Balbharti Maharashtra State Board Class 9 Marathi Solutions Aksharbharati Chapter 15 माझे शिक्षक व संस्कार Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Marathi Aksharbharati Std 9 Digest Chapter 15 माझे शिक्षक व संस्कार Textbook Questions and Answers

1. खालील वाक्यांचा संदर्भासहित अर्थ स्पष्ट करा.

प्रश्न (अ)
शाळेच्या बागा’ लेखकांसारख्या मुलांच्या जिवावर उभ्या होत्या.
उत्तरः
संदर्भ – शंकरराव खरात यांच्या ‘माझे शिक्षक व संस्कार’ या पाठातून हे वाक्य घेतले आहे. शाळेच्या ‘बागा’ उभारताना लेखक व इतर मुलांचे लाभलेले योगदान या वाक्यातून दिसून येते.

अर्थ – लेखक व लेखकांसारखी हाडा-पिंडाने मोठी असलेली मुले कष्टाच्या कामात कणखर होती. विहिरीचं पाणी दोन-दोन तास राहाटेने ओढून, बागेतल्या फुलझाडांना, फळझाडांना ती मुले पाणी देत असत. त्यामुळे ती फुलझाडे-फळझाडे तरारून उभी राहत होती. बागेला संरक्षण मिळावे; म्हणून मुले बागेतील जमीन कुदळी, टिकावाने खोदायची. त्याचे वाफे करायची व बागेसभोवार बांध घालायची. अशी सर्व कष्टाची कामे केल्यामुळे शाळेच्या ‘बागा’ लेखकांसारख्या मुलांच्या जिवावर उभ्या होत्या, असे म्हटले आहे.

प्रश्न (आ)
लेखक सातारा जिल्हयातील औंधला जायच्या विचारात होते.
उत्तरः
संदर्भ – शंकरराव खरात यांच्या अर्थ – लेखक गावच्या शाळेत शिकत होते. तेथे उत्तम शिक्षणाची सोय होती. शिक्षकही चांगले होते. योग्य मार्गदर्शन व उत्तम संस्कार ते वेळोवेळी मुलांवर करत असत. पण लेखकांना पुढील शिक्षण घ्यायचे होते. पुढील शिक्षणाची सोय गावच्या शाळेत नव्हती म्हणून लेखक सातारा जिल्ह्यात औंधला जायच्या विचारात होते.

2. जोड्या जुळवा.

प्रश्न 1.
जोड्या जुळवा.

शिक्षक गुणवैशिष्ट्य
1.  श्री. नाईक (अ) स्काउटगाईड अध्यापनतज्ज्ञ
2. श्री. देशमुख (आ)गणित अध्यापनतज्ज्ञ
3. श्री. गोळीवडेकर (इ) समुपदेशक आणि शिस्तप्रिय
4. श्री. कात्रे (ई) शेतीतज्ज्ञ

उत्तरः

शिक्षक गुणवैशिष्ट्य
1.  श्री. नाईक (इ) समुपदेशक आणि शिस्तप्रिय
2. श्री. देशमुख (अ) स्काउटगाईड अध्यापनतज्ज्ञ
3. श्री. गोळीवडेकर (ई) शेतीतज्ज्ञ
4. श्री. कात्रे (आ)गणित अध्यापनतज्ज्ञ

3. चौकटी पूर्ण करा.

प्रश्न 1.
चौकटी पूर्ण करा.
पाठावरून तुम्हाला जाणवलेली लेखकाची स्वभाववैशिष्ट्ये लिहा.


उत्तर:

4. खालील परिणाम ज्या घटनेचे आहेत, त्या घटना लिहा.

प्रश्न (अ)
परिणाम – हिरमुसले होऊन लेखक कुस्तीच्या मैदानातून माघारी फिरले.
उत्तरः
घटना – मैदानात कुणीतरी लेखकांना जातीवरून हटकले.

प्रश्न (आ)
परिणाम – लेखकाची मान खाली गेली होती.
उत्तरः
घटना – प्रौढ साक्षरतेचा वर्ग बंद ठेवून त्याठिकाणी धूलिवंदनाच्या दिवशी तमाशा चालला होता. ते पाहून रायगावकर मास्तर मागे वळले.

5. समर्पक उदाहरण लिहा.

प्रश्न (अ)


उत्तरः
उदाहरण – लेखक कुस्तीची लढत लढण्यासाठी मैदानात उतरले असता त्यांना कुणीतरी ओळखले व हटकले.

प्रश्न (आ)


उत्तरः
उदाहरण- बागेतील फुलझाडांना वफळझाडांना पाणी देण्यासाठी लेखक व त्यांचे मित्र विहिरीचे पाणी दोन-दोन तास राहाटाने ओढून काढत.

प्रश्न 6.
आकृतिबंध पूर्ण करा.


उत्तर:

पश्न 7.
चौकटीतील वाक्प्रचारांचा अर्थ लिहा.

उत्तर:

8. स्वमत.

पश्न 1.
विदयार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासात शिक्षकांची भूमिका महत्त्वाची आहे, या विधानाबाबत तुमचे मत सोदाहरण स्पष्ट करा.
उत्तरः
उतारा 1 मधील कृती 4 : स्वमतचे उत्तर पहा.

पश्न 2.
शिक्षक व विदयार्थी यांच्यातील नातेसंबंधाविषयी तुमच्या संकल्पना स्पष्ट करा.
उत्तरः
उतारा 3 मधील कृती 4 : स्वमतचे उत्तर पहा.

उपक्रम:

तुमचे प्राथमिक शाळेतील शिक्षक आठवा व त्यांतील अविस्मरणीय शिक्षकांशी संबंधित असलेल्या तुमच्या आठवणी लिहा.

भाषाभ्यास:

पश्न 1.
अधोरेखित शब्दांविषयी खालील माहिती भरून तक्ता पूर्ण करा.

वाक्ये सरळरूप सामान्यरूप प्रत्यय
1. रमेशचा भाऊ शाळेत गेला. 1.
2.
2. बँकेने शेतकऱ्याला कर्ज दिले. 1.
2.
3. सुट्टीत तो मित्रांशी खेळतो. 1.
2.
4. मंडईत फळांच्या गाड्या आहेत. 1.
2.

Marathi Akshar Bharati Class 9 Textbook Solutions Chapter 15 माझे शिक्षक व संस्कार Additional Important Questions and Answers

1. पुढील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा:

कृती 1 : आकलन कृती

प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा.
उत्तर:

प्रश्न 2.
उताऱ्यानुसार वाक्यांचा क्रम लावा.

उत्तर:

खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा.

प्रश्न 1.
लेखकांचा पुढील शिक्षणासाठी कोठे जाण्याचा विचार होता?
उत्तरः
लेखकांचा पुढील शिक्षणासाठी औंध (जि. सातारा) येथील हायस्कूलमध्ये जाण्याचा विचार होता.

प्रश्न 2.
लेखकांचे वडील कोणाकडे लाकडे फोडायला जायचे?
उत्तर:
लेखकांचे वडील कात्रे मास्तरांच्या घरी लाकडे फोडायला जायचे.

प्रश्न 3.
शाळेच्या बागा’ कोणाच्या जिवावर उभ्या होत्या?
उत्तर:
शाळेच्या बागा’ लेखकासारख्या मुलांच्या जिवावर उभ्या होत्या.

प्रश्न 4.
कंसातील योग्य शब्द वापरून रिकाम्या जागा भरा.
1. श्री. ……….. मास्तर मला मराठी पाचवीत होते. (गोळीवडेकर, पाटकर, देशमुख, कात्रे)
2. श्री. हणमंतराव देशमुखांनी मला इंग्रजी ………… भाषांतर शिकवले. (तराडकरांचे, तर्खडकरांचे, कठिण शब्दांचे, परिच्छेदाचे)
उत्तर:
1. गोळीवडेकर
2. तर्खडकरांचे

कृती 2 : आकलन कृती

1. योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा.

प्रश्न 1.
आम्ही मुलं वयानं तसंच ……………….
(अ) आडदांड मोठाड.
(ब) मजबूत कणखर.
(क) हाडा-पिंडाने मोठाड.
(ड) बांधा मोठाड.
उत्तर:
आम्ही मुलं वयानं तसंच हाडा-पिंडाने मोठाड.

प्रश्न 2.
लेखकांना यश मिळणार याची ………………
(अ) खात्री होती.
(ब) माहिती होती.
(क) समज होती.
(ड) कल्पना होती.
उत्तर:
लेखकांना यश मिळणार याची खात्री होती.

प्रश्न 3.
कोण ते लिहा.
उत्तर:

प्रश्न 4.
आकृतिबंध पूर्ण करा.
उत्तर:

4. चूक की बरोबर लिहा.

प्रश्न 1.
1. कात्रे मास्तरांच्या घरी लेखकांचे वडील साफ सफाई करायला जायचे.
2. गोळीवडेकर मास्तर इतिहास भूगोल शिकवायचे.
उत्तर:
1. चूक
2. बरोबर

कृती 3 : व्याकरण कृती

प्रश्न 1.
खालील वाक्ये लेखननियमांनुसार शुद्ध करून लिहा.
आम्ही मूल वयानं तसंच हाडा-पींडाने मोठाड.
उत्तर:
आम्ही मुलं वयानं तसंच हाडा-पिंडाने मोठाड,

प्रश्न 2.
अचूक शब्द लिहा.
1. शेतीतज्ज्ञ, शेतितज्ञ, शेतीतदज्ञ, शेतीतज्ञ
2. तखडकर, तरखडकर, तर्खडकर, तरखरकर
उत्तर:
1. शेतीतज्ज्ञ
2. तर्खडकर

प्रश्न 3.
अधोरेखित शब्दाचा समानार्थी शब्द लिहून वाक्य पुन्हा लिहा.
त्यांची व माझी जवळची ओळख होती.
उत्तरः
त्यांचा व माझा जवळचा परिचय होता.

प्रश्न 4.
अधोरेखित शब्दाचा विरुद्धार्थी शब्द लिहून वाक्य पुन्हा लिहा.
यश मिळणार याची लेखकांना खात्री होती.
उत्तर:
अपयश मिळणार याची लेखकांना खात्री होती.

प्रश्न 5.
अधोरेखित शब्दाची जात ओळखा.
अबब! केवढा मोठा साप.
उत्तरः
केवलप्रयोगी अव्यय.

प्रश्न 6.
तक्ता पूर्ण करा.
उत्तरः

शब्द प्रत्यय विभक्ती
1. गावची ची षष्ठी विभक्ती (एकवचन)
2. शिक्षकाची ची षष्ठी विभक्ती (एकवचन)

प्रश्न 7.
तक्ता पूर्ण करा.
उत्तरः

शब्द मूळ शब्द सामान्यरूप
1. तर्खडकरांचे तर्खडकर तर्खडकरा
2. दम्याच्या दमा दम्या
3. मुलांच्या मुल मुलां
4. कष्टाची कष्ट कष्टा

प्रश्न 8.
कंसातील सूचनेनुसार बदल करा.
गोळीवडेकर मास्तर इतिहास, भूगोल शिकवायचे. (काळ ओळखा.)
उत्तरः
भूतकाळ

प्रश्न 9.
पर्यायी शब्द लिहा.
उत्तरः

कृती 4 : स्वमत

प्रश्न 1.
विदयार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासात शिक्षकांची भूमिका महत्त्वाची आहे. या विधानाबाबत तुमचे मत सोदाहरण स्पष्ट करा.
उत्तरः
शिक्षक विदयार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व घडवित असतात. त्यांना ज्ञान देऊन त्यांच्यावर योग्य ते संस्कार करत असतात. मुलांना योग्य प्रकारे मार्गदर्शन करून पुढील आयुष्यासाठी त्यांना तयार करत असतात. मानवी मूल्यांचे योग्य ते आदर्श मुलांसमोर उभे करण्याचे सामर्थ्य शिक्षकांत असते; त्यामुळेच विदयार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण होते. एखादया गोष्टीबद्दल विचार करण्याची सकारात्मक मानसिकता तयार होते. शिक्षक स्वत:च्या आचरणातून मुलांसमोर एक आदर्श निर्माण करण्याचे कार्य करतात. त्यामुळे मुलांना प्रेरणा मिळते व ते आपल्या शिक्षकांचे अनुकरण करतात. अशा प्रकारे मुलांच्या व्यक्तिमत्त्वाला सुडौल आयाम देण्याचे कार्य शिक्षकच करतात.

पुढील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा:

कृती 1 : आकलन कृती

प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा.
उत्तरः

प्रश्न 2.
कोण ते लिहा.
उत्तरः

प्रश्न 3.
उताऱ्यानुसार वाक्यांचा क्रम लावा.

उत्तर:

खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा.

प्रश्न 1.
लेखकांच्या शाळेत कोणाचा दरारा होता?
उत्तरः
लेखकांच्या शाळेत हेडमास्तर श्री. नाईक यांचा दरारा होता.

प्रश्न 2.
शाळेची दुसरी घंटा होताच हेडमास्तर श्री. नाईक काय करत असत?
उत्तरः
शाळेची दुसरी घंटा होताच हेडमास्तर श्री. नाईक हातात छडी घेऊन शाळेच्या दारात थांबत असत.

कंसातील योग्य शब्द वापरून रिकाम्या जागा भरा.

प्रश्न 1.
1. नाईक मास्तरांनी केलेला ………….. लेखक कधीच विसरू शकत नाही. (संस्कार, हितोपदेश, प्रयोग, अभिनय)
2. …………. मास्तरांसारखे ते कधीही इतर सार्वजनिक कार्यात पडत नसत. (श्री. हणमंतराव देशमुख, कात्रे, श्री. नाईक, श्री. रायगावकर)
उत्तर‌:‌
1. ‌हितोपदेश‌
2.‌ ‌श्री.‌ ‌रायगावकर‌ ‌

कृती‌ 2 ‌:‌ ‌आकलन‌ ‌कृती‌ ‌

प्रश्न 1.
योग्य‌ ‌पर्याय‌ ‌निवडून‌ ‌विधाने‌ ‌पूर्ण‌ ‌करा.‌ ‌
श्री.‌ ‌नाईक‌ ‌मास्तरांनी‌ ‌केलेला‌ ‌हितोपदेश‌ ‌लेखक‌ ‌कधीच‌ ‌विसरू‌ ‌शकत‌ ‌नाहीत;‌ ‌कारण‌ ‌……………….‌
‌(अ)‌ ‌शिस्तीच्या‌ ‌दृष्टीने‌ ‌कसं‌ ‌वागावे,‌ ‌जीवनात‌ ‌आपली‌ ‌प्रगती‌ ‌कशी‌ ‌करून‌ ‌घ्यावी.‌ ‌
(ब)‌ ‌सगळी‌ ‌कष्टाची‌ ‌कामे‌ ‌श्री.‌ ‌नाईक‌ ‌मास्तर‌ ‌करत‌ ‌असत.‌
‌(क)‌ ‌शाळेत‌ ‌दरारा‌ ‌असे,‌ ‌ते‌ ‌शिस्तीचे‌ ‌भोक्ते‌ ‌होते.‌
‌(ड)‌ ‌शाळेची‌ ‌दुसरी‌ ‌घंटा‌ ‌होताच‌ ‌ते‌ ‌हातात‌ ‌छडी‌ ‌घेऊन‌ ‌शाळेच्या‌ ‌दारात‌ ‌थांबत‌ ‌असत.‌
‌उत्तर:‌
‌श्री.‌ ‌नाईक‌ ‌मास्तरांनी‌ ‌केलेला‌ ‌हितोपदेश‌ ‌लेखक‌ ‌कधीच‌ ‌विसरू‌ ‌शकत‌ ‌नाहीत;‌ ‌कारण‌ ‌शिस्तीच्या‌ ‌दृष्टीने‌ ‌कसं‌ ‌वागावे,‌ ‌जीवनात‌ ‌आपली‌ ‌प्रगती‌ ‌कशी‌ ‌करून‌ ‌घ्यावी.‌

प्रश्न 2.
आकृतिबंध‌ ‌पूर्ण‌ ‌करा.‌ ‌
‌उत्तर:‌

प्रश्न 3.
आकृतिबंध‌ ‌पूर्ण‌ ‌करा.‌ ‌
‌उत्तर:‌

‌चूक‌ ‌की‌ ‌बरोबर‌ ‌लिहा.‌

प्रश्न 1.
1.‌ ‌हेडमास्तर‌ ‌श्री.‌ ‌नाईक‌ ‌मास्तर‌ ‌यांचा‌ ‌शाळेत‌ ‌दरारा‌ ‌नसे.‌
2. ‌औंधला‌ ‌शिकायला‌ ‌जाणार‌ ‌म्हणून‌ ‌लेखक‌ ‌श्री.‌ ‌नाईक‌ ‌मास्तरांना‌ ‌भेटले.‌ ‌
उत्तर:‌
1. चूक‌ ‌
2. ‌बरोबर‌

‌कृती‌ ‌3 ‌:‌ ‌व्याकरण‌ ‌कृती‌

प्रश्न 1.
खालील‌ ‌वाक्य‌ ‌लेखननियमांनुसार‌ ‌शुद्ध‌ ‌करून‌ ‌लिहा.‌ ‌
या‌ ‌शिस्तप्रीय‌ ‌हेडमास्तरांनी‌ ‌माझ्या‌ ‌शाळेला‌ ‌चांगलीच‌ ‌शीस्त‌ ‌लावली.‌ ‌
उत्तर:‌
‌या‌ ‌शिस्तप्रिय‌ ‌हेडमास्तरांनी‌ ‌माझ्या‌ ‌शाळेला‌ ‌चांगलीच‌ ‌शिस्त‌ ‌लावली.‌ ‌

प्रश्न 2.
अचूक शब्द लिहा.
1. शिस्तप्रीय, शिस्तप्रिय, शीस्तप्रिय, शिस्तप्रिरय
2. मार्गदर्शन, मार्गदरशन, मारगदशन, मागदर्शन
उत्तर:
1. शिस्तप्रिय
2. मार्गदर्शन

अधोरेखित शब्दांचा समानार्थी शब्द लिहून वाक्ये पुन्हा लिहा.

प्रश्न 1.
हेडमास्तर श्री. नाईक मास्तर यांचा शाळेत वचक असे.
उत्तर:
हेडमास्तर श्री. नाईक मास्तर यांचा शाळेत दरारा असे.

प्रश्न 2.
परीक्षेच्या निकालाच्या दृष्टीने त्यांनी शाळेची चांगली सुधारणा केली.
उत्तरः
परीक्षेच्या निकालाच्या दृष्टीने त्यांनी शाळेची चांगली प्रगती केली.

अधोरेखित शब्दाचा विरुद्धार्थी शब्द लिहून वाक्य पुन्हा लिहा.

प्रश्न 1.
अधोरेखित शब्दाचा विरुद्धार्थी शब्द लिहून वाक्य पुन्हा लिहा.
परीक्षेच्या निकालाच्या दृष्टीने त्यांनी शाळेची अधोगती केली.
उत्तरः
परीक्षेच्या निकालाच्या दृष्टीने त्यांनी शाळेची प्रगती केली.

अधोरेखित शब्दाची जात ओळखा.

प्रश्न 1.
मी कधीच विसरू शकत नाही.
उत्तर:
सर्वनाम.

प्रश्न 2.
आम्हां मुलांसाठी वेगळी तालीम होती.
उत्तर:
विशेषण.

प्रश्न 3.
तक्ता पूर्ण करा.
उत्तर:

शब्द प्रत्यय विभक्ती
1. शाळेच्या च्या षष्ठी (एकवचन)
2. मास्तरांना ना द्वितीया (एकवचन)

प्रश्न 4.
तक्ता पूर्ण करा.
उत्तर:

शब्द मूळ शब्द सामान्यरूप
1. हेडमास्तरांनी हेडमास्तर हेडमास्तरां
2. शाळेच्या शाळा शाळे
3. परीक्षेच्या परीक्षा परीक्षे

खालील वाक्यात अधोरेखित शब्दांऐवजी पाठात आलेले योग्य वाक्प्रचार शोधून वाक्य पुन्हा लिहा.

प्रश्न 1.
रामला समिरने मार्गदर्शन केले.
उत्तरः
रामला समिरने समुपदेशन केले.

प्रश्न 2.
हेडमास्तर श्री. नाईक यांचा शाळेत वचक होता.
उत्तरः
हेडमास्तर श्री. नाईक यांचा शाळेत दरारा होता.

कंसातील सूचनेनुसार बदल करा.

प्रश्न 1.
कंसातील सूचनेनुसार बदल करा.
ते शिस्तीचे कडे भोक्ते होते. (काळ ओळखा.)
उत्तरः
भूतकाळ.

प्रश्न 2.
पर्यायी शब्द लिहा.
उत्तरः

कृती 4 : स्वमत

प्रश्न 1.
शाळा ही विदयार्थ्यांवर संस्कार करणारे एक प्रमुख केंद्र असते या विधानावर तुमचे विचार स्पष्ट करा.
उत्तर:
शाळा विदयेचे माहेरघर असते. शाळेत शिकविणारे शिक्षक हे मुलांना विद्या देण्याचे कार्य करत असतात. जवळपास विदयार्थी रोज पाच ते सहा तास शाळेत असतात. एवढा वेळ मुलांवर संस्कार करण्यासाठी पुरेसा असतो. शिक्षक शिकवित असलेल्या विविध विषयांच्या माध्यमातून मुलांवर संस्कार करीत असतात. शाळेमध्ये होत असलेल्या निरनिराळ्या कार्यक्रमातून मुलांवर संस्कार होत असतात. तसेच शाळेमार्फत आयोजित केलेल्या शैक्षणिक सहलींतून मुलांवर संस्कार होत असतात. म्हणून शाळा हे विदयार्थ्यांवर संस्कार करणारे प्रमुख केंद्र आहे.

पुढील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा:

कृती 1 : आकलन कृती

प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा.
उत्तर:

प्रश्न 2.
उताऱ्यानुसार वाक्यांचा क्रम लावा.

उत्तर:

खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा.

प्रश्न 1.
लेखकांची समजूत कोणी काढली?
उत्तरः
लेखकांची समजूत श्री. रायगावकरांनी काढली.

प्रश्न 2.
रायगावकर मास्तर लेखकांना पाहून काय म्हणाले?
उत्तरः
“अरे! आज धूलिवंदन! हे चालायचेच!” असे रायगावकर मास्तर लेखकांना म्हणाले.

कंसातील योग्य शब्द वापरून रिकाम्या जागा भरा.

प्रश्न 1.
1. ‘अरे, समाज अजून ………… आहे. (निद्रिस्त, झोपलेला, जागा, आंधळा)
2. “………….. तू हे ध्यानात ठेव.” (शाम!, शंकर!, नाईक!, देशपांडे!)
उत्तर:
1. निद्रिस्त
2. शंकर!

प्रश्न 2.
आकृतिबंध पूर्ण करा.
उत्तर:

कृती 2: आकलन कृती

योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा.

प्रश्न 1.
एका थोराड मुलाला, ‘याला जोड, याला जोड’ म्हणून …..
(अ) फडात फिरवत होते.
(ब) मैदानात फिरवत होते.
(क) अंगणात फिरवत होते.
(ड) रस्त्यावर फिरवत होते.
उत्तर:
एका थोराड मुलाला, ‘याला जोड, याला जोड’ म्हणून फडात फिरवत होते.

प्रश्न 2.
श्री रायगावकर मास्तर चटकन परत फिरले; कारण …………………
(अ) प्रौढ वर्गाच्या कंदिलाच्या प्रकाशात तमाशा चालला होता.
(ब) शाळेत कंदिलाच्या प्रकाशात तमाशा चालला होता.
(क) प्रौढ वर्गात कंदिलाच्या प्रकाशात लावणी चालली होती.
(ड) सार्वजनिक ठिकाणी कंदिलाच्या प्रकाशात ढोल-ताशाचं वाक्य वाजत होते.
उत्तर:
श्री रायगावकर मास्तर चटकन परत फिरले; कारण प्रौढ वर्गाच्या कंदिलाच्या प्रकाशात तमाशा चालला होता.

प्रश्न 3.
चूक की बरोबर ते लिहा.
1. त्या दिवशी प्रौढ साक्षरतेचा वर्ग चालू होता.
2. सरांनी लेखकांना केलेला उपदेश लेखक कधीच विसरू शकत नव्हते.
उत्तर:
1. चूक
2. बरोबर

प्रश्न 4.
कोण कोणास म्हणाले ते लिहा.
उत्तर:

कृती 3 : व्याकरण कृती

खालील वाक्ये लेखननियमांनुसार शुद्ध करून लिहा.

प्रश्न 1.
1. लेखक हिरमूसला होऊन माघारि गेला.
2. त्या दीवशी प्रौढ साक्षरतेचा वरग बंद होता.
उत्तर:
1. लेखक हिरमुसला होऊन माघारी गेला.
2. त्या दिवशी प्रौढ साक्षरतेचा वर्ग बंद होता.

प्रश्न 2.
अचूक शब्द लिहा.
1. वस्तीतील, वस्तितिल, वस्तीतिल, वस्तितील
2. धूलीवंदन, धुलिवंदन, धूलिवंदन, धुलीवंदन
उत्तर:
1. वस्तीतील
2. धूलिवंदन

प्रश्न 3.
समानार्थी शब्द लिहा.
उत्तर:

प्रश्न 4.
विरुद्धार्थी शब्द लिहा.
उत्तर:

प्रश्न 5.
खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे वचन बदलून वाक्य पुन्हा लिहा.
त्या विदयेच्या मंदिरात तमाशा उभा कसा …….?
उत्तर:
त्या विद्येच्या मंदिरात तमाशे उभे कसे …………?

प्रश्न 6.
तक्ता पूर्ण करा.
उत्तर:

शब्द प्रत्यय विभक्ती
1. मैदानात सप्तमी (एकवचन)
2. रायगावकरांनी नी तृतीया (एकवचन)
3. प्रकाशात सप्तमी (एकवचन)
4. केलेला ला द्वितीया (एकवचन)

प्रश्न 7.
तक्ता पूर्ण करा.
उत्तर:

शब्द मूळ शब्द सामान्यरूप
1. हंगामात हंगाम हंगामा
2. कुस्त्यांचा कुस्ती कुस्त्यां
3. शिमग्याच्या शिमगा शिमग्या
4. मंदिरात मंदिर मंदिरा

प्रश्न 8.
खालील वाक्यात अधोरेखित शब्दांऐवजी पाठात आलेला योग्य वाक्प्रचार शोधून वाक्य पुन्हा लिहा.
रमेशला कब्बडी खेळायला न मिळाल्याने तो नाराज झाला.
उत्तर:
रमेशला कब्बडी खेळायला न मिळाल्याने तो हिरमुसला.

प्रश्न 9.
वाक्यातील काळ ओळखा.
समाज अजून निद्रिस्त आहे.
उत्तरः
वर्तमानकाळ.

प्रश्न 10.
काळ बदला.
सरांनी मला उपदेश केला होता. (वर्तमानकाळ करा.)
उत्तर:
सर मला उपदेश करत आहेत.

प्रश्न 11.
पर्यायी शब्द लिहा.
उत्तर:

कृति 4 : स्वमत

प्रश्न 1.
शिक्षक व विद्यार्थी यांच्यातील नातेसंबंधाविषयी तुमच्या संकल्पना स्पष्ट करा.
उत्तर:
शिक्षक विदयार्थ्यांना ज्ञान देत असतात. कळत-नकळत त्यांच्यावर संस्कार करत असतात. विदयार्थी सुद्धा शिक्षकांनी दिलेले ज्ञान आत्मसात करत असतात व संस्काराचे पालन करत असतात. त्यामुळेच त्यांच्यात एक प्रकारचे जिव्हाळ्याचे व स्नेहाचे संबंध निर्माण होत असतात. त्यांच्यात गुरू-शिष्याचे नाते निर्माण होते. विदयार्थी आपल्या शिक्षकांनी दिलेल्या सगळ्या सूचनांचे व निर्देशांचे पालन करत असतात. त्यांचे विचार स्वत:च्या जीवनात उतरवत असतात. त्यांचा आपल्या शिक्षकांवर विश्वास असतो. त्यामुळेच एका श्रद्धेच्या दृष्टिकोनातून ते आपल्या शिक्षकांकडे पाहत असतात. अशा प्रकारे विदयार्थ्यांसाठी त्याचे शिक्षक हे मात्या-पित्याची भूमिका बजावित असतात.

लेखकाचा परिचय:

नाव: शंकरराव खरात
कालावधी: 1921-2001
कथाकार, कादंबरीकार, लेखक, दलित चळवळीत सक्रिय सहभाग. ‘तडीपार’, ‘सांगावा’, ‘आडगावचे पाणी’ इत्यादी कथासंग्रह, ‘झोपडपट्टी’, ‘फूटपाथ नं. १’, ‘माझं नाव’, इत्यादी कादंबऱ्या, ‘तराळ-अंतराळ’ हे आत्मचरित्र.

प्रस्तावना:

‘माझे शिक्षक व संस्कार’ हा पाठ लेखक शंकरराव खरात यांनी लिहिला आहे. शालेय वयात शिक्षकांकडून केल्या जाणाऱ्या संस्कारांचे महत्त्व प्रस्तुत पाठातून लेखकाने व्यक्त केले आहे.

‘Maze Shikshak va Sanskar’ article is written by Shankarrao Kharat. The importance of teacher and his nurturing is narrated in this article.

शब्दार्थ:

टिपा:

वाक्प्रचार: