी केली आहे. पाण्यापेक्षा योगी श्रेष्ठ आहेत. पाण्याने वरवरचा मळ निघतो; पण योग्यांच्या ज्ञानाने अंतर्बाहय निर्मळता होते. पाण्याने एकदा संतुष्टता मिळते आणि परत तहान लागते, पण योगी चिरकाल टिकणारी स्वानंदतृप्ती देतात. उदकाचा म्हणजे पाण्याचा गोडवा फक्त जिभेलाच कळतो पण योग्यांचा गोडवा, त्यांचे ज्ञानाचे शब्द, प्रेम सर्व इंद्रियांना तृप्त करतात. मेघांच्या पाण्याने अन्नधान्य पिकते व जनांची भूक भागते. पण योग्यांच्या कीर्तनाने, निजज्ञानाने जनांचा उद्धार होतो. त्यांचे पूर्ण जीवन सफल होते.
(३) योगी पुरुष आणि पाणी हे दोघेही सामाजिक कार्य करतात हे स्पष्ट करा.
उत्तरः
संत एकनाथांनी ‘योगी सर्वकाळ सुखदाता’ या अभंगात योगी पुरुष आणि पाणी यांचे समाजासाठीचे योगदान दाखवून दिले आहे. पाणी तहान शमवते. काही काळापुरती संतुष्टी देते. मेघांच्या पाण्याने शेती पिकते. अन्नधान्य पिकते. सर्वांची भूक भागवली जाते. रसनेला तृप्ती मिळते, मळ घालवते, स्वच्छता करते, योगी पुरुष ज्ञानदानाने लोकांना सुखी समाधानी करतो. त्यांना कायमची तृप्तता देतो. सर्वेद्रिय तृप्त करतो. मेघांचे पाणी खाली पडून शेती पिकवते. पण योगीपुरुष तर स्वत:च उच्च अवस्थेतून इहलोकात जन्म घेतात. सर्व दीनांना, जनांना कीर्तन, प्रबोधनाद्वारे आत्मज्ञानाचे चिरंतर सुख देतात. त्यांच्या जीवनाचा उद्धार करतात. योगीपुरुष आणि पाणी दोघेही समाजासाठी अमूल्य आहेत.
संतवाणी योगी सर्वकाळ सुखदाता-संत एकनाथ भावार्थ
जेवी चंद्रकिरण चकोरांसी । पांखोवा जेवीं पिलियांसी ।
जीवन जैसे का जीवांसी । तेवीं सर्वांसी मृदुत्व।।
योगी पुरुषाचे श्रेष्ठत्व स्पष्ट करताना संत एकनाथ सांगतात की, जो आत्म्याला परमेश्वराशी थेट जोडतो तो योगी असतो. त्याप्रमाणे चकोर पक्ष्यांसाठी चंद्रकिरण हे त्यांचे जीवन असते. चंद्राची किरणे पिऊन तो जगतो अशी कल्पना आहे. तसेच पक्षिणी आपल्या लहान पिल्लांना पंखाखाली घेते. त्यांना मायेची ऊब देते. पिल्लांना पक्षिणीचे पंख सुरक्षित ठेवतात. पाणी हे पृथ्वीवरील सर्व सजीवांचे जीवन असते. पाण्याशिवाय सजीवांचे जीवन अशक्य आहे. त्याचप्रमाणे योग्यांचे स्थान समाजात असते. ते अत्यंत मृदू, प्रेमळ असतात. सर्वांशी त्यांचे वागणे प्रेमाचे आणि मृदू असते. असा हा योगी पुरुष आपल्या विचारांच्या ज्ञानाच्या पंखाखाली आपणा सर्वांना एकत्र आणतो आणि आपले जीवन सुख समाधानाने भरून टाकतो.
जळ वरिवरी क्षाळी मळ । योगिया सबाह्य करी निर्मळ ।
उदक सुखी करी एक वेळ । योगी सर्वकाळ सुखदाता ।।
योगी पुरुष हा पाण्यापेक्षा श्रेष्ठ कसा आहे, हे सांगताना एकनाथ महाराज पुढे सांगतात की, पाण्याने शरीरावरील मळ धुतला जातो. पाण्याने शरीर वरवर धुतले जाते. कालांतराने शरीर पुन्हा अशुद्ध होते. परंतु योगी पुरुषाच्या सहवासाने शरीर व मनाचीही शुद्धी होते. माणसांतील वाईट विचारांचा नाश होऊन अंतर्बाहय मन निर्मळ होते. पाण्याने होणारी शुद्धी ही क्षणिक, एकावेळेपर्यंत मर्यादित असते. पंरतु, योगी सर्वकाळ सुखदायक असतो. योगी लोकांना शारीरिक आणि मानसिक स्वच्छतेची शिकवण देऊन त्यांचे आयुष्य कायमस्वरूपी उजळून टाकतो. त्याच्या सान्निध्यात प्रत्येकाला सुख प्राप्त होते.
उदकाचें सुख ते किती । सवेंचि क्षणे तृषितें होती।
योगिया दे स्वानंदतृप्ती । सुखासी विकृती मैं नाही ।।
संत एकनाथ महाराज पुढे सांगतात की, पाण्याने मिळणारे सुख हे क्षणिक व मर्यादित आहे. खूप तहानलेल्या माणसाला पाणी प्यायल्याने क्षणभर लगेच समाधान मिळते; पण पुन्हा काही वेळाने तहान लागते. पाण्याने मिळणारी तृप्ती ही क्षणिक असते. परंतु योगी पुरुषांच्या सान्निध्याने स्वानंदतृप्ती लाभते. मनाला एक कायमस्वरूपी सुख समाधान मिळते. जे सुख कमी होत नाही किंवा संपतही नाही असे सुख माणसाला प्राप्त होते. म्हणजेच सुखाला, आनंदाला कसलीच विकृती राहत नाही. याच स्वानंदतृप्तीसाठी प्रत्येकजण धडपडत असतो. योगी पुरुषाच्या सहवासामुळे ही तृप्ती आपणास सहज प्राप्त होते.
उदकाची जे मधुरता । ते रसनेसीचि तत्त्वतां।
योगियांचे गोडपणा पाहतां । होय निवविता सर्वेद्रियां ।।
पाण्यापेक्षाही योगी पुरुषांचे श्रेष्ठत्व स्पष्ट करताना एकनाथ महाराज म्हणतात की, पाण्याचा गोडवा केवळ जिभेलाच कळतो. तो जिभेपुरताच मर्यादित असतो. परंतु योग्याच्या सहवासाने लाभलेले माधुर्य मनुष्याच्या सर्वच इंद्रियांना संतुष्ट करते. मनातील कटुता नष्ट होऊन मनाला एक आंतरिक समाधान लाभते. ते चिरकाळ टिकणारे असते.
मेघमुखें अध:पतन । उदकाचें देखोनि जाण ।
अध:पातें निवती जन । अन्नदान सकळांसी ।।
पाण्याचे श्रेष्ठत्व पटवून देतांना संत एकनाथांनी अप्रतिम दृष्टान्त दिला आहे. ते म्हणतात की, मेघाच्या मुखातून पाण्याचे अध:पतन होते, म्हणजेच आकाशातील काळ्या ढगांमधून पाण्याच्या धारा धरतीवर बरसतात. त्यामुळे सर्व लोकांना खूप आनंद होतो. सगळे लोक समाधानी होतात. कारण या मेघांतून कोसळणाऱ्या पाण्यामुळे धरतीवर हिरवळ पसरते. त्यातून अन्नधान्याची निर्मिती होते. खायला अन्न व प्यायला पोटभर पाणी मिळाल्याने लोक सुखी–समाधानी होतात.
तैसे योगियासी खालुतें येणें । जे इहलोकी जन्म पावणे।
जन निववी श्रवणकीर्तनें । निजज्ञानें उद्धरी ।।
आपल्या आत्म्याला थेट परमेश्वराशी जोडू पाहणारा योगी किती श्रेष्ठ आहे, हे संत एकनाथांनी आपल्याला समजावले आहे. ते म्हणतात की, मेघमुखातून धरतीवर येणारे पाणी जसे अन्नधान्याची निर्मिती करून लोकांना सुखी करते. त्याचप्रमाणे योगी पुरुषसुद्धा या इहलोकी जन्म घेतात. स्वर्गलोकातून ते जणू खाली येतात म्हणजेच धरतीवर जन्म घेतात आणि आत्मज्ञान देऊन सामान्य लोकांचा उद्धार करतात, त्यांचे कल्याण करतात. आपल्या भजन कीर्तनातून ज्ञान देऊन ते सर्व लोकांना सदैव सुखी–समाधानी करतात.
संतवाणी योगी सर्वकाळ सुखदाता-संत एकनाथ शब्दार्थ