Balbharti Maharashtra State Board Class 9 Marathi Solutions Kumarbharti Chapter 13 थोडं ‘आ’ भारनियमन करूया Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.
9th Std Marathi Kumarbharati Digest Chapter 13 थोडं ‘आ’ भारनियमन करूया Textbook Questions and Answers
1. काय घडते ते पाठाच्या आधारे लिहून वाक्य पूर्ण करा:
प्रश्न 1.
काय घडते ते पाठाच्या आधारे लिहून वाक्य पूर्ण करा:
(अ) आदर मनात तुडुंब भरून असल्यास ………………..
(आ) खूप जवळच्या गहिऱ्या नात्यात शब्दांनी आभार मानल्यास ……………………….
(इ) मित्रमैत्रिणीने आभार मानल्यास ………………………………….
(ई) लेखिकांच्या मते ‘आ’भारनियमन केल्यास ……………….
उत्तर:
(अ) आदर मनात तुडुंब भरून असल्यास तो कृतीत सहजासहजी उतरतो.
(आ) खूप जवळच्या गहिऱ्या नात्यात शब्दांनी आभार मानल्यास उभयपक्षी अवघडलेपणा येतो. गहिरेपणा उणावून नुसती औपचारिकता उरते.
(इ) मित्रमैत्रिणीने आभार मानल्यास आपल्या पाठीत एक सणसणीत धपाटा मिळतो आणि ‘जादा आगाऊपणा केलास तर याद राख’ अशी धमकीही मिळते.
(ई) लेखिकांच्या मते, ‘आ’भारनियमन केल्यास त्या शब्दांमधला जिव्हाळा आणि भावनांची ऊब संपून जाणार नाही.
2. पाठातील उदाहरणे शोधा:
प्रश्न 1.
पाठातील उदाहरणे शोधा:
शब्दांशिवाय मानलेले आभार | स्पर्शाने | कटाक्षाने |
ऑपरेशनच्या गुंगीतून नुकताच बाहेर आलेला रुग्ण डॉक्टरांचे हात घट्ट धरतो. | आईच्या आजारपणात खूप मदत करणाऱ्या मित्रमैत्रिणींकडे कृतज्ञतेने टाकलेला कटाक्ष. |
3. चूक की बरोबर ते ओळखा:
प्रश्न 1.
चूक की बरोबर ते ओळखा:
(अ) आभार आणि अभिनंदन या शब्दांत माणसं अनेकदा गल्लत करतात.
(आ) भारतीय संस्कृतीत भावनांचे प्रदर्शन करणे आदर्श मानले जाते.
(इ) ममनात आदर असेल तर तो कृतीत दिसतो.
(ई) लआभार मानण्याचा अतिरेक चांगला नव्हे.
उत्तर:
(अ) बरोबर
(आ) चूक
(इ) मबरोबर.
(ई) लबरोबर
4. कारणे लिहा.
प्रश्न 1.
कारणे लिहा.
5. पाठातील विनोद निर्माण करणारी वाक्ये शोधा.
प्रश्न 1.
पाठातील विनोद निर्माण करणारी वाक्ये शोधा.
उत्तर:
6. खाली दिलेल्या शब्दांसाठी मराठी भाषेतील शब्द लिहा:
प्रश्न 1.
खाली दिलेल्या शब्दांसाठी मराठी भाषेतील शब्द लिहा:
उत्तर:
7. खाली दिलेल्या शब्दांचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा:
प्रश्न 1.
सुसंस्कृतपणाचा कडेलोट.
उत्तर:
शिष्टाचार पाळणे हे सुसंस्कृतपणाचे लक्षण मानले जाते. इंग्रज आपल्यापेक्षा श्रेष्ठच आहेत, असे मनोमन मानणारे खूप लोक आहेत. इंग्रज म्हणजे सुसंस्कृतच; ते जे जे करतात, ते ते सर्व सुसंस्कृतपणाचे लक्षणच होय; असे या लोकांना वाटते. इंग्रज लोक उठता-बसता बैंक्यू म्हणतात, म्हणून त्यांचे आंधळे अनुकरण करणारेही सतत बैंक्यू म्हणतात. या लोकांच्या मते, बँक्यू म्हणणे हा सुसंस्कृतपणाचा अत्युच्च बिंदू होय. हा सर्व भाव ‘सुसंस्कृतपणाचा कडेलोटच’ या शब्दांतून व्यक्त होतो.
प्रश्न 2.
घाऊक आभार
उत्तर:
सर्व व्यक्तींचे सर्व बाबींसाठी एकदाच एकत्रित आभार मानणे म्हणजे ‘घाऊक आभार’ मानणे होय.
8. स्वमत:
प्रश्न (अ)
‘आभार मानणे,’ या शिष्टाचाराविषयीचे तुमचे मत लिहा.
उत्तर:
आपण अनेक कामे पार पाडतो. ही कामे आपण पूर्णांशाने केलेली नसतात. त्या कामांना अनेकांचा हातभार लागलेला असतो. तरी कामाचे श्रेय आपल्याला मिळते. त्याचे फायदेही आपल्याला मिळतात. वास्तविक आपल्या एकट्याचा तो अधिकार नसतो. त्यावर इतरांचाही अधिकार असतो. पण श्रेय व फायदे मात्र आपण एकटेच घेतो. हे अनुचित होय. इतरांच्या सहकार्याशिवाय आपण काहीही करू शकत नाही. म्हणून इतरांच्या सहकार्याबद्दल, त्यांच्या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. आभार मानणे हा कृतज्ञता व्यक्त करण्याचाच प्रकार आहे.
लेखिका मंगला गोडबोले म्हणतात, तेही खरेच आहे. आभाराचा अतिरेक चालू आहे. क्षुल्लक कारणासाठीसुद्धा आभार मानले जातात. बऱ्याच वेळा समोरच्या व्यक्तीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याऐवजी आपण स्वतः सुसंस्कृत आहोत, असे दाखवण्यासाठी आभार मानले जातात. असे होते तेव्हा आभाराचा मूळ उद्देशच नष्ट होतो. म्हणून है आभार मानताना तारतम्य बाळगले पाहिजे. मुख्य म्हणजे अत्यंत प्रामाणिकपणे आभार मानले पाहिजेत.
प्रश्न (आ)
पाठाच्या शीर्षकातून तुम्हांला समजलेला विनोद तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
उत्तर:
भारनियमन म्हणजे विजेच्या पुरवठ्यात केलेली काटकसर. भारनियमन, काटकसर हे गोंडस शब्द झाले. वस्तुस्थिती अत्यंत विदारक आहे. मुंबईसारख्या शहरात 24 तास वीजपुरवठा चालू असतो. पण ग्रामीण भागात मात्र 10-10, 15-15 तास वीजपुरवठा बंद असतो. ग्रामीण जनतेला यामुळे अनेक हालअपेष्टांना तोंड दयावे लागते. शासन या हालअपेष्टा कमी करीत नाही, मात्र या हालअपेष्टांना गोंडस नाव देते – ‘भारनियमन’!
उलटी परिस्थिती दुसऱ्या ठिकाणी दिसते. लोक सुसंस्कृतपणाच्या कल्पनेच्या ओझ्याखाली ‘आभार’, ‘सॉरी’ वगैरे शब्दांचा वारेमाप वापर करतात. अत्यंत क्षुल्लक कारणासाठीसुद्धा या शब्दांची उधळमाधळ केली जाते. अनेकदा ही उधळण हास्यास्पद पातळीवर जाऊन पोहोचते. म्हणून लग्न करणाऱ्या नवऱ्या मुलाचे ‘लग्न केल्याबद्दल आभार’ मानले जातात. खरे तर ‘आभारा’ची काटकसर करणे आवश्यक आहे. वीजपुरवठ्यातील अपुरेपणा, ‘आभार’ इत्यादी शब्दांची उधळण या दोन विपरीत स्थितींचा निर्देश करण्यासाठी आणि ‘आभार’ मानण्याबाबत लोकांनी विवेक बाळगावा म्हणून ‘भार’ – ‘आभार’ या शब्दांची कोटी करीत लेखिकांनी ‘आभारनियमन’ हा शब्द घडवला आणि त्यावरून पाठाचे शीर्षक तयार केले आहे.
उपक्रम:
प्रश्न 1.
दैनंदिन व्यवहारात शब्दांच्या रचनेमुळे निर्माण होणाऱ्या विनोदाची उदाहरणे शोधा व वर्गात त्यांचे सादरीकरण करा.
भाषाभ्यास:
अक्षरगणवृत्ते यापूर्वी आपण पाहिली आहेत. आता आपण काही मात्रावृत्तांचा परिचय करून घेऊया.
1. दिंडी: पहिल्या चरणात 9, दुसऱ्या चरणात 10 मात्रा असतात. तेही 3-2-2-2, 3-3-2-2 असे मात्रागणांचे गट पडतात. ‘दिंडी’ हे मराठीतील जुने वृत्त आहे.
उदा., घोष होता ग्यानबा तुकाराम
राऊळाची ही वाट सखाराम
करी भक्ती चित्तात नृत्यलीला
पहा दिंडी चालली पंढरीला
12 22 212 2122
= 9 = 10
2. आर्या: आर्या हे देखील जुने वृत्त आहे. मोरोपंतांच्या आर्या प्रसिद्ध आहेत. आर्या वृत्तात 30 मात्रा असून 12+18 असे गट पडतात.
उदा., सुश्लोक वामनाचा अभंगवाणी प्रसिद्ध तुकयाची
ओवी ज्ञानेशाची किंवा आर्या मयूरपंताची
22 2222 22 22 121222
= 12 = 18
चार चरण असतील तर पहिल्या आणि तिसऱ्या चरणात 12 मात्रा; दुसऱ्या आणि चौथ्या चरणात 18 मात्रा असतात.
Marathi Kumarbharati Textbook Std 9 Answers Chapter 13 थोडं ‘आ’ भारनियमन करूया Additional Important Questions and Answers
उतारा क्र. 1
1. पुढील उतारा वाचून दिलेल्या सूचनांनुसार कृती करा:
कृती 1 : (आकलन)
प्रश्न 1.
चूक की बरोबर ते लिहा:
1. आभार अनेकदा कृत्रिम झाल्याने खोटे वाटू लागतात.
उत्तर:
1. बरोबर.
प्रश्न 2.
आकृती पूर्ण करा:
कृती 2 : (आकलन)
प्रश्न 1.
आकृती पूर्ण करा:
प्रश्न 2.
रोजच्या व्यवहारात आभाराचे अति झालेले प्रकार:
1. क्षुल्लक कारणांसाठी ……………………
2. नुकतं बोलायला लागलेल्या मुलालाही ………………………..
उत्तर:
1. क्षुल्लक कारणांसाठी माणसे एकमेकांचे आभार मानताना दिसतात.
2. नुकतं बोलायला लागलेल्या मुलालाही ‘बँक्स-र्थंक्यू’ वगैरे बोलायला शिकवतात.
उतारा क्र. 2
1. पुढील उतारा वाचून दिलेल्या सूचनांनुसार कृती करा:
कृती 1 : (आकलन)
प्रश्न 1.
संकल्पना स्पष्ट करा:
1. आभारबाज.
उत्तर:
1. लहानमोठ्या सर्व कारणांसाठी, अगदी क्षुल्लक कारणांसाठीसुद्धा, सतत आभार मानण्याची चटक लागलेली व्यक्ती म्हणजे ‘आभारबाज’ होय.
कृती 2 : (आकलन)
प्रश्न 1.
माहिती लिहा:
अजूनही तयार न झालेली आभाराची कार्डे:
1. ………………………………..
2. ………………………………..
उत्तर:
अजूनही तयार न झालेली आभाराची कार्डे :
1. जन्मल्या जन्मल्या आई-बापांचे आभार मानणारे कार्ड.
2. मरण पावल्यावर खालून वेळच्या वेळी वर पोहोचवणाऱ्यांचे आभार मानणारे कार्ड.
प्रश्न 2.
का ते लिहा:
1. अलीकडच्या लहान मुलाच्या खात्यावर ‘मॅनरलेसपणा’ रुजू होणार नाही.
2. आभार मानणे दिवसेंदिवस कृत्रिम होत आहे.
उत्तर:
1. अलीकडच्या लहान मुलाच्या खात्यावर ‘मॅनरलेसपणा’ रुजू होणार नाही; कारण अगदी लहानपणापासून शिकवल्याप्रमाणे तो वेळच्या वेळी सर्वांचे न विसरता आभार मानतो.
2. आभार मानणे दिवसेंदिवस कृत्रिम होत आहे; कारण सर्व नात्यांना, सर्व निमित्तांना लागू होतील अशी छापील कार्डे सर्रास वापरली जातील. आभाराचे छापील कार्ड हाच कृत्रिमतेचा नमुना आहे.
कृती 3 : (स्वमत/अभिव्यक्ती)
प्रश्न 1.
शुभेच्छा कार्डे, आभार कार्डे, अभिनंदन कार्डे इत्यादींबद्दल तुमचे मत लिहा.
उत्तर:
शुभेच्छा कार्डे आकर्षक रितीने छापलेली असतात. कागद छान असतो. एकूण मांडणी सुरेख असते. शब्दांची रचनाही लक्षवेधक असते. पण तरीही मला मात्र ही कार्डे परकी परकी वाटत राहतात. याचे महत्त्वाचे कारण हे की ते शब्द माझे नसतात. त्यामुळे त्यांतून व्यक्त होणारी भावना मला माझी वाटत नाही. मला माझ्या आईबद्दल, बाबांबद्दल, माझ्या ताईबद्दल जे वाटते, ते त्या शब्दांत नसतेच. माझ्या माणसांशी असलेले माझे संबंध मलाच माहीत आहेत. कोणत्या गोष्टी आमच्यामध्ये महत्त्वाच्या आहेत, हे मलाच माहीत आहे. मला माझ्या ताईने पहिल्यांदा सायकल शिकवली.
मी तिच्याकडून फक्त सायकल चालवायला नाही शिकलो. मला आत्मविश्वास मिळाला. रस्त्यावर मागून-पुढून जाणाऱ्या गाड्या, मोटरसायकली, सायकली, रस्त्यावरून वाकडेतिकडे चालणारे लोक, रस्त्यावरील खड्डे या सगळ्यांना चुकवून सायकल चालवताना मनात जे काही चालते, ते शब्दांत सांगता येणार नाही. ताईशी बोलताना, ताईबद्दल बोलताना, माझ्या दृष्टीने ही गोष्ट महत्त्वाची असते. ती छापील कार्डामध्ये मिळूच शकत नाही. ही छापील कार्डे मला माझी वाटतच नाहीत.
उतारा क्र. 3
1. पुढील उतारा वाचून दिलेल्या सूचनांनुसार कृती करा:
कृती 1 : (आकलन)
प्रश्न 1.
अर्थ लिहा:
तोंड उघडल्याबद्दल आणि योग्य वेळी ते बंद केल्याबद्दल धन्यवाद.
उत्तर:
अनेकांना आपली छबी दूरचित्रवाणीवर दिसते, यातच धन्यता वाटत असते. संबंधित क्षेत्रात या लोकांचे काही योगदान नसते किंवा त्या क्षेत्राचा काही अभ्यासही नसतो. त्यामुळे दूरचित्रवाणीवरील कार्यक्रमात या लोकांना काही मौलिक विचार मांडता येत नाहीत. ते तोंड मिटून गप्प बसतात. काहीजण अकारण बडबड करून प्रेक्षकांचा वेळ वाया घालवतात. या दोघांवरही टीका करण्यासाठी लेखिका ‘तोंड उघडल्याबद्दल व योग्य वेळी ते बंद केल्याबद्दल’ त्यांना धन्यवाद देतात.
प्रश्न 2.
का ते लिहा:
1. नटवणाऱ्यांचे व नटवल्यामुळे ते सुंदर दिसत होते, असे मानणाऱ्यांचे आभार.
2. ज्यांनी किमान तीस सेकंद आमचा चॅनेल पाहिला त्यांना कोटी कोटी प्रणाम.
उत्तर:
1. दूरचित्रवाणीवरील काही कार्यक्रमांत सूत्रसंचालकांची गरज असते. संपूर्ण कार्यक्रम प्रवाहीपणे सुरळीत पार पाडणे हे सूत्रसंचालकांचे काम असते. पण अनेक सूत्रसंचालकांना स्वत:च्या नटण्यात जास्त रस असतो. मेकअपमनही त्यांना नटवण्यात गढून जातो. इतर अनेक जण सूत्रसंचालकांच्या कामापेक्षा त्यांच्या सुंदर दिसण्याचेच कौतुक अधिक करतात. लोकांच्या या हास्यास्पद वृत्तीची खिल्ली उडवण्यासाठी लेखिकांनी सूत्रसंचालकांना नटवणाऱ्यांचे व नटल्यामुळे ते सुंदर दिसत होते असे मानणाऱ्यांचे आभार मानले आहेत.
2. दूरचित्रवाणीवरील बहुतांश कार्यक्रम निर्बुद्ध असतात. त्यांत मध्ये मध्ये जाहिरातींचा धुमाकूळ असतो. त्यामुळे प्रेक्षक कोणताही कार्यक्रम मनापासून सलग पाहत नाहीत. जाहिराती व प्रायोजक मिळवण्यासाठी आपली वाहिनी लोकप्रिय आहे, हे दाखवण्याची वाहिन्यावाल्यांची धडपड चालू असते. वाहिन्यावाल्यांचा हा केविलवाणेपणा दाखवून देण्यासाठी, प्रेक्षकांना कोटी कोटी प्रणाम केले जातात, असे लेखिका म्हणतात.
कृती 2 : (आकलन)
प्रश्न 1.
पुढील वाक्याच्या आधारे लेखिका कशावर टीका करतात, ते लिहा:
आजच्या दिवसभरात ज्यांनी ज्यांनी मुलाखती दिल्या आणि हुकमी ‘मागे वळून पाहिलं’ त्यांचे आम्ही ऋणी आहोत. त्यांच्या दुखऱ्या मानांचे शतशः आभार.
उत्तर:
साधारणपणे वेगवेगळ्या क्षेत्रांत महत्त्वपूर्ण कामगिरी करणाऱ्यांच्या मुलाखती प्रसारित करण्यामागे त्यांच्या अनुभवाचा फायदा इतरांना मिळावा, ही अपेक्षा असते. हे मुलाखतदाते विशिष्ट शब्दप्रयोग करतात. त्यांपैकी एक असा : ‘इतक्या वर्षांनी आता मागे वळून पाहताना.’ दूरचित्रवाणीवर येणाऱ्या बऱ्याच मुलाखतदात्यांकडे सांगण्यासारखे काहीही नसते. पण मुलाखतीची ऐट दाखवण्यासाठी ‘मागे वळून पाहताना’ यांसारखे शब्दप्रयोग ते हमखास करतात. त्यांची खिल्ली उडवण्यासाठी लेखिका वरील वाक्य लिहितात.
प्रश्न 2.
आकृती पूर्ण करा:
कृती 3 : (स्वमत/अभिव्यक्ती)
प्रश्न 1.
दूरचित्रवाणीच्या विविध वाहिन्यांवरील कार्यक्रमांविषयी तुमचे मत लिहा.
उत्तर:
दूरचित्रवाणीवरचे बहुतेक कार्यक्रम मनोरंजनाचे असतात. प्रायोजक व जाहिराती मिळवण्यासाठी प्रेक्षकसंख्या जास्त असावी लागते. म्हणून मग हे कार्यक्रम लोकप्रिय करण्याचा प्रयत्न होतो. त्यातून लोकानुनय केला जातो. साहजिकच पारंपरिक विचारांची चिकित्सा नसते. उलट त्यांचा प्रसारच केला जातो. तसेच, देवदेवतांच्या, बुवाबापूंच्या कार्यक्रमांची रेलचेल असते. चमत्कार दृश्यांची त्यात भर पडते. त्यामुळे अंधश्रद्धा बळकट होतात. वाहिनी लोकप्रिय करण्याच्या नादात अनिष्ट वृत्ती वाढीला लागत आहेत. हे सर्वच वाहिन्यांबाबत घडत आहे. हे भयंकर आहे. समाजाच्या सांस्कृतिक आरोग्याच्या दृष्टीने ही परिस्थिती धोक्याची आहे.
उतारा क्र. 4
1. पुढील उतारा वाचून दिलेल्या सूचनांनुसार कृती करा:
कृती 2 : (आकलन)
प्रश्न 1.
आकृती पूर्ण करा:
प्रश्न 2.
पुढील घटनांचे परिणाम लिहा:
घटना | परिणाम |
1. ऑपरेशनच्या गुंगीमधून नुकता नुकता बाहेर येणारा रुग्ण डॉक्टरांचा हात घट्ट धरतो. | |
2. खूप जवळच्या माणसाचे आभार मानायची वेळ येते, तेव्हा ‘यात नव्याने काय सांगायचं?’ असे मनात येतं. |
उत्तर:
घटना | परिणाम |
1. ऑपरेशनच्या गुंगीमधून नुकता नुकता बाहेर येणारा रुग्ण डॉक्टरांचा हात घट्ट धरतो. | स्पर्शातून कृतज्ञता व्यक्त होते. |
2. खूप जवळच्या माणसाचे आभार मानायची वेळ येते, तेव्हा ‘यात नव्याने काय सांगायचं?’ असे मनात येतं. | आभाराच्या शब्दांतली ताकद निघून जाते. |
कृती 3 : (स्वमत/अभिव्यक्ती)
प्रश्न 1.
या उताऱ्यात लेखिकांनी मांडलेल्या विचाराबाबत तुमचे मत लिहा.
उत्तर:
‘बैंक्यू/सॉरी’चा खूपच अतिरेक झाला आहे, यात शंकाच नाही. अनेकजण उठताबसता ‘बैंक्यू’ म्हणतात. लेखिकांच्या या मताशी मी पूर्ण सहमत आहे. तरीही मी थोडीशी जोड देऊ इच्छितो. बैंक्यूचा वापर केव्हा घडतो? जेव्हा व्यक्तींमधले संबंध औपचारिक असतात तेव्हा. औपचारिक संबंध नसतात, तेव्हा आईबाबा-मुले, मित्रमैत्रिणी यांच्यात उपचार नसतो. प्रेमाचा हक्क असतो. आम्हां मित्रांमध्ये असेच घडते. आम्ही प्रेमाने एकमेकांना काही देतो आणि हक्काने हवे ते मागून घेतो. अशा वेळी प्रेमाचा जोर जास्त असतो.
पण सार्वजनिक ठिकाणी मात्र उपचार पाळलेच पाहिजेत. बसमध्ये एखादयाच्या पायावर आपला पाय पडला, तर विनाविलंब ‘सॉरी’ म्हटलेच पाहिजे. आपण समोरच्या माणसाच्या वेदनेकडे सहानुभूतीने पाहतो, हे अशा वेळी सिद्ध होते. आपण बेदरकार नाही, हेही सिद्ध होते. लेखिका म्हणतात तसा अतिरेक करूच नये, हे खरे आहे. पण तारतम्याने या सॉरी/बैंक्यूचा वापर केला पाहिजे, असे मला वाटते.
उतारा क्र. 5
1. पुढील उतारा वाचून दिलेल्या सूचनांनुसार कृती करा:
कृती 1 : (आकलन)
प्रश्न 1.
चूक की बरोबर ते ओळखा:
1. अंतिम उत्पादन, कलाकृती उत्तम व्हायला हवी असेल, तर आर्थिक लाभ ज्याचा जास्त, त्याने जास्त निष्ठेने काम केले पाहिजे.
उत्तर:
1. चूक.
प्रश्न 2.
आकृती पूर्ण करा:
कृती 2 : (आकलन)
प्रश्न 1.
कोण ते लिहा:
उत्तर:
प्रश्न 2.
जोडीजोडीने व्यवहार करावे लागणाऱ्या तुम्हाला माहीत असलेल्या दोन जोड्या लिहा.
उत्तर:
1. शिक्षक – विदयार्थी
2. वक्ता – श्रोते.
कृती 3 : (स्वमत/अभिव्यक्ती)
प्रश्न 1.
‘प्रत्येकाने आपापली भूमिका चोख बजवावी लागते. तो अलिखित नियम असतो,’ या विधानावर तुमचे मत लिहा.
उत्तर:
जोडीजोडीने व्यवहार कराव्या लागणाऱ्या काहीजणांबद्दल लेखिकांचे हे मत आहे. जोडीतील दोघांपैकी एकाकडे व्यवहाराची सूत्रे असतात. अनेकदा ही सूत्रे ज्याच्याकडे अधिक घट्ट असतात, त्याच व्यक्तीला व्यवहाराचे फायदे अधिक असतात. हे सर्व खरे आहे. पण म्हणून जास्त फायदा असलेल्यानेच जास्त कष्ट घेऊन व जास्त निष्ठेने काम केले पाहिजे, असा नियम करता येणार नाही. असे केल्यास दोघांनाही तोटाच होईल. कोणी एकाने दुर्लक्ष केल्यास अंतिम फळ उत्तम असणार नाही. त्याचा तोटा दोघांनाही भोगावा लागेल.
नावाडी पैसे घेऊन लोकांना नदीपार करतो. नाव मध्यावर गेल्यावर दुर्दैवाने नावाड्याचा हात लचकला आणि त्याला होडी वल्हवता आली नाही तर? नावाड्याने पैसे घेतले आहेत. आम्ही त्याला मदत करणार नाही, अशी प्रवाशांनी भूमिका घेतली, तर प्रवाशांचा जीव धोक्यात येऊ शकतो. म्हणून दोघांनीही जास्तीत जास्त निष्ठेने काम केले पाहिजे; तरच अंतिम फळ उत्तम होईल. त्याचा दोघांनाही फायदा होईल.
उतारा क्र. 6
1. पुढील उतारा वाचून दिलेल्या सूचनांनुसार कृती करा:
कृती 1 : (आकलन)
प्रश्न 1.
काय घडते ते पाठाच्या आधारे लिहून वाक्य पूर्ण करा:
1. कामाच्या मोबदल्यात पैसे देत असल्यास …………………
उत्तर:
1. कामाच्या मोबदल्यात पैसे देत असल्यास लोक आभाराची काटकसर करतात.
प्रश्न 2.
पुढील सेवादात्यांचे दुर्गुण लिहा:
1. प्लंबर, इलेक्ट्रिशियन मंडळी.
2. इस्त्रीवाला.
उत्तर:
1. प्लंबर, इलेक्ट्रिशियन मंडळी सांगितलेल्या वेळेला घरी काम करायला येत नाहीत आणि जुने काम करताना नवीन काम निर्माण करून ठेवतात.
2. इस्त्रीवाला दिलेल्या तारखेला कपडे आणून देत नाही.
कृती 2 : (आकलन)
प्रश्न 1.
ठरलेल्या वेळी काम न करणाऱ्या तुम्हाला माहीत असलेल्या चार सेवादात्यांची नावे लिहा.
उत्तर:
वेळेवर काम न करणारे सेवादाते : गवंडी, सुतार, रंगारी, शिंपी.
प्रश्न 2.
लेखिकांनी सांगितलेली विविध सेवादात्यांची वृत्ती सांगा.
उत्तर:
विविध सेवादात्यांचा सर्वांत मोठा दुर्गुण म्हणजे ते कधीच ठरलेल्या वेळी येत नाहीत. दुसरे म्हणजे ते प्रामाणिकपणे काम करीत नाहीत. ते काम करून गेल्यावर काम चोख झाले असेल, अशी मनाला खात्री वाटत नाही. विविध सेवादात्यांची ही वृत्ती लेखिकांनी या उताऱ्यात अधोरेखित केली आहे.
कृती 3 : (स्वमत/अभिव्यक्ती)
प्रश्न 1.
या उताऱ्यात लेखिकांनी सांगितलेले सामाजिक व्यंग स्पष्ट करून सांगा.
उत्तर:
या उताऱ्यात काही सेवादात्यांच्या उणिवा लेखिकांनी सांगितल्या आहेत. ते ठरवलेल्या वेळी कामावर येत नाहीत. निष्ठापूर्वक काम करीत नाहीत. आपण आपले काम चोख करावे, अशी त्यांची इच्छाच नसते. त्यामुळे त्यांनी केलेले काम परिपूर्ण असेल, अशी खात्री बाळगता येत नाही. लेखिकांनी सांगितलेल्या या उणिवा आपल्या समाजाच्या प्रत्येक व्यक्तीत दिसून येतात. कोणत्याही पदावरील कोणाही व्यक्तीला उत्तम काम करण्याची इच्छाच नसते. विदयार्थी उत्तम काम करू इच्छित नाहीत. दुकानदार उत्तम वस्तू वाजवी भावात ग्राहकाला देण्याची इच्छा बाळगत नाही.
शासकीय कार्यालयातील कर्मचारी लोकांची कामे रेंगाळत ठेवण्यात धन्यता मानतात. अशी शेकडो उदाहरणे देता येतील. या वृत्तीमुळे समाजात पार पडणारे कोणतेही कार्य परिपूर्ण होत नाही. रस्ता बांधला की अल्पावधीतच खड्डे पडतात. घरे कोसळतात. या सर्व बाबींमुळे आपल्या समाजातील बांधवांचेच नुकसान होते. त्यांना उत्तम दर्जाच्या सेवा वा वस्तू मिळत नाहीत. साहजिकच त्यांना उत्तम दर्जाचे जीवन जगण्याची संधी मिळत नाही. आपली वृत्ती सुधारली तर देश सुधारेल, असे मला वाटते. कारण हे सर्व देशाच्या प्रगतीशी निगडित आहे.
उतारा क्र. 7
1. पुढील उतारा वाचून दिलेल्या सूचनांनुसार कृती करा :
कृती 1 : (आकलन)
प्रश्न 1.
पाठाच्या आधारे गाळलेल्या जागा भरून विधाने पूर्ण करा:
1. अपत्याची टॉन्सिलची शस्त्रक्रिया किरकोळ होती; पण आईच्या ———
2. ऑपरेशननंतर त्रासाचा लोप व्हावा, म्हणून
उत्तर:
1. अपत्याची टॉन्सिलची शस्त्रक्रिया किरकोळ होती; पण आईच्या दृष्टीने मुलाचं कोणतंच ऑपरेशन किरकोळ असूच शकत नाही..
2. ऑपरेशननंतर त्रासाचा लोप व्हावा, म्हणून पंधरा दिवस आइस्क्रीमचा उतारा होता.
प्रश्न 2.
काय केले ते लिहा:
1. डॉक्टरांचे आभार मानण्यासाठी ………………………
2. पाहुणचार करण्यासाठी आल्यागेलेल्या सर्वांना ………………
उत्तर:
1. डॉक्टरांचे आभार मानण्यासाठी लेखिकांनी त्यांना फोन केला.
2. पाहुणचार करण्यासाठी आल्यागेलेल्या सर्वांना आइस्क्रीम दिले जात होते.
कृती 2 : (आकलन)
प्रश्न 1.
पुढील घटनांचे परिणाम लिहा:
1. घटना : लेखिकांनी डॉक्टरांना फोन केला.
परिणाम : ……………………………
2. घटना : डॉक्टरांनी फोनबद्दल आपली नाराजी व्यक्त केली.
परिणाम : ……………………………..
उत्तर:
1. परिणाम: काहीतरी विपरीत घडले असावे, या कल्पनेने डॉक्टर हादरले.
2. परिणाम: लेखिकांना डॉक्टरांचा राग न येता त्यांची दया आली.
कृती 3 : (स्वमत/अभिव्यक्ती)
प्रश्न 1.
‘परि तू जागा चुकलासी’ या उक्तीबद्दल तुमचे मत लिहा.
उत्तर:
आभार व्यक्त करणे वा आदर दाखवणे यांसारख्या उपचारांचा अतिरेक होऊ लागला आहे. असे उपचार पाळणे हे सुसंस्कृतपणाचे लक्षण मानले जाऊ लागल्यामुळे विपरीत प्रसंग उद्भवू लागले आहेत. आभार कोणाचे मानावेत, कधी मानावेत व कसे मानावेत यांबाबत कोणता धरबंदच राहिलेला नाही. ही एक भ्रामक गरज निर्माण झालेली आहे.
व्यापाऱ्यांचे याकडे लक्ष न जाते, तर नवलच! यातून शुभेच्छांची कृत्रिम कार्डे निर्माण झाली आहेत. काहीही करून आभार मानायचेच, असा अट्टहास बाळगल्याने हास्यास्पद प्रसंग घडताना दिसतात. लग्न होत असताना अभिनंदन करायचे सोडून आभार मानण्याचा प्रसंग पाठात आलेलाच आहे. म्हणून आभार कोणाचे मानू नयेत, केव्हा मानू नयेत, तसेच, ते कसे मानू नयेत याचे भान बाळगणे गरजेचे बनले आहे. कारण ‘परी तू जागा चुकलासी’ असे सांगण्याचे प्रसंग वारंवार येऊ लागले आहेत.
भाषाभ्यास:
(अ) अव्याकरण घटकांवर आधारित कृती:
1. समास:
प्रश्न 1.
जोड्या लावा:
सामासिक शब्द | उत्तरे | विग्रह |
1. महात्मा | – महान असा आत्मा | वादळ, वारा वगैरे |
2. सप्तसिंधू | – सात समुद्रांचा समूह | दक्षिण आणि उत्तर |
3. दक्षिणोत्तर | – दक्षिण आणि उत्तर | महान असा आत्मा |
4. दहाबारा | – दहा किंवा बारा | सात समुद्रांचा समूह |
5. वादळवारा | – वादळ, वारा वगैरे | दहा किंवा बारा |
2. शब्दसिद्धी:
प्रश्न 1.
‘सु’ उपसर्ग असलेले चार शब्द लिहा.
उत्तर:
3. वाक्प्रचार:
प्रश्न 1.
पुढील वाक्प्रचारांचे अर्थ सांगून वाक्यांत उपयोग करा:
उत्तर:
(आ) भाषिक घटकांवर आधारित कृती:
1. शब्दसंपत्ती:
प्रश्न 1.
विरुद्धार्थी शब्द लिहा:
उत्तर:
प्रश्न 2.
वचन ओळखा:
उत्तर:
2. लेखननियम:
प्रश्न 1.
अचूक शब्द ओळखा:
उत्तर:
3. विरामचिन्हे:
प्रश्न 1.
पुढील वाक्यांत योग्य विरामचिन्हे घालून वाक्ये पुन्हा लिहा:
1. आमच्या पिढीवर गोऱ्यांचे शिष्टाचार या गोष्टीची अंमळ जास्तच मुद्रा उमटली
2. लेखक आणि प्रकाशक गायक वादक कलाकार रसिक दिग्दर्शक आणि नटमंडळी ही जोडीजोडीने काम करीत असतात
उत्तर:
1. आमच्या पिढीवर ‘गोऱ्यांचे शिष्टाचार’ या गोष्टीची अंमळ जास्तच मुद्रा उमटली.
2. लेखक आणि प्रकाशक, गायक-वादक, कलाकार-रसिक, दिग्दर्शक आणि नटमंडळी ही जोडीजोडीने काम करीत असतात.
4. पारिभाषिक शब्द:
प्रश्न 1.
पुढील इंग्रजी पारिभाषिक शब्दांना मराठी प्रतिशब्द दया:
1. Humanism
2. Honorable.
उत्तर:
1. मानवतावाद
2. माननीय.
प्रस्तावना:
मराठीतील एक लोकप्रिय व अग्रेसर विनोदी लेखिका. त्यांच्या लेखनाच्या केंद्रस्थानी मध्यमवर्गीय मराठी माणूस प्राधान्याने असतो. त्या मध्यमवर्गीय माणसाच्या जीवनातील विसंगती खेळकरपणे चित्रित करतात. त्यांची लेखनशैली प्रसन्न आहे. त्यांचा भर मुख्यतः वक्रोक्तीवर असतो. त्यांचा विनोद कधीही बोचरा, जखम करणारा नसतो. त्या हसतखेळत विसंगती दाखवून देतात. सामाजिक व्यंगांकडेही त्यांचे खास लक्ष असते. त्यांचे लेखन हे नेहमीच आधुनिकतेचा पुरस्कार करणारे असते. पारंपरिक मागासलेल्या विचारांना त्या सहजगत्या हास्यविषय करतात. अतिरेकी आधुनिक विचारांवरही त्या हसतखेळत टीका करतात. त्यांचे लेखन सदैव वाचनीय ठरले आहे.
मंगला गोडबोले यांनी गंभीर स्वरूपाचे कथालेखन व कादंबरीलेखनही केले आहे. आपण आधुनिक बनत जाण्याच्या प्रयत्नात पाश्चिमात्य लोकांचे आंधळेपणाने अनुकरण करतो आणि हास्यास्पद बनत जातो, ही वस्तुस्थिती प्रस्तुत पाठात लेखिकांनी अत्यंत खेळकरपणे दाखवून दिली आहे. आपण इंग्रजांच्या अनुकरणातून ‘बँक्यू’, ‘प्लीज’ हे शब्द उचलले आहेत आणि त्यांचा अतिरेकी वापर करतो. ‘बँक यू’, ‘बँक्यू’ (I thank you) हे पूर्ण वाक्य आहे. हे लक्षात न घेता ‘बैंक्यू = आभार’ असा अर्थ घेऊन ‘तू कसली ग माझी बँक्यू?’ ‘मीच तुझी बँक्यू’ असले हास्यास्पद शब्दप्रयोग आपण करतो. आपल्या समाजातील या विसंगतीचे मजेदार दर्शन या पाठात लेखिका घडवतात आणि आपल्याला अंतर्मुख करतात.
शब्दार्थ:
टिपा:
1. निष्ठा – (नि + स्था) निग्रहाने एका जागी स्थिर राहणे. काही माणसे आयुष्यभर एखादा विचार, मूल्य उराशी बाळगतात; त्यापासून ढळत नाहीत. यावरून त्या विचाराला, मूल्याला, दृष्टिकोनाला त्या माणसांची निष्ठा म्हणतात.
2. मॅनरलेसपणा – मॅनर (manner = शिष्टाचार). मॅनरलेस म्हणजे शिष्टाचार न पाळणारा, असंस्कृत, उद्धट. ‘mannerless पणा’ यात इंग्रजी शब्दाला मराठी प्रत्यय जोडलेला आहे. येथे इंग्रजी शब्द वापरण्याची केवळ हौस दिसते. अशा सवयीमुळे धेडगुजरी शब्द तयार होतात.
वाक्प्रचार व त्यांचे अर्थ: