Balbharti Maharashtra State Board Class 10 Marathi Solutions Kumarbharti Chapter 13 कर्ते सुधारक कर्वे Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.
Marathi Kumarbharti Std 10 Digest Chapter 13 कर्ते सुधारक कर्वे Textbook Questions and Answers
प्रश्न 1.
खालील आकृत्या पूर्ण करा.
प्रश्न 2.
महर्षी कर्वे यांच्या कार्यकुशलतेचा ओघतक्ता तयार करा.
प्रश्न 3
हे केव्हा घडेल ते लिहा.
(अ) का सुधारकाने सुरू केलेले कार्य पूर्णत्वास जाईल – ……………………………………..
(आ) स्त्री पुरुषांशी स्पर्धा करू शकेल – ……………………………………..
उत्तर :
(अ) का सुधारकाने सुरू केलेले कार्य पूर्णत्वास जाईल, जेव्हा पुरुषांचेही ‘शिक्षण’ होईल.
(आ) स्त्री पुरुषांशी स्पर्धा करू शकेल, जेव्हा ती उच्चविद्याविभूषित होईल.
प्रश्न 4.
चौकटी पूर्ण करा.
(अ) लेखकांच्या मते दुसऱ्याच्या दुःखात दुःखी व सुखात सुखी होणारा – [ ]
(आ) कर्वे यांना लोकमानसाने दिलेली पदवी – [ ]
उत्तर :
(अ) लेखकांच्या मते, दुसऱ्याच्या दुःखात – स्थितप्रज्ञ दुःखी व सुखात सुखी होणारा
(आ) कर्वे यांना लोकमानसाने दिलेली पदवी – महर्षी
प्रश्न 5.
पाठाच्या आधारे वाक्यांचा उर्वरित भाग लिहून वाक्ये पूर्ण करा.
(अ) स्त्रीने स्वातंत्र्य कमवावे असे वाटणे म्हणजे
(आ) समाजाविरूद्ध विद्रोह केला तर
(इ) लोकांनी कर्वे यांची ससेहोलपट चालवली तरी
उत्तर:
(i) स्त्रीने स्वातंत्र्य कमवावे असे वाटणे म्हणजे खडकावर डोके आपटण्यासारखे आहे.
(ii) समाजाविरुद्ध विद्रोह केला तर विद्रोह करणाऱ्याला समाज गिळून टाकायला येईल.
(iii) लोकांनी कर्वे यांची ससेहोलपट चालवली तरी कव्यांनी त्यांना शिव्याशाप दिले नाहीत किंवा आपल्या कार्यापासून कर्वे विचलित झाले नाहीत.
प्रश्न 6.
‘कार्य’ या शब्दासाठी पाठात आलेली विशेषणे शोधा.
उत्तर:
कार्य या नामाची विशेषणे : मोठे, अतोनात, कठीण, ऐतिहासिक, जटिल, अटीतटीचे, महाकठीण, अलौकिक, महान इत्यादी.
प्रश्न 7.
खालील वाक्यांतील वाक्प्रचार शोधा.
(अ) शिक्षकांनी सांगितलेली हृदय आठवण आमच्या मनात घर करून राहिली.
(आ) वक्त्याचे विचार अनेकांच्या पचनी पडले नाहीत.
उत्तर:
(अ) मनात घर करून राहणे.
(आ) पचनी न पडणे.
प्रश्न 8.
खालील वाक्यांतील उभयान्वयी अव्यये शोधून लिहा.
(अ) त्याने लाडू व करंज्या खाल्ल्या.
(आ) पाऊस आला आणि गारा पडल्या.
(इ) तो येणार, कारण त्याला पैशांची गरज आहे.
(ई) आजी म्हणाली, की मी उद्या गावाला जाणार आहे.
उत्तर:
(i) व
(ii) आणि
(iii) कारण
(iv) की.
प्रश्न 9.
केवलप्रयोगी अव्ययांचा वापर करून वाक्ये पुन्हा लिहा.
(अ) …………..! काय सुंदर देखावा आहे हा!
(आ) ………….! असा प्रसंग वैऱ्यावर देखील येऊ नये,
(इ) …………..! तुझी कल्पनाच मुळी मला पसंत नाही.
(ई) …………..! आज तू खूप चांगला खेळलास.
उत्तर:
(i) ओहो! काय सुंदर देखावा आहे हा!
(ii) अरेरे! असा प्रसंग वैऱ्यावर देखील येऊ नये.
(iii) छे! तुझी कल्पनाच मुळी मला पसंत नाही.
(iv) वाहव्वा! आज तू फार चांगला खेळलास.
प्रश्न 10.
स्वमत.
(अ) ‘स्त्रियांनी शिकणे अत्यंत गरजेचे आहे’, या विधानामागील अण्णांचा दृष्टिकोन स्पष्ट करा.
उत्तर :
समाजात स्त्रियांची संख्या पुरुषांइतकीच असते. थोडी कमी-जास्त भरेल. पण साधारणपणे स्त्रिया म्हणजे समाजाचा अर्धा भाग होय. दुर्दैवाने आपल्या समाजाने स्त्रियांना मागासलेले ठेवले. त्यामुळे अर्धा समाज मागासलेला राहिला. त्याचे अनंत तोटे समाजाला आजसुद्धा भोगावे लागत आहेत. बहुतेक वेळा हे नुकसान मोजता येत नाही. मोजता न आल्यामुळे आपले किती नुकसान झालेले आहे, हे कळतही नाही. स्त्रियांना मागासलेले ठेवल्यामुळे समाजाची अर्धी बुद्धिमत्ता निरुपयोगी राहते. त्या बुद्धीचा समाजाला उपयोग झाला असता, पण ती वाया जाते. पुरुष बहुतांश वेळा स्वार्थी व आत्मकेंद्री असतो, स्त्री अधिक सामाजिक असते. यामुळे कुटुंबातला पुरुष शिकला तर कुटुंबातील एका व्यक्तीचा विकास होतो. मात्र स्त्री शिकली तर त्याचा परिणाम संपूर्ण कुटुंबावर होतो. अखंड कुटुंब शिक्षित होते. आपण हे ओळखले पाहिजे. स्त्रीला पुरुषांच्या बरोबरीचे स्थान दिले पाहिजे.
(आ) ‘जया अंगी मोठेपण, तया यातना कठीण’ हे वचन महर्षी कर्वे यांच्या जीवनाला कसे लागू पडते, ते स्पष्ट करा.
उत्तर :
अण्णासाहेबांनी फार मोठे स्वप्न पाहिले होते. ते फार मोठी ! झेप घेऊ पाहत होते. त्यांच्या स्वप्नाला संपूर्ण समाजाची साथ मिळाली नाही. समाजाने अण्णासाहेबांना ओळखलेच नाही. समाजाने साथ दिली नाहीच; उलट पराकोटीचा विरोध केला. त्यांचा सतत अपमान केला. त्यांना धक्काबुक्की केली. त्यांचे कपडे फाडले. हे रोज घडत होते. त्यामुळे स्वत:चे कपडे रोज रोज शिवण्याची पाळी त्यांच्यावर येई. स्त्री-शिक्षणासाठी देणग्या गोळा केल्या तर भ्रष्टाचाराचा सतत धाक दाखवला जाई. त्यांच्या चळवळीमुळे कुटुंबीयांनाही त्रास सहन करावा लागे. त्यांच्यावर बहिष्कार टाकण्यातही आला होता. हे सर्व यातनामय होते. लोककल्याणासाठी अण्णासाहेबांनी या यातना सहन केल्या. आज आपण अण्णासाहेबांची स्मारके उभारतो. परंतु प्रत्यक्ष जीवनात त्यांना दुःख, कष्ट आणि यातनाच सहन कराव्या लागल्या. ‘जया अंगी मोठेपण, तया यातना कठीण’ हे तुकाराम महाराजांचे वचन अण्णासाहेबांना तंतोतंत लागू पडते.
(इ) ‘कर्ते सुधारक कर्वे’ या पाठातून महर्षी अण्णा कर्वे यांचे तुम्हाला जाणवलेले वेगळेपण, तुमच्या शब्दांत सांगा.
उत्तर :
अण्णासाहेब कर्वे यांचे फार मोठे वेगळेपण या पाठातून वाचकांसमोर येते, बऱ्याच वेळा सामाजिक कार्य करणाऱ्या लोकांना स्वतःच्या सामाजिक कार्याचा गर्व असतो. ती माणसे या गर्वामुळे आक्रमक बनतात, अण्णासाहेबांची प्रकृती याबाबतीत नेमकी उलटी होती. त्यांना प्रचंड आत्मविश्वास होता. पण गर्व नव्हता. ते कधीच आक्रमक बनले नाहीत, उलट ते शांतपणे, कोणावरही न रागावता, आक्रस्ताळेपणा न करता आपले काम करीत. त्यांचे अपमान झाले. अडवणूक झाली. त्यांच्यावर हल्ले झाले. जाता-येता त्यांचे कपडे फाडले गेले. पण ते विचलित झाले नाहीत. घाबरले नाहीत किंवा दुःखी-कष्टीही झाले नाहीत. ते स्थितप्रज्ञाप्रमाणे शांत राहिले. नव्हे ते स्थितप्रज्ञच होते. हा त्यांचा गुण, त्यांचा वेगळेपणा मला खूप भावला आहे. खूप आवडला आहे.
Marathi Kumarbharti Class 10 Textbook Solutions Chapter 13 कर्ते सुधारक कर्वे Additional Important Questions and Answers
कृति
कृतिपत्रिकेतील प्रश्न १ (अ) आणि (आ) यांसाठी…
उतारा क्र.१
प्रश्न. पुढील उतारा वाचा आणि दिलेल्या सूचनांनुसार कृती करा :
कृती १ : (आकलन)
प्रश्न 1.
कारणे लिहा :
(i) नातेवाईक नसलेले महर्षी कर्वे हे निवर्तल्यानंतर लेखकांच्या आजोबांच्या डोळ्यांत अश्रू आले; कारण –
(ii) अण्णासाहेब कर्वे यांच्या मते, केवळ राष्ट्रीय स्वातंत्र्य मिळणे उपयोगाचे नव्हते; कारण –
(iii) भारतीय स्त्री स्वत:च आपल्या गुलामीला दागिना मानीत होती; कारण –
उत्तर:
(i) नातेवाईक नसलेले महर्षी कर्वे हे निवर्तल्यानंतर लेखकांच्या आजोबांच्या डोळ्यांत अश्रू आले; कारण महान कार्य केलेले महर्षी कर्वे आपल्यातून गेले याची दुःखद जाणीव आजोबांना झाली.
(ii) अण्णासाहेब कर्वे यांच्या मते, केवळ राष्ट्रीय स्वातंत्र्य मिळणे उपयोगाचे नव्हते; कारण स्त्रियांना स्वातंत्र्य मिळाले नाही, तर राष्ट्रीय स्वातंत्र्याला काहीही अर्थ राहत नाही.
(iii) भारतीय स्त्री स्वत:च आपल्या गुलामीला दागिना मानीत होती; कारण तसे मानण्याचे संस्कारच तिच्यावर झाले होते.
प्रश्न 2.
विसंगती लिहा :
(i) अण्णासाहेब कर्वे समाजासाठी कार्य करीत होते, पण समाज ………………………………
(ii) आपल्या समाजात स्त्रीला देवीचे स्थान आहे, असे दाखवले जाते, पण प्रत्यक्षात मात्र ………………………………
(iii) भारतीय स्त्री गुलामीत जगत होती, पण ती ………………………………
उत्तर:
(i) अण्णासाहेब कर्वे समाजासाठी कार्य करीत होते, पण समाज त्यांना समाजविरोधक समजत होता.
(ii) आपल्या समाजात स्त्रीला देवीचे स्थान आहे, असे दाखवले जाते, पण प्रत्यक्षात मात्र तिला शूद्रातिशूद्र समजून तिचा प्रच्छन्न छळच केला जाई.
(iii) भारतीय स्त्री गुलामीत जगत होती, पण ती आपल्या गुलामीलाच दागिना समजत होती.
प्रश्न 3.
माहिती लिहा :
(i) अण्णासाहेब कर्वे यांनी घालून दिलेला वस्तुपाठ
(ii) प्रा. अण्णासाहेब कर्वे यांचा कॉलेजात शिकवण्याचा विषय
(iii) त्या वेळच्या अज्ञ समाजाने मानलेले स्वत:चे ‘ऐतिहासिक कार्य
(iv) अण्णासाहेबांनी सुरुवातीला स्थापन केलेली संस्था
(v) अनाथ बालिकाश्रमाचे रूपांतर झालेली संस्था
(vi) निधी उभारणीसाठी अण्णासाहेबांनी निर्माण केलेल्या यंत्रणा
उत्तर:
(i) अण्णासाहेब कर्वे यांनी घालून दिलेला वस्तुपाठ – पहिल्या पत्नीच्या मृत्यूनंतर त्यांनी स्वतः विधवेशी विवाह केला.
(ii) प्रा. अण्णासाहेब कर्वे यांचा कॉलेजात शिकवण्याचा विषय – गणित.
(iii) त्या वेळच्या अज्ञ समाजाने मानलेले स्वत:चे ‘ऐतिहासिक कार्य’ – सत्पुरुषांचा छळ करावा.
(iv) अण्णासाहेबांनी सुरुवातीला स्थापन केलेली संस्था – अनाथ बालिकाश्रम.
(v) अनाथ बालिकाश्रमाचे रूपांतर झालेली संस्था – हिंगणे स्त्री-शिक्षण संस्था.
(vi) निधी उभारणीसाठी अण्णा साहेबांनी निर्माण केलेल्या यंत्रणा – ‘पै पै चा निधी’ आणि ‘मुरूड निधी.’
कृती ३ : (व्याकरण)
प्रश्न 1.
कंसांतील सूचनांनुसार उत्तर: लिहा :
(i) सुरुवात त्यांनी स्वत:पासून केली. (अधोरेखित शब्दाच्या जागी ‘करतात’ हा शब्द वापरून वाक्य पुन्हा लिहा.)
(ii) त्याच अनपढ राहिल्या तर? (अधोरेखित शब्दाच्या जागी ‘तीच’ हा शब्द वापरून वाक्य पुन्हा लिहा.)
(iii) कव्यांच्या पुतळ्याच्या मागे एक मुलगी रडत बसली होती. (‘मुलगा’ हा शब्द अधोरेखित शब्दाच्या जागी योजा आणि वाक्य पुन्हा लिहा.)
उत्तर:
(i) सुरुवात ते स्वत:पासून करतात.
(ii) तीच अनपढ़ राहिली तर?
(iii) कर्त्यांच्या पुतळ्याच्या मागे एक मुलगा रडत बसला होता.
प्रश्न 2.
अनेकवचन लिहा :
(i) रात्र
(ii) डोळा
(iii) कार्य
(iv) स्त्री
(v) पोथी
(vi) मेढ.
उत्तर:
(i) रात्र – रात्री
(ii) डोळा – डोळे
(iii) कार्य – कायें
(iv) स्त्री – स्त्रिया
(v) पोथी – पोथ्या
(vi) मेढ – मेढी.
उतारा क्र. २
प्रश्न. पुढील उतारा वाचा आणि दिलेल्या सूचनांनुसार कृती करा :
कृती १: (आकलन)
प्रश्न 1.
आकृती पूर्ण करा :
प्रश्न 3.
चौकटी पूर्ण करा :
(i) कर्वे यांना राजमानसाने दिलेली पदवी
उत्तर :
(i) कर्वे यांना राजमानसाने दिलेली पदवी – भारतरत्न।
कृती २ : (आकलन)
प्रश्न 1.
आकृत्या पूर्ण करा :
कृती ३ : (व्याकरण)
प्रश्न 1.
पुढील वाक्यातील नामे ओळखा आणि ती मूळ रूपांत लिहा :
महर्षी कर्वे यांनी ‘अनाथ बालिकाश्रमा’ची मुहूर्तमेढ रोवली.
उत्तर:
नामे : महर्षी, बालिकाश्रम, मुहूर्तमेढ.
प्रश्न 2.
पुढील वाक्यातील उभयान्वयी अव्यये लिहा :
तिला स्वतंत्र व्हायचे असेल तर तिला भान यावयास हवे, की आपण गुलाम आहोत आणि हे भान शिक्षणाशिवाय येऊ शकत नाही.
उत्तर:
उभयान्वयी अव्यये : तर, की, आणि.
प्रश्न 3.
अधोरेखित शब्दातील प्रत्यय ओळखा आणि तो प्रत्यय जोडलेले अन्य दोन शब्द लिहा :
स्त्रीने शिक्षित झालेच पाहिजे.
उत्तर:
प्रत्यय : इत. अन्य शब्द : प्रमाणित, प्रभावित.
प्रश्न 4.
पुढील शब्दांतून शब्दयोगी अव्यय जोडलेले शब्द ओळखून लिहा :
शिक्षणाशिवाय, विरोधाभास, ऋणातही, व्यक्तीसारखा, अर्धागवायू, दुसरीकडे, पृथ्वीबाहेर, जगप्रवास, पुरुषप्रधान, स्त्रियांवरील, जन्मलेला.
उत्तर:
शिक्षणाशिवाय, ऋणातही, व्यक्तीसारखा, दुसरीकडे, पृथ्वीबाहेर, स्त्रियांवरील.
व्याकरण व भाषाभ्यास
कृतिपत्रिकेतील प्रश्न ४ (अ) आणि (आ) यांसाठी…
व्याकरण घटकांवर आधारित कृती :
१. समास :
(१) पुढील विग्रहांवरून सामासिक शब्द तयार करा :
(i) खाणे, पिणे वगैरे
(ii) चार कोनांचा समूह
(iii) पास किंवा नापास
(iv) प्रत्येक रस्त्यावर
(v) बाप आणि लेक
(vi) वसतीसाठी गृह.
उत्तर:
विग्रह – सामासिक शब्द
(i) खाणे, पिणे वगैरे – खाणेपिणे
(ii) चार कोनांचा समूह – चौकोन
(iii) पास. किंवा नापास – पासनापास
(iv) प्रत्येक रस्त्यावर – रस्तोरस्ती
(v) बाप आणि लेक – बापलेक
(vi) वसतीसाठी गृह – वसतिगृह
(२) पुढील तक्ता पूर्ण करा : (सराव कृतिपत्रिका-३)
समासाचे नाव – उदाहरण – समास विग्रह
(i) समाहार वंद्व समास – केरकचरा – ……………………….
(ii) ………………………. – प्रतिक्षण – प्रत्येक क्षणाला
(iii) द्विगू समास – ………………………. – पाच आरत्यांचा समूह
(iv) विभक्ती तत्पुरुष समास – ………………………. – राजाचा वाडा
उत्तर:
समासाचे नाव – उदाहरण – समास विग्रह
(i) समाहार द्वंद्व समास – केरकचरा केर, कचरा वगैरे
(ii) अव्ययीभाव समास – प्रतिक्षण प्रत्येक क्षणाला
(iii) द्विगू समास – पंचारती पाच आरत्यांचा समूह
(iv) विभक्ती तत्पुरुष समास – राजवाडा राजाचा वाडा
२. अलंकार :
पुढील आकृती पाहून अलंकार ओळखा व एक उदाहरण दया :
३. वृत्त:
(१) पुढील ओळीचा लगक्रम लिहा :
प्रभाते मनी राम चिंतीत जावा
उत्तर :
(२) पुढील काव्यपंक्तीतील वृत्त ओळखा : (सराव कृतिपत्रिका-१)
द्रव्यास हे गमन मार्ग यथावकाश
उत्तर:
४. शब्दसिद्धी :
(१) पुढील शब्दांना ‘इक’ हा प्रत्यय लावून शब्द बनवा :
जसे → नगर + इक → नागरिक
(i) समाज → [ ]
(ii) शरीर → [ ]
उत्तर:
(i) [सामाजिक]
(ii) [शारीरिक]
(२) परि’ हा उपसर्ग लावून दोन शब्द तयार करा :
जसे → परि + पूर्ण → परिपूर्ण
(i) क्रमा → [ ]
(ii) श्रम → [ ]
उत्तर:
(i) [परिक्रमा]
(ii) [परिश्रम]
(३) ‘अडीअडचणी’ सारखे पाठातील चार अभ्यस्त शब्द लिहा :
उत्तर:
(i) धक्काबुक्की
(ii) हालअपेष्टा
(iii) अटीतटी
(iv) कुरबूर
५. सामान्यरूप :
पुढील तक्ता पूर्ण करा :
शब्द – विभक्ती प्रत्यय – सामान्यरूप
(i) दु:खात – …………………… – ……………………
(ii) कव्यांनी – …………………… – ……………………
(iii) कन्येशी – …………………… – ……………………
(iv) स्वातंत्र्याचा – …………………… – ……………………
उत्तर:
शब्द – विभक्ती प्रत्यय – सामान्यरूप
(i) दु:खात – त – दु:ख
(ii) कव्यांनी – नी – कव्यां
(iii) कन्येशी – शी – कन्ये
(iv) स्वातंत्र्याचा – चा – स्वातंत्र्य
६. वाक्प्रचार :
(१) कंसातील वाक्प्रचारांचा त्या खालील वाक्यांत योग्य ठिकाणी वापर करून वाक्ये पुन्हा लिहा : (खूणगाठ बांधणे, वस्तुपाठ घालून देणे, मुहूर्तमेढ रोवणे, ससेहोलपट होणे)
(i) रात्रीच्या वेळी रानातला रस्ता शोधता शोधता प्रवाशांना खूप त्रास झाला.
(ii) गाडगेमहाराजांनी स्वच्छता मोहिमेचा पाया घातला,
(iii) अजयने दररोज नियमित व्यायाम करण्याचा मनाशी दृढ निश्चय केला.
(iv) जनसेवा कशी करावी, याचा महात्मा गांधीजींनी आदर्श घालून दिला.
उत्तर:
(i) रात्रीच्या वेळी रानातला रस्ता शोधता शोधता प्रवाशांची ससेहोलपट झाली.
(ii) गाडगेमहाराजांनी स्वच्छता मोहिमेची मुहूर्तमेढ रोवली.
(iii) अजयने दररोज नियमित व्यायाम करण्याची मनाशी खूणगाठ बांधली.
(iv) जनसेवा कशी करावी, याचा महात्मा गांधीजींनी वस्तुपाठ घालून दिला.
*(२) पुढील वाक्यांतील वाक्प्रचार शोधा :
(i) शिक्षकांनी सांगितलेली हृदय आठवण आमच्या मनात घर करून राहिली.
(ii) वक्त्याचे विचार अनेकांच्या पचनी पडले नाहीत.
आभाषिक घटकांवर आधारित कृती :
१. शब्दसंपत्ती :
(१) पुढील शब्दसमूहांसाठी एक शब्द लिहा :
(i) लिहिता-वाचता न येणारा – ………………………
(ii) चांगल्या प्रकारे शिक्षित असलेला – ………………………
(iii) लिहिता-वाचता येणारा – ………………………
(iv) जिचे सौभाग्य हरपले आहे अशी स्त्री – ………………………
(v) केलेले उपकार जाणणारा – ……………………… (मार्च १९)
(vi) कोणाचाही आधार नसलेला – ……………………… (मार्च १९)
उत्तर:
(i) निरक्षर
(ii) सुशिक्षित
(iii) साक्षर
(iv) विधवा
(v) कृतज्ञ
(iv) निराधार.
(४) विरुद्धार्थी शब्द लिहा :
(i) सहिष्णू x ……………………
(ii) स्वातंत्र्य x ……………………
(iii) सुरुवात x ……………………
(iv) जन्म x ……………………
(v) जमा x ……………………
(vi) सोय x ……………………
(vii) उधळपट्टी x ……………………
(viii) अनाथ x ……………………
उत्तर:
(i) सहिष्णू x असहिष्णू
(i) स्वातंत्र्य x पारतंत्र्य
(iii) सुरुवात x शेवट
(iv) जन्म र मृत्यू
(v) जमा x खर्च
(vi) सोय x गैरसोय
(vii) उधळपट्टी x कंजुषी
(viii) अनाथ x सनाथ.
(५) गटात न बसणारा शब्द लिहा :
(i) आई, वडील, बहीण, बायको, कन्या – ……………………
(ii) मन, तन, चित्त, जिव्हार, अंत:करण – ……………………
उत्तर:
(i) वडील
(ii) तन,
(६) दिलेल्या शब्दांतून दोन अर्थपूर्ण शब्द तयार करा :
(सराव कृतिपत्रिका-३) (नगर व पालिका हे दोन शब्द सोडून)
नगरपालिका → [ ] [ ]
उत्तर :
नगरपालिका – [नग] [नर]
२. लेखननियम :
(१) अचूक शब्द निवडा :
(i) विभूषित/वीभूषित/विभुशित/विभुषीत.
(ii) पुर्नविवाह/पुनर्विवाह/पूर्नवीवाह/पुनर्वीवाह.
(iii) शैक्षणीक शैक्षणिक/शैक्षाणिक/शैक्शणिक.
(iv) सावर्जनिक/सर्वजनिक/सार्वजनीक/सार्वजनिक.
उत्तर:
(i) विभूषित
(ii) पुनर्विवाह
(iii) शैक्षणिक
(iv) सार्वजनिक.
(२) पुढील वाक्ये लेखननियमांनुसार लिहा :
(i) सरस्वतिला आपन वाङमयाची जननि मानतो.
(ii) एकदा वीदयापिठातल्या कर्त्यांच्या पूतळ्यामागे एक मूलगी रडत बसलि होती.
उत्तर:
(i) सरस्वतीला आपण वाङ्मयाची जननी मानतो.
(ii) एकदा विदयापीठातल्या कर्त्यांच्या पुतळ्यामागे एक मुलगी रडत बसली होती.
३. विरामचिन्हे :
पुढील वाक्यांत योग्य विरामचिन्हे घालून वाक्ये पुन्हा लिहा :
(i) तिला म्हटले कर्त्यांच्या पुतळ्यापाशी बसून रडायला तुला काहीच कसे वाटत नाही
(ii) आपण आपल्या आईशी बहिणीशी बायकोशी कन्येशी पुष्कळदा चुकीचे वागतो
उत्तर:
(i) तिला म्हटले, “कर्त्यांच्या पुतळ्यापाशी बसून रडायला तुला काहीच कसे वाटत नाही?”
(ii) आपण आपल्या आईशी, बहिणीशी, बायकोशी, कन्येशी पुष्कळदा चुकीचे वागतो.
४. पारिभाषिक शब्द :
पुढील इंग्रजी पारिभाषिक शब्दांना मराठी प्रतिशब्द लिहा :
(i) Book Stall – ……………………………..
(ii) Book Post – ……………………………..
(iii) Casual Leave – ……………………………..
(iv) No Objection Certificate – ……………………………..
(v) Highway – …………………………….. (सराव कृतिपत्रिका-३)
(vi) Interview – …………………………….. (सराव कृतिपत्रिका-३)
उत्तर:
(i) Book Stall – पुस्तक विक्री केंद्र
(ii) Book Post – पुस्त-प्रेष
(iii) Casual Leave – नैमित्तिक रजा
(iv) No Objection Certificate – ना हरकत प्रमाणपत्र
(v) Highway – महामार्ग
(vi) Interview – मुलाखत.
५. अकारविल्हे/भाषिक खेळ :
(१) पुढील शब्द अकारविल्हेनुसार लिहा :
(i) चार → तीन → दोन → एक.
(ii) राग → क्रोध → संताप → चीड.
उत्तर:
(i) एक → चार → तीन → दोन,
(ii) क्रोध → चीड → राग → संताप.
(२) आकृती पूर्ण करा:
कर्ते सुधारक कर्वे शब्दार्थ
कर्ते सुधारक कर्वे टिपा
(१) भारतरत्न : भारतातील हा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. देशासाठी सर्वोच्च प्रतीचे आणि जगभरात देशाचे नाव कीर्तिवंत करणारे कार्य ज्यांच्या हातून घडते, अशा व्यक्तीला हा सर्वोच्च पुरस्कार बहाल केला जातो. त्या व्यक्तीने त्या कार्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य खर्ची घातलेले असते. सेवा, कला, साहित्य, विज्ञान, विश्वशांती, मानवविकास, कारखानदारी, क्रीडा अशा मूलभूत क्षेत्रांमध्ये अतुलनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तीला हा सर्वश्रेष्ठ पुरस्कार देऊन सन्मानित करण्याचा निर्णय १९५४ साली तत्कालीन सरकारने घेतला.
(२) महामेरू : पुराणात पृथ्वीचे वर्णन करताना सात द्वीपे सांगितली आहेत. त्यांपैकी जंबुद्वीपामध्ये केंद्रस्थानी मेरू हा पर्वत आहे. हा पर्वत सोन्याचा असून त्यावर नेहमी देव राहतात, असे पुराणात सांगितले आहे. या मेरू पर्वतापेक्षाही महर्षी कर्वे मोठे असे आलंकारिक वर्णन येथे केले आहे.