Balbharti Maharashtra State Board Class 9 Marathi Solutions Aksharbharati Chapter 12.1 व्हेनिस Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.
Marathi Aksharbharati Std 9 Digest Chapter 12.1 व्हेनिस Textbook Questions and Answers
1. टिपा लिहा.
प्रश्न 1.
टिपा लिहा.
1. ग्रँड कॅनॉल
2. व्हेनिसच्या स्टेशन बाहेरचा परिसर
उत्तर:
1. ग्रँड कॅनॉल:
व्हेनिस स्टेशनच्या बाहेर रस्त्याऐवजी एखादया विस्तीर्ण नदीसारखा प्रचंड कालवा दिसतो. त्यालाच ’ग्रँड कॅनॉल’ म्हणतात. त्यात अनेक पॉटर टॅक्सी म्हणजे लहान मोटार लाँचीस आणि मोठ्या यांत्रिक नावा उभ्या असतात. प्रवासी पोटात घेऊन या नावा उत्साहाने याच कॅनॉलवर ये-जा करत असतात. प्रेमात पडलेल्या युगुलांना विजेच्या वेगाने सुसाट घेऊन जाणाऱ्या मोटर लाँचेसपर्यंत वेगाच्या अनेक प्रकारच्या नावा या ग्रँड कॅनॉलवर प्रवास करत असतात.
या कॅनॉलच्या पाण्यात नेहमीच तारुण्य सळसळताना दिसते. या ग्रँड कॅनॉलच्या किनाऱ्यावर खुा टाकलेल्या दिसतात. या चार खुर्त्यांच्यामध्ये टेबल आणि त्यावर रंगीबेरंगी प्रचंड छत्री ठेवलेली आढळते. या खुर्त्यांवर बसून बिअर किंवा कॉफी घेत पाण्यातून प्रवास करणाऱ्या नावांकडे पाहणे सगळ्यांना मनापासून आवडते.
2. व्हेनिसच्या स्टेशन बाहेरचा परिसरः
‘व्हेनिस’ स्टेशनच्या बाहेर रस्ता नाहीच. एखादया विस्तीर्ण नदीसारखा पसरलेला एक प्रचंड कालवा आहे. त्यालाच ’ग्रँड कॅनॉल’ म्हणतात. लेखक तेथे पोहोचला तेव्हा या कॅनॉलमध्ये अनेक पॉटर टॅक्सी म्हणजे लहान मोटर लाँचीस आणि मोठ्या यांत्रिक नावा उभ्या होत्या. ’व्हेनिझिया-व्हेनिझिया, पियाझापियाझा’ असा यांचा पुकार चालला होता. टॅक्सीपेक्षा बस स्वस्त पडणार त्यामुळे इतर अनेक प्रवाशांप्रमाणे मोठ्या बोटीचे तिकीट घेऊन लेखक बोटीत बसला. दोनएकशे प्रवासी पोटात घेऊन नाव जोरात पुढे निघाली होती.
2. खालील मुद्द्यांच्या आधारे व्हेनिसचे वर्णन लिहा.
प्रश्न 1.
खालील मुद्द्यांच्या आधारे व्हेनिसचे वर्णन लिहा.
(अ) व्हेनिस म्हणजे अफाट जलदर्शन [ ]
(ब) व्हेनिस म्हणजे अवर्णनीय शहर [ ]
उत्तरः
व्हेनिस म्हणजे केवळ कालव्यांचेच नव्हे तर कालव्यातही तरंगणारे शहर आहे. या शहरात एकही मोटार नाही कारणया शहरात खऱ्या अर्थाने रस्तेच नाहीत. इथे जिकडे तिकडे पाणरस्तेच आहेत. या पाणरस्त्यांवरच अनेक छोट्या-मोठ्या नावा उत्साही प्रवाशांना घेऊन ये-जा करत असतात. व्हेनिसचे रस्ते म्हणजे पाणरस्ते असतात याची कल्पना नसलेला एक मुनीम एकदा लंडनहून व्हेनिसला विमानाने आला. रस्त्यावर सगळीकडे पाणीच पाणी झालेले पाहून त्याने आपल्या मालकाला तार केली, “व्हेनिसमध्ये पूर आला आहे. सगळे रस्ते पाण्यानं तुडुंब भरले आहेत.
परत येऊ की पूर ओसरेपर्यंत वाट पाहू ते कळवा!” जिकडे पाहावे तिकडे पाणी आणि पाणीच दिसते. व्हेनिस म्हणजे खऱ्या अर्थाने अफाट जलदर्शन आहे. अशा या व्हेनिसच्या हवेत गारवा असतो. इथल्या वाऱ्यात उत्साही आणि मनात संगीत नाचत असते. तसेच सभोवार पसरलेल्या पाण्यात तारुण्याची सळसळ दिसते. त्यामुळेच व्हेनिस शहराचे वर्णन शब्दांत करताच येत नाही.
3. खालील संकल्पना स्पष्ट करा.
प्रश्न 1.
व्हेनिस म्हणजे हिया-माणकांच्या ढिगासारखा बेटांचा पुंजका ………….
उत्तरः
व्हेनिस या शहरात सर्वत्र पाणीच पाणी दिसते. पाण्यावर तरंगणारे हे अद्भूत शहर आहे. हा गाव म्हणजे खऱ्या अर्थाने शहर नाहीच. तर अनेक छोट्या-छोट्या बेटांचा समूहच आहे. अनेक कालवे आणि त्यांना जोडणारे पूल यामुळे हे शहर खुलून दिसते. मधूनच चर्च किंवा जुना राजवाडा यांची टोके आभाळात घुसल्याप्रमाणे वाटणारे हे शहर मखमली सागरावर टाकलेल्या हिऱ्या-माणकांच्या ढिगासारखे लांबून दिसते. म्हणूनच जो कोणी इथे येतो तो निळ्या पाण्यात तरंगणाऱ्या या शहराच्या प्रेमात पडतो.
प्रश्न 2.
व्हेनिस म्हणजे निरुयोगी शहर ………………… .
उत्तरः
युरोप खंडातले पाण्यावर तरंगणारे जगातले एकमेव शहर म्हणजे ’व्हेनिस’ होय. इथे सर्वत्र पाणरस्तेच आहेत. इथल्या कालव्यांमधून अनेक लहान-मोठ्या नावा उत्साही प्रवाप बसून बिअर किंवा कॉफी घेत समोरून सरकणाऱ्या विविध आकारांच्या आणि अनंत प्रकारांचे उतारू म्हणजेच प्रवासी वाहून नेणाऱ्या नावांची ये-जा पाहत बसायचे. तीच गंमत या नावांमधून प्रवास करणाऱ्यानांही पाहायला मिळते. डेकवर येऊन किनाऱ्यावरच्या निरुदयोगी संथ, शांत, चित्रविचित्र प्रवाशांच्याकडे पाहत पुढे-पुढे सरकायचे. हे शहर निरुदयोग्यांसाठीच आहे, असे वाटते कारण इथे येणाऱ्या प्रवाशांना कसलीही घाई-गर्दी नसते. न्यूयॉर्क, मुंबई, हाँगकाँग अशा शहरांतल्या धावपळीपासून हे पूर्णपणे वेगळे शांत असे शहर आहे.
4. ‘व्हेनिस’हे पाण्यातले जगातले एकमेव शहर आहे. पाठाच्या आधारे या विधानाची सत्यता पटवून दया.
प्रश्न 1.
‘व्हेनिस’हे पाण्यातले जगातले एकमेव शहर आहे. पाठाच्या आधारे या विधानाची सत्यता पटवून दया.
उत्तरः
व्हेनिस हे पाण्यातले असे जगातले एकमेव अद्भूत शहर आहे. या शहरात एकही मोटार नाही. वाहतूक नियंत्रण करणारा पोलीस नाही. ट्रॅफिक लाईट्स नाहीत आणि रस्त्यावर धक्काबुक्की नाही असे हे जगातले एकमेव शहर आहे कारण याला खऱ्या अर्थाने रस्तेच नाहीत. इथे फक्त कालवे आहेत आणि त्यांना जोडणारे पूल आहेत. आईच्या गळ्यात मुलाने लडिवाळपणे प्रेमळपणे हात टाकावे तसे हे पूल आहेत.
येथील पाणरस्त्यांतूनच अनेक लहान-मोठ्या यांत्रिक नावा हौशी प्रवाशांना तसेच प्रेमात पडलेल्या युगुलांना सुसाट वेगाने घेऊन जात-येत असतात. येथील हवेत गारवा असतो. वाऱ्यात उत्साह असतो. मनात संगीत असते आणि विशेष म्हणजे सभोवार परसलेल्या पाण्यात तारुण्याचा उत्साह दिसून येतो. त्यामुळेच निळ्या पाण्यावर तरंगणारे हे शहर सोडताना उगाच मनाला हुरहुर वाटते.
5. तुम्ही पाहिलेल्या तुम्हाला आवडलेल्या कोणत्याही स्थळाचे वर्णन तुमच्या शब्दांत करा.
प्रश्न 1.
तुम्ही पाहिलेल्या तुम्हाला आवडलेल्या कोणत्याही स्थळाचे वर्णन तुमच्या शब्दांत करा.
उत्तरः
मागच्या रविवारी माझ्या ताईच्या सासुरवाडीला जाण्याचा योग आला. कोकणातील दापोली तालुक्यातील ’आंबिवली’ हे तिचे सासर. डोंगराच्या कुशीत वसलेले, निसर्गसौंदत्या निसर्गसौंदर्याने मी मोहूनच गेलो. सर्वत्र धुके पसरलेले होते. डोंगराच्या पलिकडून सूर्य हळूहळू वर येत होता. आकाश सोनेरी रंगाने रंगून गेले होते. मी खूप आनंदी झालो होतो. शहरातील सिमेंट काँक्रिटच्या जंगलात वाढलेल्या माझ्यासारख्या मुलाला त्या सौंदर्याचा हेवा वाटू लागला.
भाषाभ्यास:
विरामचिन्हे:
प्रश्न 1.
खालील वाक्ये वाचा व अभ्यासा.
1. आवडले का तुला हे पुस्तक
2. हो जेवणानंतर मी सर्व गोष्टी वाचणार आहे जया म्हणाली
3. वडील म्हणाले ज्ञानेश्वरी कुणी लिहिली तुला ठाऊक आहे का
वरील संवाद वाचताना वाक्य कुठे संपते, प्रश्न आहे की उद्गार आहे, हे काहीच कळत नाही कारण या वाक्यात विरामचिन्हे नाहीत. बोलताना काही विधाने करताना, प्रश्न विचारताना, आश्चर्य, हर्ष, क्रोध आदी भावना व्यक्त करताना माणूस त्या त्या ठिकाणी कमी अधिक वेळ थांबतो, म्हणून तोच आशय लिहून दाखवताना वाचकालाही कळावा, यासाठी विरामचिन्हांचा वापर केला जातो.
प्रश्न 2.
वरील वाक्यातील चिन्हे आणि त्यांची नावे यांचा तक्ता तयार करा.
Marathi Akshar Bharati Class 9 Textbook Solutions Chapter 12.1 व्हेनिस Additional Important Questions and Answers
प्रश्न 1.
धावपळीच्या शहरी जीवनातून वेळ काढून मनुष्य निसर्गरम्य शांत ठिकाणांना भेट देत असतो. यावर तुमचे विचार लिहा.
उत्तरः
शहरी जीवन हे धकाधकीचे व धावपळीचे जीवन आहे. या जीवनात माणसाला आराम नाही. दिवस रात्र कामेच कामे त्यास करावी लागतात. कोणत्याच प्रकारचा विरंगुळा त्यास अनुभवायास मिळत नाही. कोणत्याही प्रकारची करमणूक नाही. मनुष्य अशा प्रकारच्या जीवनाला कंटाळतो व तो तीन ते चार दिवस का होईना निसर्गरम्य शांत स्थळाला भेट देतो. निसर्ग मानवाला ताजे टवटवीत व प्रसन्न करतो. तो माणसाचा सर्व थकवा वा वेदना दूर करून त्यात ऊर्जा निर्माण करतो. जीवनात उमेदीने उभी राहण्याची प्रेरणा देतो. म्हणून मनुष्य धावपळीच्या शहरी जीवनातून वेळ काढून निसर्गरम्य शांत ठिकाणांना भेट देत असतो.
प्रश्न 2.
तुम्हांला कधी एखादया शहराला भेट दिल्यानंतर ते सोडताना मनात हुरहुर निर्माण झालेली आहे का? तुमचा अनुभव कथन करा.
उत्तरः
मी गेल्या वर्षी माझ्या कुटुंबासोबत दुबईला गेलो होतो. दुबई हे जगातील एक भव्य व दिव्य असे शहर आहे. रात्रीच्या वेळी सत्र दिव्यांची रोषणाई पाहून आपले डोळे दिपून जातात. ओसाड वाळवंटावर वसलेले हे शहर पाहून सर्वजण आश्चर्यचकित होतात. उंचच उंच गगनचुंबी इमारती पाहून मन थक्क होते. तसेच समुद्रातील पाण्यावर वसलेले बुर्ज खलिफा हे पंचतारांकित हॉटेल पाहून मल धन्य होते. दुबई येथील म्युजियम स्नो वर्ल्ड क्रीडा झोन पाहून मनाला सुखद आश्चर्याचा धक्का बसतो.
जागोजागी विविध प्रकारची सुंदर सुंदर झाडे लावून तयार केलेली उदयाने पाहताना मन अगदी भरून येते. रंगीबेरंगी फुलझाडे पाहून मन टवटवीत होते. दुबई येथील चौफेर रस्त्यावरून गाड्या अगदी भरधाव वेगाने पुढेच पुढे सरसावताना पाहून मनाला एक प्रकारची भुरळच पडते. असे हे शहर सोडताना माझ्या मनात एक प्रकारची हुरहुर निर्माण झालेली होती. निघताना असेच वाटत होते की याच स्थळी राहावे.
लेखकाचा परिचय:
प्रस्तावना:
‘व्हेनिस’ हे स्थूलवाचन लेखक रमेश मंत्री’ यांनी लिहिले आहे. या पाठात युरोप खंडातील ’व्हेनिस’ या पाण्यावर तरंगणाऱ्या शहरातील वातावरण, हवामान, निसर्गसौंदर्य व जीवनमान याचे धुंद वर्णन आले आहे.
The writer of ’Vhenis’ is ’Ramesh Mantri’. He has explained about the atmosphere, weather, natural beauty and life style of vhenis in this chapter.
शब्दार्थ:
टिपा:
वाक्प्रचार:
1. हूरहूर वाटणे - चिंता वाटणे