Balbharti Maharashtra State Board Class 5 Marathi Solutions Sulabhbharati Chapter 15 नदीचे गाणे Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

5th Standard Marathi Digest Chapter 15 नदीचे गाणे Textbook Questions and Answers

1. एका वाक्यात उत्तरे लिहा.

प्रश्न 1.
मंजुळ गाणे कोण गाते?
उत्तर:
मंजूळ गाणे नदी गाते.

प्रश्न 2.
गावे कोठे वसली आहेत?
उत्तर:
गावे नदीच्या तीरावर वसली आहेत.

प्रश्न 3.
नदीवर शीतल छाया कोण धरते?
उत्तर:
नदीवर शीतल छाया आंब्याची झाडे धरतात.

प्रश्न 4.
नदी जेथे जाईल तेथे काय करेल?
उत्तर:
नदी जेथे जाईल तेथे मनोहर आनंदाची बाग फुलवेल.

2. कवितेच्या ओळी पूर्ण करा.

प्रश्न 1.
फुलवेली मज …………………………. देती,
कुठे …………………… खेळत बसती,
कुठे ……………………… माझ्यावरती
……………………. अपुली छाया धरती.
उत्तरः
फुलवेली मज सुमने देती,
कुठे लव्हाळी खेळत बसती,
कुठे आम्रतरू माझ्यावरती,
शीतल अपुली छाया धरती.

3. जोड्या जुळवा.

प्रश्न 1.
जोड्या जुळवा.

अ ‘गट’ ब ‘गट’
1. झुळझुळ (अ) गाणे
2. मंजूळ (आ) छाया
3. शीतल (इ) पाणी

उत्तरः

अ ‘गट’ ब ‘गट’
1. झुळझुळ (इ) पाणी
2. मंजूळ (अ) गाणे
3. शीतल (आ) छाया

4. हे शब्द असेच लिहा.

प्रश्न 1.
हे शब्द असेच लिहा.
उत्तर:

5. कवितेच्या चित्राचे निरीक्षण करा व पाच वाक्ये लिहा.

प्रश्न 1.
कवितेच्या चित्राचे निरीक्षण करा व पाच वाक्ये लिहा.
उत्तर:

Marathi Sulabhbharati Class 5 Solutions Chapter 15 नदीचे गाणे Additional Important Questions and Answers

प्रश्न 1.
नदीला सुमने कोण देतात?
उत्तर:
नदीला सुमने फुलवेली देतात.

प्रश्न 2.
नदीत कोण खेळत आहेत?
उत्तर:
नदीत लव्हाळी खेळत आहेत.

प्रश्न 3.
घटात काय भरतात?
उत्तर:
घटात पाणी भरतात.

प्रश्न 4.
नदीच्या काठावर पाणी पिण्यासाठी कोण येतात?
उत्तर:
नदीच्या काठावर पाणी पिण्यासाठी गुरे-वासरे येतात.

प्रश्न 5.
मुले कुठे खेळतात?
उत्तर:
मुले लाटांवर खेळतात.

प्रश्न 6.
‘नदीचे गाणे’ कवितेचे कवी कोण आहेत?
उत्तर:
‘नदीचे गाणे’ कवितेचे कवी ‘वि. म. कुलकर्णी आहेत.

प्रश्न 7.
नदी कोणाची आहे?
उत्तर:
नदी सर्वांची आहे.

कवितेच्या ओळी पूर्ण करा.

प्रश्न 1.
पाणी पिऊनी ………………………….. जाती,
……………….. भरुनी कोणी ………………….. नेती,
…………………….. जवळी येती,
मुले खेळती ……………………….
उत्तरः
पाणी पिउनी पक्षी जाती,
घट भरुनी कोणी जल नेती,
गुरे-वासरे जवळी येती,
मुले खेळती लाटांवरती.

थोडक्यात उत्तरे लिहा.

प्रश्न 1.
कवितेत नदीचे वर्णन कसे केले आहे?
उत्तरः
नदी ही दरी, वनातून वाहते. ती झुळझुळ वाहते. तिच्या तीरावर अनेक गावे वसली आहेत. अनेक वृक्षवेली नदीच्या काठावर आहेत. आंब्याची झाडे नदीवर सावली धरतात. अनेक पक्षी आपली तहान भागवतात. कुणी नदीवर पाणी भरण्यासाठी येतात. गुरे-वासरे नदीवर येतात. मुले तिच्या लाटांवर खेळतात. नदी ही सर्वांची आहे. नदी जिथे जाईल तेथे मनोहर आनंदाची बाग फुलवते. अशाप्रकारे कवितेते नदीचे वर्णन केले आहे.

व्याकरण व भाषाभ्यास:

प्रश्न 1.
समानार्थी शब्द लिहा.

उत्तर:

प्रश्न 2.
विरुद्धार्थी शब्द लिहा.

उत्तरः

प्रश्न 3.
वचन बदला.

उत्तर:

प्रश्न 4.
शब्दाचे अर्थ लिहा.
उत्तर:
घट – मातीचा घडा (माठ)

प्रश्न 5.
पुढील शब्दांचा उपयोग करून अर्थपूर्ण वाक्य बनवा.
जसे – झुळझुळ. नदी झुळझुळ वाहते.
उत्तर:
1. शीतल – झाडे शीतल छाया देतात.
2. मनोहर – निसर्गाच्या मनोहर दृश्याने सारेच मंत्रमुग्ध झाले.
3. मंजूळ – रमाने सर्वांसमोर मंजुळ गाणे म्हटले.

पदयपरिचय:

या कवितेत कवी वि. म. कुलकर्णी यांनी नदीचे मनोगत व नदीकाठच्या जीवनाचे सुंदर वर्णन केले आहे.

शब्दार्थ: