Balbharti Maharashtra State Board Class 10 Marathi Solutions Kumarbharti Chapter 12 भरतवाक्य Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Marathi Kumarbharti Std 10 Digest Chapter 12 भरतवाक्य Textbook Questions and Answers

कृतिपत्रिकेतील प्रश्न २ (अ) साठी…

प्रश्न 1.
आकृती पूर्ण करा.
(i)


उत्तर:


(ii)


उत्तर:

Maharashtra Board Class 10 Marathi Solutions Chapter 12 भरतवाक्य

प्रश्न 2.
योग्य पर्याय निवडून विधान पुन्हा लिहा.

(अ) कवींच्या मते मनातील सर्व इच्छा पूर्ण व्हाव्यात म्हणून ________________________
(१) सतत परमेश्वराच्या सान्निध्यात राहावे.
(२) सतत परमेश्वराचे नामस्मरण करावे.
(३) सतत आत्मबोध घ्यावा.
(४) चारधाम यात्रा करावी.
उत्तर:
कवीच्या मते मनातील सर्व इच्छा पूर्ण व्हाव्यात, म्हणून सतत परमेश्वराचे नामस्मरण करावे.

(आ) सदंघ्रिकमळी दडो; म्हणजे ________________________
(१) कमळाच्या फुलात चित्त सदैव गुंतो.
(२) कमळातून मधुसेवन करणाऱ्या भुंग्याप्रमाणे सज्जनांच्या पायाशी मन गुंतो.
(३) कमळाच्या व भ्रमराच्या सौंदर्यात मन गुंतो.
(४) कमळात मन लपून राहो.
उत्तर:
सदंघ्रिकमळी दडो; म्हणजे कमळातून मधुसेवन करणाऱ्या भुंग्याप्रमाणे सज्जनाच्या पायाशी मन गुंतो.

प्रश्न 3.
खालील गोष्टींच्या बाबतीत कवी परमेश्वराजवळ कोणती विनंती करतात ते लिहा.
गोष्टी – विनंती
(१) निश्चय – …………………………………
(२) चित्त – …………………………………
(३) दुरभिमान – …………………………………
(४) मन – …………………………………
उत्तर:
गोष्टी – विनंती
(i) निश्चय – कधीही ढळू नये.
(ii) चित्त – भजन करताना विचलित होऊ नये.
(iii) दुरभिमान – सर्व गळून जावा.
(iv) मन – मलीन होऊ नये.

Maharashtra Board Class 10 Marathi Solutions Chapter 12 भरतवाक्य

प्रश्न 4.
खालील ओळींचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.
(१) मति सदुक्तमार्गी वळो – …………………………………
(२) न निश्चय कधीं ढळो – …………………………………
उत्तर:
(१) कुमार्ग सोडून चांगल्या मार्गावर बुद्धी वळवावी, म्हणजेच सत्कार्य करावे.
(२) दृढ केलेला निर्धार कधीही विचलित होऊ नये.

प्रश्न 5.
काव्यसौंदर्य.
(अ) ‘सुसंगती सदा घडो; सुजनवाक्य कानी पडो;’ या ओळींचे रसग्रहण करा.
उत्तर:
आशयसौंदर्य: ‘केकावली’ या काव्यग्रंथाची समाप्ती करताना उपसंहार म्हणून ही ‘भरतवाक्य’ काव्यरचना कविश्रेष्ठ मोरोपंतांनी लिहिली आहे. तनामनातील दर्पण जाऊन सद्गुण कोणते व कसे अंगिकारावे, याबद्दल देवाकडे आतं प्रार्थना केली आहे.

काव्यसौंदर्य: ‘सुसंगती’ म्हणजे चांगल्या, सज्जन व्यक्तीची मैत्री होय. गुणवान व चारित्र्यवान माणसांच्या संगतीत सदैव राहावे, म्हणजे आपली आत्मिक प्रगती व ज्ञानप्राप्ती होते, असा आशय उपरोक्त ओळींमध्ये व्यक्त झाला आहे. ‘सुजनवाक्य’ म्हणजे सुविचारांची धारणा जर केली, तर मन निर्मळ व प्रेमळ होते, असाही सुयोग्य सल्ला मोरोपंतांनी जनसामान्यांना दिला आहे.

भाषिक वैशिष्ट्ये: प्रस्तुत ओळींमध्ये सामान्य माणसांना परमार्थांची आवड लागावी, म्हणून दोन वर्तन-नियम सांगितले आहेत. साधकाने चारित्र्यसंपन्न होण्यासाठी उपदेश केला आहे. प्रत्येक चरणात ११+१३ मात्रेची आवर्तने असणारी हे ‘केकावली’ नावाचे मात्रावृत्त आहे. यातील भाषा साधी, सोपी व आवाहक असल्यामुळे हृदयाला। थेट भिडणारी आहे. ‘घडो-जडो’ या यमकप्रधान क्रियापदांमुळे कवितेला सुंदर लय व नाद आला आहे.

(आ) ‘स्वतत्त्व हृदया कळो; दुरभिमान सारा गळो;’ या काव्यपंक्तीतील विचारसौंदर्य स्पष्ट करा.
उत्तर:
माणसाने चारित्र्यसंपन्न होण्यासाठी कवी मोरोपंत यांनी ‘भरतवाक्य’ या केकावलीमध्ये जनांना मोलाचा उपदेश केला आहे.

सत्संग करून माणसाने सन्मार्गाला लागावे. चांगला मार्ग आचरण्यासाठी बुद्धीला योग्य वळण लावावे. स्वत:मधील स्वतत्त्व मनोमन ओळखावे. आत्मविश्वास वाढवावा. गर्विष्ठपणाचा त्याग करावा. दुरभिमान अजिबात बाळगू नये. आपले मन वाईट विचारांनी मलीन, भ्रष्ट करू नये. मन शुद्ध करावे. आत्मज्ञान वाढवावे. आत्मज्ञानामध्ये सर्व अनिष्ट गोष्टी जाळून टाकाव्यात, अशा प्रकारे विवेकी व प्रगल्भ विचार या चरणांमध्ये कवी मोरोपंत यांनी व्यक्त केला आहे.

Maharashtra Board Class 10 Marathi Solutions Chapter 12 भरतवाक्य

(इ) सत्प्रवृत्त व्यक्तीची तुम्हाला जाणवलेली वैशिष्ट्ये तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तर:
सत्प्रवृत्ती व्यक्ती म्हणजे सज्जन व्यक्ती. ही मनाने अतिशय निर्मळ असते. सर्व प्राणिमात्रांबद्दल तिच्या मनात नितांत प्रेमभाव वसत असतो. कुविचारांना त्यांच्या मनात जराही थारा नसतो. त्यांचे हृदय करुणेने ओतप्रोत भरलेले असते. काम, क्रोध, मद, मत्सर, आलस्य व मोह या षड्विकारांवर त्यांनी मात केलेली असते. ते सदैव परोपकारी असतात. दुसऱ्यांच्या दुःखाने व्यथित होणारे त्यांचे मन सतत तळमळत राहते. त्यांच्या हातून सदैव सत्कार्य घडते. त्यांच्या हृदयात दया, क्षमा, शांती वसत असते. सत्प्रवृत्त व्यक्ती अंतर्बाह्य पारदर्शक असते. म्हणून सज्जनांचा सहवास असावा व त्यांच्या सद्विचारांचे श्रवण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

(ई) वाईट गोष्टींचा मोह टाळण्यासाठी तुम्ही कोणते उपाय सुचवाल ते लिहा.
उत्तर:
सर्वप्रथम चांगल्या गोष्टी व वाईट गोष्टी कोणत्या यांची निवड विवेकबुद्धीने करावी. त्यानंतर वाईट गोष्टींचा त्याग करण्यासाठी मन खंबीर करावे, बुद्धी स्थिर ठेवावी. चंचलता सोडून दयावी. चांगल्या मित्रांच्या संगतीत नेहमी राहावे. त्यांचा योग्य तो सल्ला घ्यावा. थोरामोठ्यांचा आदर करावा. त्यांचे अनुभवाचे बोल ग्रहण करावेत. चांगल्या संस्कारमय पुस्तकांचे वाचन करावे, सद्विचाराने वर्तन करावे, दुसऱ्यांचे मन जाणून घ्यावे. शक्यतो परोपकार करावा. आपल्या वागण्याने कुणीही दुखावणार नाही याची काळजी घ्यावी. प्रेममय हृदय धारण करावे. जनात आपण प्रिय ठरू असे वर्तन करावे.

Marathi Kumarbharti Class 10 Textbook Solutions Chapter 12 भरतवाक्य Additional Important Questions and Answers

प्रश्न. पुढील कवितेच्या आधारे दिलेल्या सूचनांनुसार कृती करा:

कृती १: (आकलन)

प्रश्न 1.
आकृती पूर्ण करा:


उत्तर:

Maharashtra Board Class 10 Marathi Solutions Chapter 12 भरतवाक्य

– (सराव कृतिपत्रिका-२)

सुसंगति सदा घडो; सुजनवाक्य कानी पडो;
कलंक मतिचा झडो; विषय सर्वथा नावडो;
सदंघ्रिकमळी दडो; मुरडितां हटानें अडो;
वियोग घडतां रडो; मन भवच्चरित्री जडो।।
न निश्चय कधी ढळो; कुजनविघ्नबाधा टळो;
न चित्त भजनीं चळो; मति सदुक्तमार्गी वळो;
स्वतत्व हृदया कळो; दुरभिमान सारा गळो;
पुन्हां न मन हे मळो; दुरित आत्मबोधे जळो।।
मुखी हरि! वसो तुझी कुशलधामनामावली,
क्षणांत पुरवील जी सकलकामना मावली;
कृपा करिशि तूं जगत्रयनिवास दासावरी,
तशी प्रगट हे निजाश्रितजनां सदा सांवरी।।

– (केकावली)

कृती २: (आकलन)

प्रश्न 1.
‘कुशलधामनामावली मावली’ या कवीच्या कल्पनेतील कुशलधामनामावली व मावली यांच्यातील साम्य स्पष्ट करा: (सराव कृतिपत्रिका-२)

कुशलधामनामावली – मावली (माऊली)
(i) ……………………… – (i) ………………………
(ii) ……………………… – (ii) ………………………
(iii) ……………………… – (iii) ………………………
उत्तर:
कुशलधामनामावली – मावली (माऊली)
(i) आश्रयाला आलेल्या लोकांना सावरते. – (i) सन्मार्ग दाखवते.
(ii) संकटकाळी धावून येऊन कृपा करते. – (ii) सर्व लोकांचे कल्याण करते.

कृती ३: (काव्यसौंदर्य)

प्रश्न 1.
‘कृपा करिशि तूं जगत्रयनिवास दासावरी, तशी प्रगट हे निजाश्रितजना सदा सांवरी।।’ या काव्यपंक्तीतील भावसौंदर्य स्पष्ट करा.
उत्तर:
कवी मोरोपंत यांनी “भरतवाक्य’ या केकावलीमध्ये भक्तिमार्गाने परमार्थसाधना करणाऱ्या साधकांच्या वतीने परमेश्वराकडे करुणा भाकली आहे.

कवी मोरोपंत म्हणतात – हे प्रभो, तुझ्या नामस्मरणाने शरीररूपी घर पावन होवो व कुशल राहो. स्वर्गलोक, इहलोक व पाताळलोक या तिन्ही जगात राहणारे तुझे जे भक्त आहेत, ते तुझे दास आहेत. ते तुला मनोभावे शरण आले आहेत. तुझ्या आश्रयाला आलेल्या या भक्तजनांवर तू तुझा कृपावर्षाव कर, तुझी कृपा प्रगट कर आणि या भक्तांना नेहमी आधार देऊन त्यांचे जीवन सावर.

अत्यंत लीन शब्दांत कवींनी परमेश्वराची आर्त आळवणी केली आहे.

Maharashtra Board Class 10 Marathi Solutions Chapter 12 भरतवाक्य

प्रश्न. पुढील कवितेसंबंधीत्याखाली दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा:

कविता-भरतवाक्य. (मार्च १९)
उत्तर:
(१) प्रस्तुत कवितेचे कवी: मोरोपंत.
(२) कवितेचा रचनाप्रकार: आर्या.
(३) कवितेचा काव्यसंग्रह: केकावली.
(४) कवितेचा विषय: सज्जन माणसाचे महत्त्व,
(५) कवितेतून व्यक्त होणारा (स्थायी) भाव: सज्जन माणसाच्या सहवासात राहणे सुखकारक असते.

(६) कवितेच्या कवींची लेखनवैशिष्ट्ये: ही कविता आर्या या वृत्तात लिहिलेली आहे. या आर्याची चालही जनमानसात खूप लोकप्रिय झालेली आहे. कर्णमधुर चालीमुळे ही कविता गुणगुणत राहावीशी वाटते. या कवितेत ‘सुजनवाक्य’, ‘सदैनिकमळी’, ‘कुजनविघ्नबाधा’, ‘सदुक्तमार्गी’, ‘स्वतत्त्व’, ‘कुशलधामनामावली’ यांसारखे संस्कृतप्रचुर शब्द आहेत. अशा शब्दांनी भारदस्तपणा येतो. त्याचबरोबर ‘घडो’, ‘पडो’, ‘जडो’, ‘मुरडिता’, ‘इटाने’, ‘ढळो’ यांसारखे अस्सल मराठी शब्दही या कवितेत आढळतात. त्यामुळे आशय सामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्यास मदत होते. भाषा आवाहक बनते. यमकप्रधानता असल्यामुळे सुंदर लय व खटकेबाज नादमयता निर्माण झाली आहे.

(७) कवितेची मध्यवर्ती कल्पना: माणसाने नेहमी सज्जन माणसाच्या संगतीत राहावे. सुवचनांमध्ये सांगितलेले विचार अंगीकारावेत आणि त्यानुसार वागावे. खोटा अभिमान न बाळगता व मोहाला बळी न पडता सत्कर्म करून भक्तिमार्गाचा अवलंब करावा, हा मोरोपंतांनी केलेला उपदेश कवितेच्या केंद्रस्थानी आहे.

(८) कवितेतून व्यक्त होणारा विचार: माणसाने सतत परमेश्वराचे नामस्मरण करावे. दुरभिमान, गर्विष्ठपणा, वाईट विचार आपल्या मनातून नष्ट झाले पाहिजेत. चांगल्या विचारांचे वळण लागावे अशी मोरोपंत इच्छा व्यक्त करतात. चांगले वागणे म्हणजे काय, हे समजून घेण्यासाठी सदोदित सज्जनांच्या संगतीत राहावे, लोकांनी सज्जनांचे वागणे, त्यांचे बोलणे, त्यांचे विचार अंगीकारावेत, हा विचार या कवितेत मांडला आहे.

(९) कवितेतील आवडलेली ओळ:
सुसंगति सदा घडो; सुजनवाक्य कानी पडो;
कलंक मतिचा झडो; विषय सर्वथा नावडो;

(१०) कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे: ही कविता मला आवडते. कारण लहानपणापासून मी ती ऐकत आलो आहे. लहानपणी ती पाठही केली होती. आता मोठा झाल्यावर कवितेचा अर्थ कळला आहे. कवितेत चांगले वागण्याचा सल्ला दिला आहे. पण चांगले म्हणजे काय, हे सोप्या पद्धतीने सांगितले आहे. सज्जन माणूस जसे वागतो, बोलतो, विचार करतो, तसे म्हणजे चांगले, इतकी सोपी कल्पना वापरून आपले म्हणणे सांगितले आहे. पण या कवितेतील संस्कृतप्रचुर शब्दांमुळे अर्थ कळण्यात अडचणी येतात. ही एक कवितेविषयी नावड निर्माण करणारी बाब आहे.

(११) कवितेतून मिळणारा संदेश: नेहमी संतसज्जनांच्या संगतीत राहावे. त्यांच्या सहटासामुळे चांगले वागण्याचे दर्शन घडते. त्यांच्याप्रमाणे वागण्याची प्रेरणा मिळते. त्यांच्या विचारांसारखे विचार आपण अंगीकारू लागतो. तसेच नेहमी देवाचे नामस्मरण करीत राहावे. म्हणजे वाईट कल्पना, वाईट विचार आपल्या मनाला शिवत नाहीत…

व्याकरण व भाषाभ्यास

(कृतिपत्रिकेतील प्रश्न ४ (अ) आणि (आ) यांसाठी…

व्याकरण घटकांवर आधारित कृतीः
१. समास:

पुढील सामासिक शब्दांचा विग्रह करा:
(i) हरघडी
(ii) देवघर
(iii) रामलक्ष्मण
(iv) अंथरुण पांघरुण
(v) रावरंक
(vi) नवरात्र.
उत्तर:
सामासिक शब्द – विग्रह
(i) हरघडी – प्रत्येक घडीला
(ii) देवघर – देवासाठी घर
(iii) रामलक्ष्मण – राम आणि लक्ष्मण
(iv) अंथरुण पांघरुण – अंथरुण, पांघरुण वगैरे
(v) रावरंक – राव किंवा रंक
(vi) नवरात्र – नऊ रात्रीचा समूह

Maharashtra Board Class 10 Marathi Solutions Chapter 12 भरतवाक्य

२. अलंकार:

पुढील आकृतीवरून अलंकार ओळखा व एक उदाहरण दया:
निर्जीव वस्तू → मानवी भावनांचे → सजीव समजणे आरोपण
उत्तर:
अलंकार → चेतनागुणोक्ती
उदा., डौलदार ही गिरीशिखरे धापाच टाकू लागतात.

३. वृत्त:

पुढील ओळीचा लगक्रम लिहा:
सुसंगति सदा घडो;
सुजनवाक्य कानी पडो
उत्तर:

४. शब्दसिद्धी:
(१) ‘सु’ उपसर्ग असलेले चार शब्द लिहा:
जसे: सु + संगती → सुसंगती
उत्तर:
सुजन → सुवचन → सुविचार → सुमन

(२) पुढील शब्दांना ‘आवली’ प्रत्यय लावून शब्द तयार करा:
(i) नाम – [ ]
(ii) रंग – [ ]
उत्तर:
(i) नामावली
(i) रंगावली

५. सामान्यरूप:

पुढील शब्दांची सामान्यरूपे लिहा:
(i) दुरिताचे – ……………………………..
(ii) मार्गाला – ……………………………..
(iii) कमळात – ……………………………..
(iv) मनाने – ……………………………..
उत्तर:
(i) दुरिता
(ii) मार्गा
(iii) कमळा
(iv) मना.

Maharashtra Board Class 10 Marathi Solutions Chapter 12 भरतवाक्य

भाषिक घटकांवर आधारित कृती:

१. शब्दसिद्धी:

(१) समानार्थी शब्द लिहा:
(i) मती = ……………………………..
(i) कलंक = ……………………………..
(iii) निश्चय = ……………………………..
(iv) संगत = ……………………………..
उत्तर:
(i) मती = बुद्धी
(ii) कलंक = डाग
(iii) निश्चय = निर्धार
(iv) संगत = सोबत.

(२). विरुद्धार्थी शब्द लिहा:
(i) नावडो x ……………………………..
(ii) वियोग x ……………………………..
(iii) दुरभिमान x ……………………………..
(iv) दास x ……………………………..
(v) दुरित x ……………………………..
(vi) कृपा x ……………………………..
उत्तर:
(i) नावडो x आवडो
(ii) वियोग – मीलन
(iii) दुरभिमान x अभिमान
(iv) दास x मालक
(v) दुरित x सज्जन
(vi) कृपा x अवकृपा.

(३) पुढील शब्दांचे दोन अर्थ लिहा:
(i) [ ] ← सारा → [ ]
(ii) [ ] ← विषय → [ ]
उत्तर:
(i) सर्व ← सारा → कर
(ii) वासना ← विषय → अभ्यासातील घटक

Maharashtra Board Class 10 Marathi Solutions Chapter 12 भरतवाक्य

(४) पुढील शब्दांच्या अक्षरातून चार अर्थपूर्ण शब्द लिहा:
(1) दुरभिमान
(ii) कुशलधामनामावली
उत्तर:
(i) दुरभिमान → [भिमा] [रमा] [मार] [मान]
(ii) कुशलधामनामावली → [कुशल] [घाम] [नाम] [नाव]

२. लेखननियम:
अचूक शब्द ओळखा:
(i) दुष्टि – ………………………
(ii) वेशीष्ट्य – ………………………
(iii) किर्ति – ………………………
(iv) शिषर्क – ………………………
(v) सूज्ञ – ………………………
(vi) जेष्ट – ………………………
(vi) हींस्त्र – ………………………
(viii) उप्तन – ………………………
उत्तर:
(i) दुष्टि – दृष्टी
(ii) वेशीष्ट्य – वैशिष्ट्य
(iii) किर्ति – कीर्ती
(iv) शिषर्क – शीर्षक
(v) सूज्ञ – सुज्ञ
(vi) जेष्ट – ज्येष्ठ
(vii) हींस्त्र – हिंस
(viii) उप्तन – उत्पन्न

Maharashtra Board Class 10 Marathi Solutions Chapter 12 भरतवाक्य

३. विरामचिन्हे:
पुढील विरामचिन्हे ओळखा:
(१) [ : ]
(२) [ – ]
(३) [ ” ” ]
(४) [ – ]
उत्तर:
(१) [ : ] अपूर्ण विराम
(२) [ – ] अपसारण चिन्ह
(३) [ ” ” ] दुहेरी अवतरणचिन्ह
(४) [ – ] संयोग चिन्ह.

४. पारिभाषिक शब्द:
योग्य पर्याय निवडा:
(i) Sonnet – …………………….
(१) पुनीत
(२) सुनीत
(३) विनीत
(४) पुलकित
उत्तर:
(२) सुनीत

(ii) Lyric – …………………….
(१) ओळी
(२) अभावगीत
(३) भावगीत
(४) गाणे
उत्तर:
(३) भावगीत

(iii) Magazine – …………………….
(१) मासिक
(२) पाक्षिक
(३) द्वैमासिक
(४) नियतकालिक
उत्तर:
(४) नियतकालिक

Maharashtra Board Class 10 Marathi Solutions Chapter 12 भरतवाक्य

(iv) Trade Mark – …………………….
(१) शोधचिन्ह
(२) बोधचिन्ह
(३) विधीचिन्ह
(४) निधीचिन्ह
उत्तर:
(२) बोधचिन्ह

५. अकारविल्हे/ भाषिक खेळ

पुढील शब्द अकारविल्हेनुसार लिहा:
सुसंगती → कमळ → हरी → वियोग,
उत्तर:
कमळ → वियोग → सुसंगती → हरी.

कवितेचा भावार्थ
चारित्र्यसंपन्न होण्यासाठी संसारीजनांना मोलाचा उपदेश करताना कवी मोरोपंत म्हणतात – नेहमी सज्जन माणसांची मैत्री जडावी. सुविचार, सुवचने कानांवर पडावीत. बुद्धीचे (मांदय), बुद्धीतील वाईट विचार झडून बुद्धी शुद्ध व्हावी, विवेकी व्हावी. कामवासनेविषयी संपूर्णत: नावड निर्माण होवो. भुंगा जसा कमळात अडकतो, सुगंधाने धुंद होऊन निग्रहाने तिथून हटत नाही जर कमळाचा विरह झाला, तर तो रडतो. त्याप्रमाणे कमळातील मधुसेवन करणाऱ्या भुंग्याप्रमाणे मन सज्जनांच्या पायी गुंतो, आपले मन भक्तिमार्गात, भवचरित्रात, परमार्थात जडून राहू दे.।।

दृढ निर्धार कधीही ढळू देऊ नये. वाईट माणसांचे विघ्न टळून जाऊ दे, त्यांच्या अडचणीची बाधा आपल्याला होऊ नये. परमेश्वराचे नामस्मरण करताना मन चंचल होऊ नये. चांगला मार्ग आचरण्यासाठी बुद्धीला वळण लागो. स्वत:चे स्वत्व हृदयाला कळू दे. स्वत:ची ओळख, आत्मविश्वास वाढू दे. दुरभिमान, गर्विष्ठपणा गळून जाऊ दे. मन कधीही वाईट विचारांनी मलीन होऊ नये. आत्मज्ञानामध्ये सर्व अनिष्ट, दुरित भस्मसात होऊ दे.।।

हे देवा, तुझे नाव माझ्या मुखातून सदैव येत राहो. माझे शरीररूपी घर तुझ्या नामोच्चाराने कुशल व पावन होवो. तुझ्या नामस्मरणाने माझ्या मनाच्या सर्व इच्छा तत्काळ पुरवल्या जातात. तिन्ही जगांत (स्वर्गलोक, इहलोक व पाताळ) राहणाऱ्या भक्तांवर तू कृपावंत होतोस, तशी तुझ्या आश्रयाला आलेल्या, शरण आलेल्या भक्तांवर तुझी कृपा प्रकट होऊ दे.।।

भरतवाक्य कवितेची मध्यवर्ती कल्पना
माणसाने नेहमी सज्जन माणसाच्या संगतीत राहावे व सुवचनांच्या विचारांनी वागावे. खोटा अभिमान न बाळगता व मोहाला बळी न पडता सत्कर्म करून भक्तिमार्गाचे अवलंबन करावे, असा उपदेश कवी मोरोपंतांनी या केकावलीमध्ये केला आहे.

भरतवाक्य शब्दार्थ