Bolave Kase Poem 5th Marathi Question Answer Chapter 12 Maharashtra Board

Std 5 Marathi Lesson 12 बोलावे कसे Question Answer Maharashtra Board

Balbharti Maharashtra State Board Class 5 Marathi Solutions Sulabhbharati Chapter 12 बोलावे कसे Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

5th Std Marathi Poem Bolave Kase Question Answer

5th Standard Marathi Digest Chapter 12 बोलावे कसे Textbook Questions and Answers
1. अशा वेळी तुम्ही काय कराल, ते लिहा.

प्रश्न (अ)
तुम्ही प्रवास करताना एखादी वृद्ध व्यक्ती बसमध्ये उभी आहे.
उत्तर:
स्वत:ची जागा तिला बसायला देऊ.

Maharashtra-State-Board-Solutions

प्रश्न (आ)
लहान मूल कडेवर घेऊन एक काकू बसमध्ये उभ्या आहेत.
उत्तर:
स्वत:ची जागा तिला बसायला देऊ.

प्रश्न (इ)
तुमच्या घरच्या फोनवर अनोळखी व्यक्तीचा फोन आला आहे.
उत्तर:
नम्रपणे त्या व्यक्तीला ‘तुम्ही चुकीचा नंबर लावला आहे’ असं सांगू.

प्रश्न (ई)
एखादी अनोळखी व्यक्ती पत्ता शोधत तुमच्या घरी आली आहे.
उत्तर:
त्या व्यक्तीला योग्य त्या ठिकाणाची माहिती देऊ.

प्रश्न (उ)
तुमच्या शाळेतील एखादा अपंग विद्यार्थी तुमच्या घराजवळ राहतो.
उत्तर:
त्याला सोबत घेऊनच शाळेत येऊ.

2. खालील रकाने वाचा व शिक्षकांच्या मदतीने समजून घ्या.

प्रश्न 1.
खालील रकाने वाचा व शिक्षकांच्या मदतीने समजून घ्या.
Maharashtra-Board-Class-5-Marathi-Solutions-Chapter-12-बोलावे-कसे-1
व्यक्ती, वस्तू, गुण यांच्या नावांना ‘नाम’ असे म्हणतात..

Maharashtra-State-Board-Solutions

3. खालील वाक्यांतील ‘नामे ओळखा’ व लिहा.

प्रश्न 1.
खालील वाक्यांतील ‘नामे ओळखा’ व लिहा.

  1. हॅलो काका; मी संजू बोलतोय.
  2. आजी, तुम्ही या जागेवर बसा.
  3. दिनेश हा गुणी मुलगा आहे.

उत्तर:

  1. नाम – काका, संजू
  2. नाम – आजी
  3. नाम – दिनेश

4. खालील वाक्यांत योग्य नामे लिहा.

प्रश्न 1.
खालील वाक्यांत योग्य नामे लिहा.
1. …………………….. माझा जिवलग मित्र आहे.
2. माझ्या दप्तरात …………………. “या वस्तू आहेत.
उत्तरः
1. महेश
2. पुस्तक, वही, कंपासपेटी

5. खालील गोलातील शब्दांना शेजारच्या माळेतील योग्य मणी लावा व नवीन शब्द तयार करा.

प्रश्न 1.
खालील गोलातील शब्दांना शेजारच्या माळेतील योग्य मणी लावा व नवीन शब्द तयार करा.
उदा. ओला – ओलावा
Maharashtra-Board-Class-5-Marathi-Solutions-Chapter-12-बोलावे-कसे-2
उत्तर:

  1. लहान + पण – लहानपण
  2. चपळ + ताई – चपळाई
  3. मोठे + पण – मोठेपण

Marathi Sulabhbharati Class 5 Solutions Chapter 12 बोलावे कसे Additional Important Questions and Answers

1. खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा.

प्रश्न 1.
पहिल्या प्रसंगात संभाषण कोणामध्ये चालू होते?
उत्तर:
पहिल्या प्रसंगात संभाषण संजू व अंजू यांच्यामध्ये चालू होते.

Maharashtra-State-Board-Solutions

प्रश्न 2.
संजू फोनवरच्या व्यक्तीला काय संबोधतो?
उत्तर:
संजू फोनवरच्या व्यक्तीला ‘काका’ संबोधतो.

प्रश्न 3.
चुकीचा फोन लागल्यावर संजू काय करतो?
उत्तर:
चुकीचा फोन लागल्यावर संजू झटकन फोन ठेवतो.

प्रश्न 4.
संजूच्या हातून कोणती चूक झाली?
उत्तर:
संजूकडून चुकीच्या क्रमांकावर फोन लावला गेला, ही चूक झाली.

प्रश्न 5.
अंजू, संजूला कशाप्रकारे समजावते?
उत्तर:
चुकीचा नंबर लावल्यावर ‘मला माफ करा, चुकून तुमचा नंबर लागला’ असं नम्रपणे म्हणायला हवं अशाप्रकारे अंजू संजूला समजावते.

प्रश्न 6.
दुसरा प्रसंग कुठला आहे?
उत्तर:
दुसरा प्रसंग बसमधील आहे.

प्रश्न 7.
दिनेशच्या अगदी शेजारी कोण उभे आहे?
उत्तर:
दिनेशच्या अगदी शेजारी आजी उभ्या आहेत.

Maharashtra-State-Board-Solutions

प्रश्न 8.
दिनेश आपल्या जागेवरून का उठला?
उत्तर:
त्याच्या शेजारी एक आजी उभ्या होत्या. त्यांना बसायला मिळावे म्हणून दिनेश आपल्या जागेवरून उठला.

प्रश्न 9.
आजीने दिनूचे कौतुक कोणत्या शब्दात केले?
उत्तर:
आजीने दिनूचे कौतुक ‘गुणी मुलगा’ या शब्दात केले.

प्रश्न 10.
दिनेशच्या मते, सर्वांचं कर्तव्य काय आहे?
उत्तर:
दिनेशच्या मते, वृद्ध व्यक्तींना बस, रेल्वेमध्ये बसण्यास जागा देणं, हे सर्वांचं कर्तव्य आहे.

प्रश्न 11.
दिनेशचे कौतुक कोणाला वाटले?
उत्तर:
दिनेशचे कौतुक आजीला वाटले.

2. खालील वाक्ये कोणी कोणास म्हटली आहेत?

प्रश्न 1.
“संजू, तू चुकीचा नंबर लावला होतास.”
उत्तर:
अंजू, संजूला म्हणाली.

प्रश्न 2.
“आजी तुम्ही या जागेवर बसा.”
उत्तर:
दिनेश आजीला (बसमधील) म्हणाला.

प्रश्न 3.
“किती गुणी मुलगा आहेस तू”
उत्तरः
आजी, दिनेशला म्हणाल्या.

Maharashtra-State-Board-Solutions

प्रश्न 4.
मोलकरणीच्या मुलाला खूप शिकायचं आहे.
उत्तर:
आम्ही त्याला अभ्यासात मदत करू; तसेच फी भरण्यास हातभार लावू.

प्रश्न 5.
खालील समानार्थी शब्दांच्या जोड्या जुळवा.

‘अगट’ “ब गट’
1. झटकन (अ) म्हातारा
2. नम्र (ब) क्षमा
3. मुलगा (क) विनयशील
4. वृद्ध (ड) पटकन
5. माफ (इ) दिन
6. दिवस (ई) पुत्र

उत्तरः

‘अगट’ “ब गट’
1. झटकन (ड) पटकन
2. नम्र (क) विनयशील
3. मुलगा (ई) पुत्र
4. वृद्ध (अ) म्हातारा
5. माफ (ब) क्षमा
6. दिवस (इ) दिन

प्रश्न 6.
खालील विरुद्धार्थी शब्दांच्या जोड्या जुळवा.

‘अ गट’ ‘ब गट’
1. दिवस (अ) अवगुणी
2. चूक (ब) रात्र
3. वृद्ध (क) उठणे
4. नम्र (ड) तरुण
5. गुणी (इ) उद्धट
6. बसणे (ई) बरोबर

उत्तरः

‘अ गट’ ‘ब गट’
1. दिवस (ब) रात्र
2. चूक (ई) बरोबर
3. वृद्ध (ड) तरुण
4. नम्र (इ) उद्धट
5. गुणी (अ) अवगुणी
6. बसणे (क) उठणे

Maharashtra-State-Board-Solutions

व्याकरण व भाषाभ्यास:

प्रश्न 1.
खालील वाक्यांतील ‘नामे ओळखा’ व लिहा.

  1. घर सुंदर आहे.
  2. मी आज बसने प्रवास केला.
  3. माझी आजी गावाला राहते.
  4. आमची शाळा मोठी आहे.
  5. विदयार्थी वाचन करतात.
  6. आंबा फळांचा राजा आहे.
  7. मी मुंबईला राहतो.
  8. मुले अभ्यास करतात.
  9. आई पेरू कापते.

उत्तर:

  1. नाम – घर
  2. नाम – बस
  3. नाम – आजी, गाव
  4. नाम – शाळा
  5. नाम – वाचन; विदयार्थी
  6. नाम – आंबा, फळ
  7. नाम – मुंबई
  8. नाम – मुले
  9. नाम – आई, पेरू.

प्रश्न 2.
खालील वाक्यांत योग्य नामे लिहा.

  1. ……………………. फळांचा राजा आहे.
  2. …………………… सर्व ‘बापू’ म्हणतात.
  3. ………………….कडू आहे.
  4. ……………………. थंड हवेचे ठिकाण आहे.

उत्तरः

  1. आंबा
  2. गांधीजींना
  3. कारल
  4. महाबळेश्वर

बोलावे कसे Summary in Marathi

पाठ्यपरिचय:

‘बोलावे कसे?’ या पाठात पहिल्या प्रसंगात फोन केल्यावर समोरच्या व्यक्तीशी कसे बोलायचे ते सांगितले आहे व वृद्धांना मदत करणे, हे आपले कर्तव्य आहे हे दुसऱ्या प्रसंगात सांगितले आहे.

Maharashtra-State-Board-Solutions

शब्दार्थ:

  1. दिवस – दिन (a day)
  2. झटकन – लगेच (quickly)
  3. नम्र – विनयशील (polite, humble)
  4. शेजारी – जवळच (closed)
  5. जागा – स्थान (place)
  6. गुणी – चांगला (virtuous)
  7. कर्तव्य – कार्य (duty)
  8. चुकिया – (wrong)
  9. आजी – म्हतारी स्त्री पाठाप्रमाणे (grand mother)
  10. प्रसंग – दृश्य (scene)