Khelat Khelat Vachuya Poem 5th Marathi Question Answer Chapter 7 Maharashtra Board

Std 5 Marathi Lesson 7 खेळत खेळत वाचुया! Question Answer Maharashtra Board

Balbharti Maharashtra State Board Class 5 Marathi Solutions Sulabhbharati Chapter 7 खेळत खेळत वाचुया! Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

5th Std Marathi Poem Khelat Khelat Vachuya Question Answer

5th Standard Marathi Digest Chapter 7 खेळत खेळत वाचुया! Textbook Questions and Answers
1. सोंगटी टाका – पुढे चला.

Maharashtra-Board-Class-5-Marathi-Solutions-Chapter-7-खेळत-खेळत-वाचुया-1

Maharashtra-State-Board-Solutions

वाचू आणि हसू.

  • पेशंट: डॉक्टर, माझं वजन खूप वाढतंय. त्यामुळे माझी तब्येत ठीक राहत नाही.
  • डॉक्टर: तब्येत चांगली राहण्यासाठी रोज व्यायाम करा. मैदानी खेळ खेळा.
  • पेशंट: मैदानी खेळ तर मी रोज खेळतो. फुटबॉल, टेनिस, क्रिकेटदेखील खेळतो.
  • डॉक्टर: किती वेळ खेळता?
  • पेशंट: मोबाइलची बॅटरी संपेपर्यंत.

Marathi Sulabhbharati Class 5 Solutions Chapter 7 खेळत खेळत वाचुया! Additional Important Questions and Answers

1. एका वाक्यात उत्तरे लिहा.
(पाठ्यपुस्तक पान क्र. 10 चा संदर्भ पाहा).

प्रश्न 1.
तुम्ही आरोग्याची काळजी कशी घेता?
उत्तर:
नियमित व्यायाम करून व सकस आहार घेऊन आम्ही आरोग्याची काळजी घेतो.

प्रश्न 2.
निसर्गाचा सांभाळ तुम्ही कसा करता?
उत्तर:
निसर्गाचे संवर्धन करून आम्ही निसर्गाचा सांभाळ करतो.

प्रश्न 3.
व्यायामाचे फायदे कोणते?
उत्तर:
दररोज व्यायाम केल्याने आरोग्य चांगले रहाते व आपण नेहमी उत्साही रहातो.

Maharashtra-State-Board-Solutions

प्रश्न 4.
पाण्याची काटकसर करणे म्हणजे काय?
उत्तर:
पाण्याची काटकसर करणे म्हणजे पाणी जपून वापरणे, पाण्याचा अपव्यय टाळणे होय.

प्रश्न 5.
या पाठात काही अयोग्य सवयी सांगितल्या आहेत त्यातील कोणत्याही दोन लिहा.
उत्तर:
1. वाईट बोलणे
2. मोठ्यांचा आदर न करणे
3. 17 व्या अंकावर कोणता संदेश दिला आहे?
उत्तर:
17 व्या अंकावर झाडांची काळजी घेण्याचा संदेश दिला आहे.

प्रश्न 6.
12 व्या अंकावर काय करू नये असे सांगितले आहे?
उत्तर:
12 व्या अंकावर वाईट बोलू नये, असे सांगितले आहे.

2. एक-दोन शब्दांत उत्तरे लिहा.

प्रश्न 2.
एक-दोन शब्दांत उत्तरे लिहा.

  1. प्रस्तुत खेळात साप काय दर्शवतात?
  2. प्रस्तुत खेळात शिडी काय दर्शवते?
  3. प्रस्तुत खेळाचा शेवट कोणत्या अंकावर होतो?
  4. कशाचा वापर जपून केला पाहिजे?
  5. कशाचे संवर्धन केले पाहिजे?

उत्तर:

  1. वाईट सवयी
  2. चांगल्या सवयी
  3. 25 व्या अंकावर
  4. पाण्याचा
  5. निसर्गाचे

Maharashtra-State-Board-Solutions

3. थोडक्यात उत्तरे लिहा.

प्रश्न 3.
या पाठात कोणकोणत्या चांगल्या सवयी सांगितल्या आहेत?
उत्तर:
पाणी जपून वापरणे, मित्राला मदत करणे, दुसऱ्यांना मदत
करणे, पाण्याची काटकसर करणे, नियमित व्यायाम करणे,
झाडांची काळजी घेणे, निसर्गाचे संवर्धन करणे.

प्रश्न 4.
प्रस्तुत खेळात कोणत्या गोष्टी करू नये, असे सांगितले आहे?
उत्तर:
आळस करू नये, खोटे बोलू नये, वाईट बोलू नये, जेवताना रडू नये, मोठ्यांचा अनादर करू नये, या गोष्टी प्रस्तुत खेळात सांगितल्या आहेत.

प्रश्न 5.
खालील इंग्रजी शब्दांना मराठी प्रतिशब्द लिहा.

  1. Health
  2. Respect
  3. Exercise
  4. Help
  5. Anxiety
  6. Nature
  7. Game
  8. Bad

उत्तरः

  1. आरोग्य
  2. आदर
  3. व्यायाम
  4. मदत
  5. चिंता
  6. निसर्ग
  7. खेळ
  8. वाईट

Maharashtra-State-Board-Solutions

व्याकरण व भाषाभ्यास:

प्रश्न 6.
समानार्थी शब्द लिहा.

  1. आरोग्य
  2. आदर
  3. आळस
  4. मदत
  5. जेवण
  6. पाणी
  7. मित्र
  8. निसर्ग
  9. झाड
  10. व्यायाम

उत्तरः

  1. स्वास्थ्य
  2. सन्मान
  3. सुस्ती
  4. साहाय्य
  5. भोजन
  6. जल
  7. सखा
  8. सृष्टी
  9. वृक्ष
  10. कसरत

प्रश्न 7.
विरुद्धार्थी शब्द लिहा.

  1. आरोग्य
  2. आळस
  3. नियमित
  4. आदर
  5. सुरुवात
  6. रडणे
  7. वाईट
  8. खोटे
  9. चढणे
  10. मित्र
  11. काळजी
  12. मोठे

उत्तर:

  1. अनारोग्य
  2. उत्साह
  3. अनियमित
  4. अनादर
  5. शेवट
  6. हसणे
  7. चांगले
  8. खरे
  9. उतरणे
  10. शत्रू
  11. निष्काळजी
  12. छोटे

Maharashtra-State-Board-Solutions

प्रश्न 8.
वचन बदला.

  1. मित्र
  2. जेवण
  3. झाड

उत्तर:

  1. मित्र
  2. जेवणं
  3. झाडे

प्रश्न 9.
लिंग बदला.
1. मित्र
2. विदयार्थी
उत्तर:
1. मैत्रीण
2. विद्यार्थिनी

खेळत खेळत वाचुया! Summary in Marathi

पाठ्यपरिचय:

‘खेळत खेळत वाचूया’ या पाठातून सापशिडीच्या खेळाद्वारे मुलांनी आपल्या जीवनात कोणत्या गोष्टी कराव्यात आणि कोणत्या करू नयेत, हे सांगितले आहे.

Maharashtra-State-Board-Solutions

शब्दार्थ:

  1. आरोग्य – प्रकृतीचे स्वास्थ्य (health)
  2. नियमित – रोज (regular)
  3. सुरुवात – आरंभ (a begining)
  4. पाणी – जल (water)
  5. मित्र – सखा (A friend)
  6. मदत करणे – साहाय्य करणे (to help)
  7. जेवण – (meal)
  8. काटकसर करणे – खर्च कमी करण्याची क्रिया (To save)
  9. वाईट बोलणे – (speak bad words)
  10. खोटे बोलणे – (To lie)
  11. काळजी घेणे – देखभाल करणे (to take care)
  12. आळस – सुस्ती (laziness)
  13. निसर्ग – (nature)
  14. आदर न करणे – (to irrespect)
  15. व्यायाम – कसरत (exercise)
  16. संवर्धन – वाढ, भरभराट (prosperity)