Balbharti Maharashtra State Board Class 10 Marathi Solutions Kumarbharti Chapter 11 गोष्ट अरुणिमाची Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.
Class 10th Marathi Kumarbharti Chapter 11 गोष्ट अरुणिमाची Question Answer Maharashtra Board
Std 10 Marathi Chapter 11 Question Answer
Marathi Kumarbharti Std 10 Digest Chapter 11 गोष्ट अरुणिमाची Textbook Questions and Answers
कृतिपत्रिकेतील प्रश्न १ (अ) आणि (आ) यांसाठी…
   प्रश्न 1.
   
   आकृती पूर्ण करा.
   
   अरुणिमाचा ध्येयवादी दृष्टिकोन
   
   स्पष्ट करणाऱ्या कृती
   
    
   
   उत्तर:
   
    
  
   प्रश्न 2.
   
   खालील कृतींतून अभिव्यक्त होणारे अरुणिमाचे गुण लिहा.
   
   (अ) भाईसाब यांनी दिलेला सल्ला शिरोधार्य मानला.
   
   (आ) चोरांना लाथाबुक्क्यांचा प्रसाद दिला.
   
   (इ) उठता-बसता, खाता-पिता केवळ एव्हरेस्टचाच विचार ती करू लागली होती.
   
   (ई) ब्रिटिश माणसाने ओझे होते म्हणून फेकून दिलेला ऑक्सिजन सिलेंडर अरुणिमाने वापरला.
   
   उत्तर:
   
   (अ) भाईसाब यांनी दिलेला सल्ला अरुणिमाने शिरोधार्य मानला. – [वडीलधाऱ्या व्यक्तीचा आदर]
   
   (आ) चोरांना लाथाबुक्क्यांचा प्रसाद दिला. – [धाडसी वृत्ती]
   
   (इ) अरुणिमा उठता-बसता, खाता पिता केवळ एव्हरेस्टचाच विचार करू लागली होती : ध्येयवादी
   
   (ई) ब्रिटिश माणसाने ओझे म्हणून फेकून दिलेला ऑक्सिजन सिलिंडर अरुणिमाने वापरला.
  
    
  
   प्रश्न 3.
   
   कोण ते लिहा.
   
   (अ) एव्हरेस्ट सर करणारी पहिली महिला
   
   (आ) सर्वांत मोठा मोटिव्हेटर
   
   (इ) अरुणिमाच्या कुटुंबातील महत्त्वाचे निर्णय घेणारे
   
   (ई) फुटबॉल आणि व्हॉलीबॉलची नॅशनल चॅम्पियन
   
   उत्तर:
   
   (अ) एव्हरेस्ट सर करणारी पहिली महिला : बचेंद्री पाल
   
   (आ) सर्वात मोठा मोटिव्हेटर : स्वत:च
   
   (इ) अरुणिमाच्या कुटुंबातील महत्त्वाचे निर्णय घेणारे : भाईसाब
   
   (ई) फुटबॉलची व व्हॉलीबॉलची नॅशनल चॅम्पियन : अरुणिमा
  
   प्रश्न 4.
   
   अरुणिमाच्या कणखर/धाडसी मनाची साक्ष देणारी वाक्ये पाठातून शोधून लिहा.
   
   उत्तर:
   
   (i) ध्येयापासून विचलित करू पाहणारे कष्टदायी प्रशिक्षण यांतून मी तावून-सुलाखून निघत होते.
   
   (ii) उजव्या पायाची हाडे एकत्रित राहण्यासाठी त्यात स्टीलचा रॉड घातलेला होता, त्यावर थोडा जरी दाब दिला तरी तीन वेदनांचे झटके बसत.
   
   (iii) मी अपंग, त्यात मुलगी, म्हणून कसल्याही प्रकारची सवलत किंवा सहानुभूती नको होती मला.
   
   (iv) आपलं मन जसं सांगतं, तसंच, अगदी तसंच आपलं शरीर वागतं.
   
   (v) मी अशी नि तशी मरणारच होते; तर मग माझ्या यशाचे पुरावे असणे अत्यावश्यकच होते.
  
   प्रश्न 5.
   
   अरुणिमाविषयी उठलेल्या खालील अफवांबाबत तुमची प्रतिक्रिया लिहा.
   
   (अ) शरीराला जखमा झाल्यामुळे बहुधा अरुणिमाच्या डोक्यावरही परिणाम झालेला दिसतोय.
   
   उत्तर:
   
   समाजातील बहुसंख्य लोक मनाने दुबळे असतात. त्यामुळे अरुणिमाच्या अपार घाडसावर विश्वास बसत नाही. शरीरावर झालेल्या आघातामुळे तिचा मानसिक तोल ढळून वेडाच्या भरात तिच्या हातून असे कृत्य घडले असावे, अशी शंकाही अनेकांच्या मनात आली असणार.
  
   (आ) अरुणिमाकडे प्रवासाचे तिकीट नव्हते म्हणून तिने रेल्वेतून उडी मारली.
   
   उत्तर:
   
   अरुणिमाने तिकीट काढले नसणार. त्यामुळे टी.सी.च्या नजरेतून सुटण्याच्या प्रयत्नात तिने गाडीतून उडी मारली असावी, अशी शंका काही जणांना येते. अलीकडे प्रामाणिकपणावरील, सज्जनपणावरील समाजाचा विश्वास डळमळीत झाला आहे. त्यामुळे कोणाच्याही चांगल्या कृतीतून वाईट अर्थ काढण्याची सवय समाजाला लागली आहे, हेच या प्रतिक्रियेवरून दिसून येते.
  
    
  
   प्रश्न 6.
   
   पाठातून तुम्हाला जाणवलेली अरुणिमाची स्वभाववैशिष्ट्ये लिहा.
   
    
   
   उत्तर:
   
   (i) पराकोटीचे धैर्य
   
   (ii) अमाप सहनशक्ती असणारी
   
   (iii) जबरदस्त आत्मविश्वास असलेली।
   
   (iv) अन्यायाविरुद्ध लढणारी
   
   (v) ध्येयवादी
   
   (vi) जिद्दी.
  
   प्रश्न 7.
   
   पाठात आलेल्या इंग्रजी शब्दांना प्रचलित मराठी शब्द लिहा.
   
   (१) नॅशनल [ ]
   
   (२) स्पॉन्सरशिप [ ]
   
   (३) डेस्टिनी [ ]
   
   (४) कॅम्प [ ]
   
   (५) डिस्चार्ज [ ]
   
   (६) हॉस्पिटल [ ]
   
   उत्तर:
   
   (१) नॅशनल – राष्ट्रीय
   
   (२) स्पॉन्सरशिप – प्रायोजकत्व
   
   (३) डेस्टिनी – नियती
   
   (४) कॅम्प – छावणी
   
   (५) हॉस्पिटल – रुग्णालय
   
   (६) डिस्चार्ज – मोकळीक, पाठवणी,
  
   प्रश्न 8.
   
   पाठात आलेल्या खालील वाक्यांचे मराठीत भाषांतर करा.
   
   (१) Now or never!
   
   (२) Fortune favours the braves
   
   उत्तर:
   
   (i) आता नाही तर कधीच नाही !
   
   (ii) शूर माणसाला नशीब नेहमी साथ देते.
  
    
  
   प्रश्न 9.
   
   ‘नेहरू गिरिभ्रमण प्रशिक्षण केंद्रा’तील अरुणिमाचे खडतर अनुभव लिहा.
   
   (i) __________________________
   
   (ii) __________________________
   
   (iii) __________________________
   
   (iv) __________________________
   
   (v) __________________________
   
   (vi) __________________________
   
   उत्तर:
   
   (i) धोकादायक पर्वत चढणे.
   
   (ii) मृत्यू येईल असे वाटायला लावणाऱ्या कृती करणे,
   
   (iii) ध्येयापासून दूर लोटू पाहणारे प्रशिक्षणातील कष्ट.
   
   (iv) पाय रोवायचा प्रयत्न केला की टाच व चवडा गोल फिरायचा, म्हणून पाय घट्ट रोवणे कठीण व्हायचे.
   
   (v) उजव्या पायातल्या रॉडमुळे तो पाय जरा जरी दाबला तरी असह्य कळा येत.
   
   (vi) अरुणिमाची अवस्था पाहून शेरपाचा निश्चय डळमळायचा.
  
   प्रश्न 10.
   
   लील वाक्यांतील अधोरेखित शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहून, अर्थ न बदलता वाक्ये पुन्हा लिहा.
   
   (अ) प्रत्येक व्यक्तीत काही ना काही गुण असतोच.
   
   (आ) सूर्योदयाचे वेळी सूर्याची विविध रूपे अनुभवता येतात.
   
   (इ) खालील प्रश्नांची उत्तरे संक्षिप्त असावीत.
   
   (ई) प्रयत्नाने बिकट वाट पार करता येते.
   
   उत्तर:
   
   (i) प्रत्येक व्यक्तीत काही ना काही अवगुण असतोच, असे नाही.
   
   (ii) सूर्यास्ताच्या वेळीही सूर्याची विविध रूपे अनुभवता येतात.
   
   (iii) खालील प्रश्नांची सविस्तर उत्तर: लिहू नका.
   
   (iv) प्रयत्नाने सोपी वाटही पार करता येते.
  
   प्रश्न 11
   
   लील वाक्यांतील क्रियापदे ओळखा.
   
   (अ) सायरा आज खूप खूश होती.
   
   (आ) अनुजाने सुटकेचा नि:श्वास टाकला.
   
   (इ) मित्राने दिलेले गोष्टींचे पुस्तक अब्दुलला खूप आवडले.
   
   (ई) जॉनला नवीन कल्पना सुचली.
   
   उत्तर:
   
   (i) होती
   
   (ii) टाकला
   
   
    (iii) आवडले
    
   
   (iv) सुचली.
  
   प्रश्न 12.
   
   खालील तक्ता पूर्ण करा.
   
    
   
   उत्तर:
   
    
  
    
  
   प्रश्न 13.
   
   स्वमत.
   
   (अ) ‘आपलं ध्येय साध्य करताना प्रयत्न निष्फळ ठरणे म्हणजे अपयश नसतं’, या वाक्याचा तुम्हाला समजलेला अर्थ स्पष्ट करा.
   
   उत्तर :
   
   दहावी-बारावीच्या परीक्षेत नापास झाल्यामुळे किंवा एखादा पेपर कठीण गेला म्हणून विद्यार्थी आत्महत्या करतात, अशा बातम्या अनेकदा ऐकू येतात. हे साफ चूक आहे. त्यांना वाटते नापास झाल्यामुळे नामुष्की येते. तोंड दाखवायला जागा राहत नाही.
  
पण खरोखरच परीक्षेतले अपयश ही नामुष्की असते काय, याबाबत थोडा विचार केला पाहिजे. आपण खूप गुण मिळण्याला परीक्षेत यश मानतो. पण हे बरोबर आहे काय ? गुण महत्त्वाचे नसतात; ज्ञान महत्त्वाचे असते. गुण हे साधन असते, तर ज्ञान हे साध्य असते; आपले ध्येय असते. आपण गुणांना महत्त्व जास्त देतो. इथेच खरा घोटाळा निर्माण होतो. आपले ध्येय हे आपले साध्य असल्यामुळे ते
जास्तीत जास्त उच्च दर्जाचे राखले पाहिजे. ते मिळवताना अपयश आले तर पुन्हा प्रयत्न करता येतो. परंतु ध्येय कमी दर्जाचे असले तर आपण कितीही मोठे यश मिळवले, तरी ते यश कमी दर्जाचे असते. याचा साधा अर्थ असा की, ध्येय प्राप्त करताना आलेले अपयश हे तात्पुरते असते. त्याने खचून जाता कामा नये, किंबहुना ती नामुष्कीसुद्धा नसते. उच्च ध्येय निवडता आले नाही तर मात्र ते अपयश असते.
   (आ) ‘प्रत्येकामध्ये एक जिद्दी अरुणिमा असते’, याबाबत तुमचे विचार स्पष्ट करा.
   
   उत्तर :
   
   कोणतीही व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीसारखी नसते. एखादयाला नृत्य आवडते. एखादयाला गायला आवडते. एखादयाला दुसऱ्याला मदत करायला आवडते. तर कोणाला समाजातील घडामोडींशी दोस्ती करणे आवडते. आपल्यातला असा वैशिष्ट्यपूर्ण गुण कोणता आहे, हे आपण शोधले पाहिजे. या गुणाची जोपासना केली पाहिजे. मग आपल्या हातून आपोआपच लोकोत्तर कामगिरी पार पडेल, अरुणिमाने नेमके हेच केले. खरेतर अपंग बनलेली अरुणिमा आयुष्यात काहीच करू शकली नसती. पण तिने जिद्दीने स्वत:मधला वेगळा गुण ओळखला. स्वत:चे सामर्थ्य शोधले आणि अशक्य वाटणारी कामगिरी पार पाडली. प्रत्येक व्यक्तीमध्ये अशी अरुणिमा असतेच, फक्त त्या अरुणिमाचा आपण शोध घेतला पाहिजे, जीवनाचा हाच महामंत्र आहे.
  
   (इ) तुमच्या मनातील एव्हरेस्ट शोधा आणि शब्दबद्ध करा.
   
   उत्तर :
   
   आपण दिवसभर कोणती ना कोणती कृती करीत असतो. त्या वेळी आपल्या मनात कोणता तरी हेतू असतो. हेतूशिवाय कोणतीही कृती अशक्य असते. आपला हेतू म्हणजेच आपले ध्येय होय. खूप पैसे मिळवणे हे ज्याचे आयुष्यातले सर्वोच्च ध्येय असते, तो माणूस सतत पैसे मिळवण्याचाच विचार करीत राहील. कळतनकळत सतत पैसे मिळवून देण्याच्या कृतीकडेच ओढला जाईल. म्हणजे आपले आपल्या मनातले ध्येयच खूप महत्त्वाचे असते. तेच आपल्या जीवनाची दिशा ठरवीत असते. म्हणून आपण आपले ध्येय निश्चित केले पाहिजे. ते नीट समजून घेतले पाहिजे, पर्वतांमध्ये एव्हरेस्ट जसा सर्वात जास्त उंच आहे, तसेच आपले ध्येय आयुष्यातील सर्वात जास्त उंच, सर्वात जास्त महत्त्वाची गोष्ट आहे. ती गोष्ट आपल्या मनातील एव्हरेस्टच होय. या एव्हरेस्टचा आपण शोध घेतला पाहिजे. तो सर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
  
    
  
(टिपा –
- CISF – Central Industrial Security Force- केंद्रीय औदयोगिक सुरक्षा बल.
- AIIMS – All India Institute of Medical Sciences- अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान.)
अपठित गदय आकलन
   (अ) उतारा वाचून दिलेल्या कृती करा.
   
   (१) खालील भाव व्यक्त करणारे वाक्य उताऱ्यातून शोधून लिहा.
   
   (अ) वृक्ष बहरू लागले आहेत. ………………………….
   
   (आ) नदी, नाल्यात भरपूर पाणी आहे. ………………………….
  
   (२) स्पष्ट करा.
   
   (अ) पाणी समजूतदार वाटते ………………………….
   
   (आ) पाणी क्रूर वाटते ………………………….
  
वर्षाऋतूचा काळ आहे. आभाळ ढगांनी व्याप्त आहे. दिशा पाणावलेल्या आहेत. अधूनमधून पावसाच्या सरी कोसळताहेत. वृक्ष-पर्णांनी अंग धरले आहे. करंगळीची सोंड झाली आहे. उसळत घुसळत नवे पाणी फेसाळत चालले आहे. कुठे काठाला भिडले आहे, कुठे काठावर चढले आहे, कुठे संथ-गंभीर राहून दबदबा दाखवत आहे. भव्य, स्तब्ध पुलाच्या कमानीखालून जाणारे पाणी समजूतदार वाटते, शहाण्यासारखे वागते; पण तेच पुढे जाऊन काठावरची गरीब बिचारी खोपटी उद्ध्वस्त करून आपल्याबरोबर घेऊन जाताना क्रूर, अडाणी आणि उद्दाम वाटते. पुढे जाता जाता कुठे झाडावर चढते, कुठे गच्चीवर लोळते, कुठे घाट बुडवते तर कुठे वाट तुडवते. पाणी येते आणि जाते. एवढे उदंड येणारे पाणी लांब समुद्राच्या पोटात गुडुप्प होते. पाणी किती शहाणे असते! जोवर कोणी अडवत नाही, शेतमळे, बागा फुलवत नाही, रान-रान हसवत नाही तोवर पाण्याने तरी काय करावे? दरवर्षी वर्षाऋतूत यावे अन् वाहून जावे. पाण्याला जाता जाता कृतार्थ होऊन जावे, फुलवत-खुलवत, पिकवत जावे असे वाटल्याशिवाय का राहत असेल ? पण पाण्याचे मन कोण जाणणार?
– राजा मंगळवेढेकर
(आ) खालील आकृत्या पूर्ण करा.
   (१) वर्षाऋतूतील निसर्गाचे रूप
   
    
  
   (२) पुढे वाहता वाहता पाण्याकडून होणाऱ्या विविध क्रिया
   
    
  
   (इ) तक्ता पूर्ण करा. खालील वाक्यांतील अव्यये ओळखा व त्यांचा प्रकार लिहा.
   
    
  
- उताऱ्यातून कळलेला पाण्याचा स्वभाव’ तुमच्या शब्दांत लिहा.
- वर्षाऋतूतील पाणी निष्फळ वाहून जाऊ नये म्हणून माणसाने काय काय करायला हवे, याबाबत तुमचे विचार लिहा.
Marathi Kumarbharti Class 10 Textbook Solutions Chapter 11 गोष्ट अरुणिमाची Additional Important Questions and Answers
   
    उतारा क्र. १
   
   
   
    प्रश्न. पुढील उतारा वाचा आणि दिलेल्या सूचनांनुसार कृती करा :
   
  
कृती १ : (आकलन) –
   प्रश्न 1.
   
   रिकाम्या चौकटी भरा :
   
   (i) लखनौपासून २०० किमी अंतरावरील आंबेडकरनगर
   
   (ii) वडील निवर्तल्यानंतर घराला मार्गदर्शन करणारे –
   
   उत्तर:
   
   (i) लखनौपासून २०० किमी अंतरावरील आंबेडकरनगर – [अरुणिमाचे गाव]
   
   (ii) वडील निवर्तल्यानंतर घराला मार्गदर्शन करणारे – [मोठ्या बहिणीचे पती, भाईसाब]
  
   प्रश्न 2.
   
   विधाने पूर्ण करा :
   
   (i) वडील वारल्यानंतर अरुणिमाच्या घरी भाईसाब हेच वडीलधारे व्यक्ती होते; म्हणून
   
   (ii) CISF च्या नोकरीमुळे अरुणिमा खेळाशी जोडलेली राहू शकली असती; म्हणून भाईसाब यांनी ….
   
   उत्तर:
   
   (i) वडील वारल्यानंतर अरुणिमाच्या घरी भाईसाब हेच वडीलधारे व्यक्ती होते; म्हणून घरातले महत्त्वाचे निर्णय घेण्याचे काम भाईसाब (मोठ्या बहिणीचे पती) करीत.
   
   (ii) CISF च्या नोकरीमुळे अरुणिमा खेळाशी जोडलेली राहू शकली असती; म्हणून माईसाब यांनी तिला CISF ची नोकरी मिळवायचा प्रयत्न करायला सांगितले.
  
   प्रश्न 3.
   
   पुढील कृतीतून व्यक्त होणारे अरुणिमाचे गुण लिहा :
   
   (i) माऊंट एव्हरेस्ट सर करणारी पहिली अपंग भारतीय ती मीच,’ असा उल्लेख अरुणिमा – नि:संकोचपणे करते.
   
   (ii) गर्दीतून मुसंडी मारत अरुणिमाने कॉर्नर सीट – पकडली.
   
   उत्तर:
   
   (i) ‘माऊंट एव्हरेस्ट सर करणारी पहिली अपंग भारतीय ती मीच,’ असा उल्लेख अरुणिमा निःसंकोचपणे करते. – [सार्थ अभिमान]
   
   (ii) गर्दीतून मुसंडी मारत अरुणिमाने कॉर्नर सीट पकडली. – [चपळता]
  
कृती २ : (आकलन)
   प्रश्न 1.
   
   चोरांनी अरुणिमावर हल्ला केला, तेव्हा पुढील व्यक्तींनी केलेली कृती लिहा :
   
   (i) अरुणिमा
   
   (ii) सहप्रवासी.
   
   उत्तर:
   
   (i) अरुणिमा : अंगावर धावून येणाऱ्या प्रत्येक दरोडेखोराला लाथाबुक्क्यांनी मारायला सुरुवात केली.
   
   (ii) सहप्रवासी : अन्यायाविरुद्ध लढणे म्हणजे जणू पापच आहे, या भावनेने सहप्रवासी मख्खपणे जागेवर बसूनच राहिले.
  
    
  
   प्रश्न 2.
   
   आकृती पूर्ण करा :
   
    
   
   उत्तर:
   
    
  
   प्रश्न 3.
   
   पुढील कृतीतून व्यक्त होणारे अरुणिमाचे गुण लिहा :
   
   (i) मीही काही कच्च्या गुरुची चेली नव्हते. –
   
   (ii) मेंदू तल्लखपणे तिथून सुटकेचा विचार करीत होता.
   
   उत्तर:
   
   (i) मीही काही कच्च्या गुरूची – चेली नव्हते. – [प्रचंड आत्मविश्वास]
   
   (ii) मेंदू तल्लखपणे तिथून सुटकेचा विचार करीत होता – [प्रसंगावधान]
  
   प्रश्न 4.
   
    
     
    
   
   उत्तर:
   
    
     
   
  
    
  
कृती ३ : (व्याकरण)
   प्रश्न 1.
   
   पुढील शब्दांना मराठी प्रतिशब्द लिहा :
   
   (i) माऊंट : [ ]
   
   (ii) ट्रॅक : [ ]
   
   (iii) कॉल लेटर : [ ]
   
   (iv) नॅशनल चॅम्पियनशिप : [ ]
   
   (v) कॉर्नर सीट : [ ]
   
   उत्तर:
   
   (i) माऊंट : पर्वत
   
   (ii) ट्रॅक : रेल्वेरुळ
   
   (iii) कॉल लेटर : नोकरीचे आमंत्रणपत्र
   
   (iv) नॅशनल चॅम्पियनशिप : राष्ट्रस्तरीय नैपुण्य
   
   (v) कॉनर सीट : कडेचे आसन
  
   प्रश्न 2.
   
   पुढील वाक्यांतील क्रियापदे शोधून ती अधोरेखित करा :
   
   (i) घडधाकट असल्यापासूनची गोष्ट आज मी सांगणारेय तुम्हांला.
   
   (ii) CISF ची नोकरी मिळते का बघ, म्हणजे खेळाशी जोडलेली राहशील,
   
   (iii) त्यानुसार मी नोकरीसाठी अर्ज केला.
   
   (iv) मला घेरून असणाऱ्या तरुणांनी माझे लक्ष वेधून घेतले.
   
   (v) त्या रात्री ४९ रेल्वेगाड्या माझ्या पायावरून गेल्या.
   
   (vi) प्रत्येकाला लाथाबुक्क्यांचा प्रसाद दयायला सुरुवात केली.
   
   उत्तर:
   
   (i) धडधाकट असल्यापासूनची गोष्ट आज मी सांगणारेय तुम्हांला.
   
   (ii) CISF ची नोकरी मिळते का बघ, म्हणजे खेळाशी जोडलेली राहशील.
   
   (iii) त्यानुसार मी नोकरीसाठी अर्ज केला.
   
   (iv) मला घेरून असणाऱ्या तरुणांनी माझे लक्ष वेधून घेतले.
   
   (v) त्या रात्री ४९ रेल्वेगाड्या माझ्या पायावरून गेल्या.
   
   (vi) प्रत्येकाला लाथाबुक्क्यांचा प्रसाद दयायला सुरुवात केली.
  
    
  
   प्रश्न 3.
   
   कंसातील प्रत्यय जोडून पूर्ण रूप लिहा :
   
   (i) बहीण (ला) =
   
   (ii) भाऊ (चा) =
   
   (iii) महिला (ने) =
   
   (iv) गाड्या (ना) =
   
   (v) कागदपत्रे (चे) =
   
   उत्तर:
   
   (i) बहीण (ला) = बहिणीला
   
   (ii) भाक (चा) = भावाचा
   
   (iii) महिला (ने) = महिलेने
   
   (iv) गाड्या (ना) = गाड्यांना
   
   (v) कागदपत्रे (चे) = कागदपत्रांचे.
  
   प्रश्न 4.
   
   पुढील वाक्यांतील अधोरेखित शब्दांच्या जागी विरुद्धार्थी शब्द योजून अर्थ न बदलता ती वाक्ये पुन्हा लिहा :
   
   (i) मीही काही कच्च्या गुरुची चेली नव्हते.
   
   (ii) आता मी चढू लागले.
   
   (iii) चढाईचा अगदी शेवटचा टप्पा आला.
   
   उत्तर:
   
   (i) मीही काही कच्च्या गुरूची चेली होते असे नाही.
   
   (ii) आता मी उतरू लागले, असे नव्हते,
   
   (iii) उतरणीचा हा अगदी पहिला टप्पा नव्हता.
  
कृती ४ : (स्वमत / अभिव्यक्ती)
   प्रश्न.
   
   रेल्वेगाडीत अरुणिमावर झालेल्या हल्ल्याचे वर्णन वाचल्यावर तुमच्या मनात आलेले विचार लिहा.
   
   उत्तर :
   
   आपल्या देशात कायदा व सुव्यवस्थेचे अक्षरश: धिंडवडे निघत आहेत, त्याचाच हा एक नमूना होता. हीच स्थिती मोठमोठ्या शहरांमध्येसुद्धा अजूनही आढळते. स्त्रियांना तर एकाकी ठिकाणी जायलाच नको, असे झाले आहे. गुंडांना पोलिसांची भीती राहिली नाही. चोऱ्या सर्रास होत आहेत. दुकानदारांवर, बँकांवर, एटीएमवर दरोडे पडल्याच्या बातम्या आता नवीन राहिल्या नाहीत, चोर सापडत नाहीत. सापडले तर ते लवकर मुक्त होतात. मुक्त झाले नाहीत, तर त्यांचे पुढे काय होते, ते कळतच नाही. त्यामुळे गुंडांना कशाचीही भीती राहिलेली नाही. गुंड मोकाट सुटले आहेत. सामान्य माणसे त्यांच्याविरुद्ध तक्रार करायलाही घाबरतात. म्हणून लोकांना गुंडांविरुद्ध भूमिका घ्यायला भीती वाटते. नेमक्या याच कारणामुळे गाडीतले सहप्रवासी अरुणिमावर जीवघेणा हल्ला होत असतानाही मख्खपणे बसून राहिले. स्थिती बदलली तरच समाजात शांतता व सुव्यवस्था नांदेल.
  
    
  
   
    उतारा क्र. २
   
   
   
    प्रश्न. पुढील उतारा वाचा आणि दिलेल्या
   
   
   
    सूचनानुसार कृती करा :
   
  
कृती १ : (आकलन)
   प्रश्न 1.
   
   आकृती पूर्ण करा :
   
    
   
   उत्तर:
   
    
  
   प्रश्न 2.
   
   बरेलीच्या हॉस्पिटलात असलेल्या उणिवांवर अशी मात केली गेली :
   
   (i) …………………….
   
   (ii) …………………….
   
   उत्तर:
   
   (i) डॉक्टरांनी स्वत:च स्वतःचे एक युनिट रक्त दिले.
   
   (ii) भूल न देताच डॉक्टरांनी अरुणिमाचा पाय कापला.
  
   प्रश्न 3.
   
   विधाने पूर्ण करा :
   
   (i) अरुणिमा राष्ट्रीय पातळीवरील चॅम्पियन असल्यामुळे तिला AIIMS मध्ये ……………………….
   
   (ii) बचेंद्रीपाल स्वत:च एव्हरेस्ट सर करणाऱ्या पहिल्या महिला असल्याने त्या अरुणिमाच्या मनातल्या भावना ओळखू शकत होत्या, म्हणून ……………………….
   
   उत्तर:
   
   (i) अरुणिमा राष्ट्रीय पातळीवरील चॅम्पियन असल्यामुळे तिला AIIMS मध्ये अत्युच्च दर्जाच्या सुविधा मिळाल्या,
   
   (ii) बचेंद्रीपाल स्वत:च एव्हरेस्ट सर करणाऱ्या पहिल्या महिला असल्याने त्या अरुणिमाच्या मनातल्या भावना ओळखू शकत होत्या, म्हणून तो पाय कापण्याच्या शस्त्रक्रियेनंतर थोडेसे सावरल्यावर थेट बचेंद्री पाल यांच्याकडे गेली.
  
   प्रश्न 4.
   
   अरुणिमाच्या वाट्याला आलेली विपरीतता सांगा, ……………………….
   
   उत्तर:
   
   एका बाजूला असे दिसत होते की, राष्ट्रीय खेळाडू असल्याने अरुणिमाला अत्युच्च दर्जाच्या सुविधा मिळत होत्या आणि त्याच वेळेला प्रसारमाध्यमांमधून तिची प्रचंड मानहानी करणाऱ्या अफवा पसरत होत्या.
  
    
  
   प्रश्न 5.
   
   आकृती पूर्ण करा :
   
    
   
   उत्तर:
   
    
  
कृती २ : (आकलन)
   प्रश्न 6.
   
   कोण ते लिहा :
   
   (i) अरुणिमाला स्वत:चे रक्त देणारे
   
   (ii) अरुणिमाला AIIMS मध्ये दाखल करणारे :
   
   (iii) अरुणिमांचे ढालीप्रमाणे रक्षण करणारे
   
   (iv) अरुणिमाला खंबीरपणे सोबत करणारे
   
   उत्तर:
   
   (i) अरुणिमाला स्वतःचे रक्त देणारे : डॉक्टर व त्यांचे सहकारी
   
   (ii) अरुणिमाला AIIMS मध्ये दाखल करणारे : क्रीडामंत्री
   
   (iii) अरुणिमांचे ढालीप्रमाणे रक्षण करणारे : कुटुंबीय
   
   (iv) अरुणिमाला खंबीरपणे सोबत करणारे : भाईसाब
  
   प्रश्न 7.
   
   अरुणिमाचा ध्येयवाद ज्यांतून व्यक्त होतो अशा बाबी :
   
   (i) ………………………………
   
   (ii) ………………………………
   
   (iii) ………………………………
   
   उत्तर:
   
   (i) हॉस्पिटलात पडल्या पडल्या अरुणिमाने एव्हरेस्ट सर करण्याचा निर्धार केला.
   
   (ii) डिस्चार्ज मिळाल्यावर अरुणिमा दोनच दिवसांत उभी राहिली.
   
   (iii) उठता-बसता, खाता-पिता अरुणिमा फक्त एव्हरेस्टचाच विचार करू लागली.
  
   प्रश्न 8.
   
   पुढील कृतीतून व्यक्त होणारे अरुणिमाचे गुण लिहा :
   
   (i) अरुणिमाने भूल न देताच स्वत:चा पाय कापून टाकण्याची सूचना केली.
   
   (ii) अरुणिमाने एव्हरेस्ट सर करण्याचा निर्णय घेतला. :
   
   (iii) डिस्चार्जनंतर दोनच दिवसांत अरुणिमा उभी राहिली.
   
   उत्तर:
   
   (i) अरुणिमाने भूल न देताच स्वत:चा पाय कापून टाकण्याची सूचना केली : पराकोटीचे धैर्य
   
   (ii) अरुणिमाने एव्हरेस्ट सर जबरदस्त करण्याचा निर्णय घेतला : आत्मविश्वास
   
   (iii) डिस्चार्जनंतर दोनच दिवसांत अरुणिमा उभी राहिली : जिद्द
  
    
  
कृती ३ : (व्याकरण)
   प्रश्न 1.
   
   पुढील इंग्रजी शब्दांना मराठी प्रतिशब्द लिहा :
   
   (i) युनिट
   
   (ii) मोटिव्हेटर
   
   (iii) पेशंट.
   
   उत्तर:
   
   (i) युनिट – माप, मात्रा
   
   (ii) मोटिव्हेटर – स्फूर्तिदाता
   
   (iii) पेशंट – रूग्ण.
  
   प्रश्न 2.
   
   कंसातील प्रत्यय जोडून पूर्ण रूप लिहा :
   
   (i) कैरी(ला) =
   
   (ii) गाळण(ला) =
   
   (iii) खडू(ना) =
   
   (iv) कलम(त) =
   
   उत्तर:
   
   (i) केरी(ला) = कैरीला
   
   (ii) गाळण (ला) = गाळणीला
   
   (iii) खडू(ना) = खडूंना
   
   (iv) कलम(त) = कलमात,
  
   
    उतारा क्र. ३
   
   
   
    प्रश्न,
   
   
    पुढील उतारा वाचा आणि दिलेल्या सूचनांनुसार कृती करा :
   
  
कृती १ : (आकलन)
   प्रश्न 1.
   
   योग्य माहिती लिहा :
   
   (i) एव्हरेस्ट मार्गावरील बेस कॅम्पची संख्या :
   
   (ii) चौथ्या बेस कॅम्पपासून एव्हरेस्टची उंची :
   
   (iii) शेवटच्या टप्प्याला दिलेले नाव :
   
   (iv) मृतदेहांचा खच पडलेला दिसतो तो टप्पा :
   
   (v) एव्हरेस्ट चढाईचा फोटो काढणारा :
   
   (vi) एव्हरेस्टवर भारताचा तिरंगा फडकवणारी पहिली अपंग महिला :
   
   उत्तर:
   
   (i) एव्हरेस्ट मार्गावरील बेस कॅम्पची संख्या : ४
   
   (ii) चौथ्या बेस कॅम्पपासून एव्हरेस्टची उंची : ३५०० फूट
   
   (iii) शेवटच्या टप्प्याला दिलेले नाव : डेथ झोन
   
   (iv) मृतदेहांचा खच पडलेला दिसतो तो टप्पा : डेथ झोन
   
   (v) एव्हरेस्ट चढाईचा फोटो काढणारा : शेरपा
   
   (vi) एव्हरेस्टवर भारताचा तिरंगा फडकवणारी पहिली अपंग महिला : अरुणिमा
  
    
  
   प्रश्न 2.
   
   कोण ते लिहा :
   
   (i) कष्टप्रद प्रशिक्षण पार पाडणारी
   
   (ii) अरुणिमासोबत जायला तयार नसलेला
   
   (iii) शेरपाचे मन वळवणारे
   
   (iv) मृत्युमुखी पडलेल्या गिर्यारोहकाचा देश
   
   (v) शेवटच्या टप्प्यात अरुणिमाला मागे फिरण्याची विनंती करणारा
   
   (vi) ओझे होते म्हणून जास्ती ऑक्सिजन मास्क फेकून देणारा
   
   (vii) अरुणिमाला आत्मविश्वास देणारे
   
   उत्तर:
   
   (i) कष्टप्रद प्रशिक्षण पार पाडणारी : अरुणिमा
   
   (ii) अरुणिमासोबत जायला तयार नसलेला : शेरपा
   
   (iii) शेरपाचे मन वळवणारे : अरुणिमाचे कुटुंबीय
   
   (iv) मृत्युमुखी पडलेल्या गिर्यारोहकाचा बांग्लादेश
   
   (v) शेवटच्या टप्प्यात अरुणिमाला मागे फिरण्याची विनंती करणारा : शेरपा
   
   (vi) ओझे होते म्हणून जास्ती ऑक्सिजन मास्क फेकून देणारा : ब्रिटिश गिर्यारोहक
   
   (vii) अरुणिमाला आत्मविश्वास देणारे : गिर्यारोहण
  
   प्रश्न 3.
   
   परिणाम लिहा : (सराव कृतिपत्रिका-३) अरुणिमाचा ऑक्सिजन साठा संपल्याचा परिणाम
   
   उत्तर:
   
   अरुणिमाचा जीव गुदमरू लागला, श्वास घेण्याचा ती प्रयत्न करू लागली.
  
   प्रश्न 4.
   
   चुकीचे विधान शोधा.
  
   अरुणिमाच्या मते, ……………………………
   
   (अ) प्रयत्न निष्फळ ठरणे म्हणजे अपयश नाही.
   
   (आ) कमकुवत ध्येय म्हणजे अपयश नव्हे.
   
   (इ) आयुष्यात चांगली व्यक्ती बनणे महत्त्वाचे.
   
   (ई) नशिबापेक्षा कर्तृत्वावर विश्वास ठेवावा,
   
   उत्तर:
   
   अरुणिमाच्या मते, कमकुवत ध्येय म्हणजे अपयश नव्हे.
  
कृती २ : (आकलन)
   प्रश्न 1.
   
   अरुणिमाचा ध्येयवाद दाखवून देणाऱ्या कृती लिहा.
   
   उत्तर:
   
   (i) मरणप्राय कष्ट असलेले प्रशिक्षण अरुणिमाने जिद्दीने पूर्ण केले.
   
   (ii) स्वतः अपंग असूनही अरुणिमा सहकारी गिर्यारोहकांच्या सतत पुढे राही.
   
   (iii) डेथ झोनमधील भीषणता पाहिल्यावर ‘आपल्याला मरायचं नाही,’ असे अरुणिमा स्वत:ला बजावत राहिली.
   
   (iv) एव्हरेस्ट सर करण्याचा क्षण नोंदवण्यासाठी अरुणिमाने शेवटचा साठा असलेला ऑक्सिजन मास्क काढला. ही कृती मृत्यूला कवटाळण्यासारखी होती.
  
    
  
   प्रश्न 2.
   
   पुढील कोष्टक पूर्ण करा :
  
| अरुणिमाची कृती | अरुणिमाचा गुण | 
| (i) पराकोटीच्या कष्टाचे प्रशिक्षण अरुणिमाने चालूच ठेवले. | ………………………………. | 
| (ii) गिर्यारोहण करताना अरुणिमा सर्वांच्या पुढे राहायची. | ………………………………. | 
| (iii) पोटातून वर येणाऱ्या भीतीला आवर घातला. | ………………………………. | 
| (iv) ऑक्सिजन संपत आला तरी अरुणिमा डगमगली नाही; | ………………………………. | 
उत्तर:
    
  
   प्रश्न 4.
   
   आकृती पूर्ण करा : (सराव कृतिपत्रिका-३)
   
    
   
   उत्तर:
   
    
  
कृती ३ : (व्याकरण)
   प्रश्न 1.
   
   वाक्प्रचार व अर्थ यांच्या जोड्या लावा :
   
    
   
   उत्तर:
   
   (i) तावून-सुलाखून निघणे – आत्यंतिक कठोर परीक्षेत यशस्वी होणे.
   
   (ii) अग्निदिव्याला तोंड देणे – कठोर परीक्षेला सामोरे जाणे,
   
   (iii) पित्त खवळणे – खूप संतापणे.
   
   (iv) घडा देणे – शिकवण देणे.
  
    
  
   प्रश्न 2.
   
   अनेकवचन लिहा :
   
   (i) केंद्र – ………………………………….
   
   (ii) गोष्ट – ………………………………….
   
   (iii) पाय – ………………………………….
   
   (iv) चवडा – ………………………………….
   
   (v) वेदना – ………………………………….
   
   (vi) पाऊल – ………………………………….
   
   (vii) गिरी – ………………………………….
   
   (vi) लढाई – ………………………………….
   
   (ix) चढाई – ………………………………….
   
   (x) मृत्यू – ………………………………….
   
   (xi) सासू – ………………………………….
   
   (xii) केळे – ………………………………….
   
   उत्तर:
   
   (i) केंद्र – केंद्रे
   
   (ii) गोष्ट – गोष्टी
   
   (iii) पाय – पाय
   
   (iv) चवडा – चवडे
   
   (v) वेदना – वेदना
   
   (vi) पाऊल – पावले
   
   (vii) गिरी – गिरी
   
   (viii) लढाई – लढाया
   
   (ix) चढाई – चढाया
   
   (x) मृत्यू – मृत्यू
   
   (xi) सासू – सासवा
   
   (xii) केळे – केळी.
  
   प्रश्न 3.
   
   सूचनेनुसार कृती करा, अधोरेखित शब्दाचा विरुद्धार्थी शब्द वापरून वाक्य पुन्हा लिहा : (सराव कृतिपत्रिका-३)
   
   प्रयत्न निष्फळ ठरणे म्हणजे अपयश नसतं.
   
   उत्तर:
   
   प्रयत्न निष्फळ ठरणे म्हणजे यश नसते, असे नाही.
  
    
  
   प्रश्न 4.
   
   पुढील तक्ता पूर्ण करा. (सराव कृतिपत्रिका-३)
   
   शब्द – विभक्तीचे नाव
   
   (i) माझ्यात – ………………………………………
   
   (ii) गिर्यारोहणाने – ………………………………………
   
   उत्तर:
   
   शब्द – विभक्तीचे नाव
   
   (i) माझ्यात – सप्तमी
   
   (ii) गिर्यारोहणाने – तृतीया
  
व्याकरण व भाषाभ्यास
   
    कृतिपत्रिकेतील प्रश्न ४ (अ) आणि (आ) यांसाठी…
   
   
   
    अव्याकरण घटकांवर आधारित कृती :
   
  
१. समास :
   तक्ता पूर्ण करा:
   
   सामासिक शब्द – विग्रह – समास
   
   (i) दुःखमुक्त ………………………. – ……………………….
   
   (i) पूर्वपश्चिम ………………………. – ……………………….
   
   (iii) गल्लोगल्ली ………………………. – ……………………….
   
   (iv) पालापाचोळा ………………………. – ……………………….
   
   (v) सप्तपदी ………………………. – ……………………….
   
   (vi) धर्माधर्म ………………………. – ……………………….
   
   उत्तर:
   
   सामासिक शब्द – विग्रह – समास
   
   (i) दुःखमुक्त – दुःखापासून मुक्त – विभक्ती तत्पुरुष
   
   (ii) पूर्वपश्चिम – पूर्व आणि पश्चिम – इतरेतर वंदव
   
   (iii) गल्लोगल्ली – प्रत्येक गल्लीत – अव्ययीभाव
   
   (iv) पालापाचोळा – पाला, पाचोळा वगैरे – समाहार वंद्व
   
   (v) सप्तपदी – सात पावलांचा समूह – द्विगू
   
   (vi) धर्माधर्म – धर्म किंवा अधर्म – वैकल्पिक द्वंद्व
  
    
  
   २. अलंकार :
   
   पुढील लक्षणांवरून अलंकार ओळखा व एक उदाहरण दया :
   
    
   
   उत्तर :
   
   हा व्यतिरेक अलंकार आहे.
   
   उदाहरण : कामधेनुच्या दुग्धाहुनहीं ओज हिचे बलवान,
  
   ३. वृत्त
   
   पुढील ओळींचे गण पाडा व वृत्त ओळखा :
   
   जो घे न भोग जरी पात्र-करी न देही
   
   त्याच्या धनास मग केवळ नाश पाही:
   
   उत्तर :
   
    
   
   वृत्त : हे वसंततिलका वृत्त आहे.
  
   ४. शब्दसिद्धी :
   
   (१) (१) ‘पणा’ हा प्रत्यय असलेले चार शब्द लिर:
   
   [ ] [ ] [ ] [ ]
   
   (२) ‘प्र’ हा उपसर्ग असलेले चार शब्द लिहा :
   
   [ ] [ ] [ ] [ ]
   
   (३) ‘दिवसेंदिवस सारखे चार अभ्यस्त शब्द लिहा :
   
   [ ] [ ] [ ] [ ]
  
   (२) खालील तक्ता पूर्ण करा. (मार्च १९)
   
   अवजड, लढाई, निरोगी, जमीनदार.
   
   प्रत्ययघटित – उपसर्गघटित
   
   उत्तर:
   
   मख्खपणा – तल्लखपणा
   
   खंबीरपणा – कणखरपणा
  
(२) प्रभाव प्रशिक्षण – प्रमोद प्रकार
   (३) महिनोंमहिने – क्षणोक्षणी
   
   जवळपास – वारंवार
  
   (२) खालील तक्ता पूर्ण करा.
   
   प्रत्ययघटित – उपसर्गघटित
   
   लढाई – अवजड
   
   जमीनदार – निरोगी
  
    
  
५. सामान्यरूप :
   (१) तक्ता भरा :
   
    
   
   उत्तर:
   
    
  
   *(२) तक्ता भरा:
   
    
   
   उत्तर:
   
    
  
    
  
   ६. वाक्प्रचार:
   
   (१) बरोबर जोडी ओळखा :
   
   (i) सर करणे – काबीज करणे.
   
   (ii) देवाघरी जाणे – जिवंत ठेवणे.
   
   (iii) शिरोधार्य मानणे – अपमान करणे,
   
   (iv) घोळ निस्तरणे – घोटाळा करणे.
   
   उत्तर :
   
   बरोबर जोडी → सर करणे – काबीज करणे.
  
   (२) चुकीची जोडी ओळखा :
   
   (i) चक्काचूर होणे – चिरडून नाश पावणे.
   
   (ii) वावड्या उठणे – खोट्या बातम्या पसरणे,
   
   (iii) पित्त खवळणे – आजारी पडणे.
   
   (iv) गगनभरारी घेणे – यशाकडे झेप घेणे.
   
   उत्तर :
   
   चुकीची जोडी → पित्त खवळणे – आजारी पडणे,
  
   (३) दिलेल्या वाक्यांत कंसातील वाकप्रचारांचा वापर करून वाक्य पुन्हा लिहा : (मार्च १९) (कान देऊन ऐकणे, मुहूर्तमेढ रोवणे, अचंवित होणे)
   
   (i) सरांचे भाषण मी लक्षपूर्वक ऐकत होते.
   
   (ii) सर्कशीतील रोमांचक कसरती पाहून राधा आश्चर्यचकित झाली.
   
   उत्तर:
   
   (i) सरांचे भाषण मी कान देऊन ऐकत होतो.
   
   (ii) सर्कशीतील रोमांचक कसरती पाहून राधा अचंबित झाली.
  
भाषिक घटकांवर आधारित कृती:
   (३) पुढील शब्दसमूहासाठी एक शब्द लिहा :
   
   उत्तर:
   
   (i) पर्वतावर चढणारी व्यक्ती – गिर्यारोहक
   
   (ii) डोंगरावर चढणे – गिर्यारोहण
   
   (iii) उत्तुंग घेतलेली झेप – गगनभरारी
   
   (iv) जखमा औषध लावून झाकणारी – मलमपट्टी
   
   (v) नियमबद्ध घेतलेले शिक्षण – प्रशिक्षण
  
   (४) पुढील शब्दाचे दोन अर्थ लिहा : (सराव कृतिपत्रिका-३)
   
   [ ] ←[घन]→ [ ]
   
   उत्तर :
   
   [ढग] ←[घन]→ [दाट]
  
   (५) पुढील शब्दांच्या अक्षरांपासून चार अर्थपूर्ण शब्द लिहा :
   
   (i) देवाघरी → [ ] [ ] [ ] [ ]
   
   (i) गगनभरारी → [ ] [ ] [ ] [ ]
   
   उत्तर:
   
   (i) देवाघरी → [देवा] [घरी] [रीघ] [वघ]
   
   (i) गगनभरारी → [गगन] [नभ] [भरारी] [रन]
  
    
  
   २. लेखननियम :
   
   (१) अचूक शब्द लिहा :
   
   (i) शौरोधार्य / शिरोधार्य / शिरोर्याय / शौरपार्य.
   
   (ii) पूरस्कार / पुरसकार / पुरस्कार / पुरस्कर.
   
   (iii) ऊत्स्फूर्त/ उत्स्फूर्त/ उस्त्फूर्त/ उत्स्फुर्त. (सराव कृतिपत्रिका-३)
   
   (iv) मनःस्थिती/मनस्थिती/मनःस्थिति / मनःस्थीती
   
   (v) सम्मान/संमान सम्मान/सनमान.
   
   उत्तर:
   
   (i) शिरोधार्य
   
   (ii) पुरस्कार
   
   (iii) उत्स्फूर्त
   
   (iv) मनःस्थिती
   
   (v) सन्मान.
  
   (२) पुढील वाक्ये लेखननियमानुसार लिहा :
   
   (i) मूसंडि मारत शीताफीने मि कॉर्नर सीट पटकावलि.
   
   (ii) येक रेल्वे माज्या पायांवरुन धडधडत निघुन गेली.
   
   उत्तर:
   
   (i) मुसंडी मारत शिताफीने मी कॉर्नर सीट पटकावली.
   
   (ii) एक रेल्वे माझ्या पायांवरून घडधडत निघून गेली.
  
   ३. विरामचिन्हे :
   
   पुढील वाक्यात योग्य ठिकाणी विरामचिन्हे घालून वाक्ये पुन्हा लिहा :
   
   (i) ओहो किती सुंदर दृश्य आहे ते
   
   (ii) तो म्हणाला तुला काही कळतं की नाही
   
   उत्तर:
   
   (i) ओहो, किती सुंदर दृश्य आहे ते!
   
   (ii) तो म्हणाला, “तुला काही कळतं की नाही?”
  
४. पारिभाषिक शब्द :
   (१) पुढील इंग्रजी पारिभाषिक शब्दांना मराठी प्रतिशब्द लिहा :
   
   उत्तर:
   
   (i) Bonafide Certificate – वास्तविकता प्रमाणपत्र
   
   (ii) Application form – आवेदन पत्र
   
   (iii) Feedback – प्रत्याभरण
   
   (iv) News Agency – वृत्तसंस्था
   
   (v) Official Record – कार्यालयीन अभिलेख
   
   (vi) Overtime – अतिरिक्त काळ,
  
    
  
   ५. अकारविल्हे/भाषिक खेळ :
   
   पुढील शब्द अकारविल्हेनुसार लिहा :
   
   (i) शिक्षण → प्रशिक्षण → सहनशक्ती → दुरवस्था.
   
   (ii) स्टेशन → लखनऊ → गर्दी → लक्ष,
   
   उत्तर:
   
   (i) दुरवस्था → प्रशिक्षण → शिक्षण → सहनशक्ती.
   
   (ii) गर्दी – लखनऊ → लक्ष → स्टेशन.
  
गोष्ट अरुणिमाची शब्दार्थ
- जन्मजात – जन्मापासून.
- सांगणारेय – सांगणार आहे.
- निस्तरण्यासाठी – केलेल्या चुका सुधारून काम पूर्ण करणे.
- कसेबसे – नाइलाजाने, मोठ्या कष्टाने, अनिच्छेने, जमेल तसे.
- दुरवस्था – वाईट अवस्था,
- तल्लखपणे – तीक्ष्णपणे, आत्यंतिक हुशारीने, सर्व बुद्धिमत्ता वापरून.
- शल्य – टोचणी.
- खडतर – कठीण, त्रासदायक, उग्र.
- सहीसलामत – सुखरूप.
गोष्ट अरुणिमाची इंग्रजी शब्दांचे अर्थ
- कॉल लेटर – नोकरीचे आमंत्रण देणारे नेमणुकीपूर्वीचे पत्र.
- नॅशनल – राष्ट्रीय, कॉर्नर
- सीट – कडेचे आसन, (रेल्वे)
- ट्रॅक – (रेल्वे) रूळ.
- हॉस्पिटल – रुग्णालय,
- मोटिव्हेटर – स्फूर्तिदाता.
- डिस्चार्ज – रुग्णालयातून उपचारांनंतर रुग्णाची केलेली पाठवणूक, डेथ
- झोन – मृत्युप्रवण क्षेत्र.
- स्पॉन्सरशिप – प्रायोजकता,
- ऑक्सिजन – प्राणवायू.
- फॉर्चुन – भवितव्य, बेस
- कॅम्प – तळछावणी.
- डेस्टिनी – नियती, दैव, प्रारब्ध, प्राक्तन,
गोष्ट अरुणिमाची वाक्प्रचार व त्यांचे अर्थ
- शिरोधार्य मानणे : आदरपूर्वक स्वीकार करणे.
- विचारचक्र सुरू होणे : विचार सुरू होणे.
- प्रसाद देणे : आशीर्वाद म्हणून एखादी गोष्ट देणे; (येथे अर्थ) भरपूर बदडून काढणे.
- ढालीप्रमाणे रक्षण करणे : सर्व संकटे स्वतः झेलून दुसऱ्याचे रक्षण करणे.
- गगनभरारी घेणे : खूप प्रगती करणे.
- वेड रक्तात असणे : मुळातच ओढ असणे.
- डोक्यावर परिणाम होणे : वेड लागणे.
- हसण्यावारी नेणे : काहीही महत्त्व न देणे.
- दाखवून देणे : सिद्ध करणे.
- तावून सुलाखून निघणे : आत्यंतिक कठीण परीक्षेत यशस्वी होणे.
- तोंड देणे : सामोरे जाणे.
- पित्त खवळणे : खूप संतापणे.
- धडा देणे : शिकवण देणे.
- चाळण होणे : चाळणीप्रमाणे भोके पडणे, छिन्नविच्छिन्न होणे.