Balbharti Maharashtra State Board Class 9 Marathi Solutions Kumarbharti Chapter 19 प्रीतम Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.
Class 9 Marathi Aksharbharati Chapter 19 प्रीतम Question Answer Maharashtra Board
प्रीतम Std 9 Marathi Chapter 19 Questions and Answers
1. तुलना करा:
   प्रश्न 1.
   
   तुलना करा:
   
    
   
   उत्तर:
  
| शालेय वर्गातील प्रीतम | सेकंड लेफ्टनंट प्रीतम | 
| 1. किरकोळ, किडकिडीत अंगकाठी असलेला, खांदे पाडून उभा असलेला, रया गेलेला युनिफॉर्म घातलेला प्रीतम. | 1. खूप देखणा, भरदार, स्वतः बाई त्याच्या खांदयाच्या खाली येत होत्या. | 
| 2. एकलकोंडा, घुमा, कुणाशीही न मिसळणारा, कोणत्याही उपक्रमात भाग न घेणारा प्रीतम. | 2. आत्मविश्वासाने वावरणारा; स्वत:ला काय वाटते, याचे स्पष्ट भान असणारा; एनडीएसारख्या परीक्षेत यशस्वी ठरलेला प्रीतम. | 
    
  
2. कारणे लिहा:
   प्रश्न 1.
   
   कारणे लिहा:
   
   (अ) प्रीतमला मराठी नीट येत नसे.
   
   (आ) पोरकेपणाचे समान धागे लेखिकांना प्रीतमकडे खेचत होते.
   
   उत्तर:
   
   (अ) जन्मल्यापासून प्रीतम महाराष्ट्राबाहेर होता. त्या वर्षी तो प्रथमच महाराष्ट्रात आला होता.
   
   (आ) प्रीतमची आई त्याच्या लहानपणीच वारली होती आणि लेखिकांचे वडीलही वारले होते. त्यामुळे प्रीतमचा पोरकेपणा त्यांना समजत होता.
  
3. प्रतिक्रिया लिहा:
   प्रश्न 1.
   
   प्रतिक्रिया लिहा:
   
   (अ) प्रीतमच्या निबंधातील चुका बघून त्याच्या वर्गशिक्षिकेची प्रतिक्रिया.
   
   (आ) अबोल प्रीतम भडाभडा बोलल्यानंतर वर्गशिक्षिकेची प्रतिक्रिया –
   
   उत्तर:
   
   (अ) प्रीतमच्या निबंधातील चुका बघितल्यावर बाईंनी त्याला थांबवून घेतले आणि आईवडिलांना घेऊन यायला सांगितले.
   
   (आ) बाईंनी प्रीतमला जवळ घेतले. त्याच्या चेहेऱ्यावरून हात फिरवला.
  
4. लेखिकेच्या कृती व तिच्या कृतीतून अभिव्यक्त होणारे गुण यांची जुळणी करा:
   प्रश्न 1.
   
   लेखिकेच्या कृती व तिच्या कृतीतून अभिव्यक्त होणारे गुण यांची जुळणी करा:
  
| उदाहरण | गुण | 
| 1. प्रीतमला बाईंनी जवळ घेतले | 1. कार्यनिष्ठा | 
| 2. दुपारच्या सुट्टीत बाईंनी प्रीतमला मराठी शिकवले | 2. संवेदनशीलता | 
| 3. प्रीतमने दिलेल्या बांगड्या बाईंनी हातांत चढवल्या. | 3. निरीक्षण | 
| 4. एका दृष्टिक्षेपात बाईंनी अंदाज केला. | 4. ममत्व | 
    
  
5. प्रीतमला स्वतःबद्दल जाणीव असलेली पाठातील वाक्ये शोधा व लिहा.
   प्रश्न 1.
   
   प्रीतमला स्वतःबद्दल जाणीव असलेली पाठातील वाक्ये शोधा व लिहा.
   
   उत्तर:
   
   पाठातील वाक्ये अशी:
   
   1. प्रीतम मान खाली घालून हळूच माझ्याकडे बघत होता.
   
   2. मला मराठी नीट येत नसल्याने बाकी विषयही कळत नाहीत.
   
   3. माझ्याबद्दल तक्रार गेली तर मामी खूप टाकून बोलते. मग मामा मला मारतात. मी नापास झालो, तर बाबांना सांगून ते मला बोर्डिंगात ठेवणार. तिकडे मुलांना खूप त्रास देतात. बाबांनी वारंवार विनंती केल्यामुळे मामांनी मला ठेवून घेतले आहे.
   
   4. तो हळूच जवळ येऊन म्हणाला, “बाई, माझ्याकडे पैसे नव्हते, म्हणून माझ्या आईच्या वापरलेल्या बांगड्या अन् अत्तर मी तुम्हांला दिले. तिची तेवढीच आठवण माझ्यापाशी आहे. खास माझ्या स्वत:च्या वस्तू आहेत त्या.”
   
   5. “या बाई म्हणजे माझ्या एकुलत्या एक कुटुंबीय आहेत. त्या भेटल्या नसत्या तर कॅप्टन लुथरा नावाचा आज कुणी अस्तित्वात नसता.”
  
6. खालील वाक्प्रचारांचा योग्य अर्थ लिहा:
   प्रश्न (अ)
   
   रया जाणे.
   
   1. शोभा जाणे.
   
   2. शोभा करणे.
   
   3. शोभा देणे.
   
   उत्तर:
   
   2. शोभा जाणे
  
   प्रश्न (आ)
   
   संजीवनी मिळणे.
   
   1. जीव घेणे.
   
   2. जीवदान देणे.
   
   3. जीव देणे.
   
   उत्तर:
   
   2. जीवदान देणे.
  
    
  
7. कंसांत दिलेल्या सूचनांप्रमाणे वाक्यांचे रूपांतर करा:
   प्रश्न 1.
   
   कंसांत दिलेल्या सूचनांप्रमाणे वाक्यांचे रूपांतर करा:
  
- मुलांनी आईवडिलांची आज्ञा पाळावी. (आज्ञार्थी करा.)
- आईने माझ्याकडे निराशेने पाहिले. (नकारार्थी करा.)
- बापरे ! रस्त्यावर केवढी ही गर्दी ! (विधानार्थी करा.)
- नेहमी खरे बोलावे. (प्रश्नार्थी करा.)
उत्तर:
- मुलांनो, आईवडिलांची आज्ञा पाळा.
- आईने माझ्याकडे आशेने पाहिले नाही.
- रस्त्यावर खूपच गर्दी आहे.
- नेहमी खरे बोलावे का?
8. स्वमत.
   प्रश्न (अ)
   
   प्रीतम आणि त्याच्या बाई यांच्यातील भावनिक नातेसंबंधांविषयी तुमचे मत सविस्तर लिहा.
   
   उत्तर:
   
   प्रीतमच्या बाईंना प्रीतमची नकारात्मक बाजूच प्रथम जाणवते. त्यामुळे त्यांच्या मनात त्याची नकारात्मक प्रतिमा निर्माण होते. परंतु त्याची खरी पार्श्वभूमी कळल्यावर त्यांच्या मनात कणव निर्माण होते. त्या त्याच्याशी सहृदयतेने वागू लागतात. त्याला भावनिक आधार देतात. सगळ्या मुलांनी वर्गणी काढून बाईंना भेटवस्तू दिली. प्रीतम त्याच्याजवळच्या आईच्या जुन्या बांगड्या बाईंना भेट देतो. आईविषयीच्या सर्व भावना त्या बांगड्यांमध्ये त्याने साठवलेल्या होत्या.
  
त्याच्या दृष्टीने ती अमूल्य वस्तू होती. ती तो बाईंना भेट म्हणून देतो. त्याच्या मनातला हा उच्च, उदात्त भाव बाईंच्या अंत:करणाचा ठाव घेतो. त्या त्याच्या भावनेचा गौरव करतात. अशा प्रकारे बाई त्याला प्रसंगाप्रसंगांतून आत्मविश्वास देतात. बाईंकडून भावनिक पाठबळ मिळते. त्याच्या जोरावर तो सेकंड लेफ्टनंट बनतो. आदराचे व प्रतिष्ठेचे स्थान प्राप्त करतो. या कारणाने त्याला बाई म्हणजे आपली आईच, असे मनोमन वाटते. बाईंना त्याच्यातील सद्गुणी, होतकरू मुलगा दिसतो. त्या त्याला तसे घडवत नेतात. बाई आणि प्रीतम दोघेही एकमेकांना तृप्तीचा, परिपूर्तीचा आनंद देतात.
    
  
   प्रश्न (आ)
   
   तुमच्या जीवनातील शिक्षकाचे स्थान स्पष्ट करा.
   
   उत्तर:
   
   आतापर्यंतच्या शिक्षकांपैकी दोन शिक्षक माझ्या लक्षात राहिले आहेत. त्या दोनपैकी एक होते माझे मराठीचे शिक्षक शार्दुल सर. ते नेहमी सांगत — वाक्यातले सर्व शब्द एकमेकांचे नातेवाईक असतात. काही दूरचे, काही जवळचे. त्यांच्या नात्यांप्रमाणे त्यांचा अर्थ ठरतो. ही नाती लक्षात घेत घेत वाचन करायचे असते, हेही त्यांनी सोदाहरण समजावून सांगितले. आता वाचन करताना मला कधीही अडखळायला होत नाही.
  
पाचवीत भेटले इंग्रजीचे श्रीरंग सर. त्यांनी शब्दांचे स्पेलिंग लक्षात ठेवण्याचे गुपितच सांगितले. त्यानुसार उच्चार कसे होतात, हेही समजावून सांगितले. इंग्रजी शब्द, इंग्रजी वाक्य उच्चारण्याची गोडी इतकी वाढू लागली की मला हळूहळू इंग्रजी बोलता येऊ लागले आहे. या शिक्षकांमुळे माझा अभ्यास चांगला होऊ लागला. माझा आत्मविश्वास वाढला. माझे आईबाबाही खूश आहेत. हे सर्व माझ्या या शिक्षकांमुळे घडले आहे.
उपक्रम:
   प्रश्न 1.
   
   ‘प्रीतम’ या कथेचे नाट्यरूपांतर करा. वर्गात सादरीकरण करा.
  
   प्रश्न 2.
   
   कथेची मध्यवर्ती कल्पना तुमच्या शब्दांत लिहा.
  
Marathi Kumarbharati Textbook Std 9 Answers Chapter 19 प्रीतम Additional Important Questions and Answers
उतारा क्र. 1
1. पुढील उतारा वाचून दिलेल्या सूचनांनुसार कृती करा:
कृती 1 : (आकलन)
   प्रश्न 1.
   
   कारणे लिहा:
   
   1. बाईंना प्रीतम लुथरा हे नाव वेगळे वाटले.
   
   उत्तर:
   
   1. सर्व मराठी मुलांमध्ये प्रीतम लुथरा हे अमराठी नाव असल्याने बाईंना ते वेगळे वाटले.
  
    
  
कृती 2 : (आकलन)
   प्रश्न 1.
   
   माहिती लिहा:
   
   1. बाईंचे प्रीतमविषयी झालेले मत.
   
   2. लहानपणापासूनच प्रीतमला आईवडिलांचे छत्र न लाभण्याचे कारण.
   
   उत्तर:
   
   1. प्रीतम दिवसेंदिवस आळशी व बेजबाबदार होत चालला होता.
   
   2. लहानपणी म्हणजे प्रीतम साधारणपणे तीन वर्षांचा असताना त्याची आई वारली होती. वडील सैन्यात जवान असल्याने ते नेहमी सरहद्दीवर असत. तो सतत आईवडिलांपासून दूर राहत होता.
  
   प्रश्न 2.
   
   लेखिकेच्या कृती व तिच्या कृतीतून अभिव्यक्त होणारे गुण यांची जुळणी करा:
  
| उदाहरण | गुण | 
| तुझा बेजबाबदारपणा कळायलाच हवा. | सौजन्यशीलता निरीक्षणशक्ती वक्तशीरपणा | 
   उत्तर:
   
   1. कर्तव्यनिष्ठा.
  
   प्रश्न 3.
   
   कोष्टक पूर्ण करा:
  
| प्रीतमचे दर्शनी रूप | प्रीतमच्या वृत्ती | 
उत्तर:
| प्रीतमचे दर्शनी रूप | प्रीतमच्या वृत्ती | 
| किरकोळ मुलगा, किडकिडीत अंगकाठी, रया गेलेला युनिफॉर्म, खांदे पाडून मान खाली घालून उभा, चेहऱ्यावर दीनवाणे भाव. | एकलकोंडा, घुमा, अबोल, कुणाशीही न मिसळणारा, कोणत्याही उपक्रमात भाग न घेणारा, रिकाम्या आकाशाच्या तुकड्याकडे टक लावून बघत राहणारा. | 
    
  
कृती 3 : (स्वमत/अभिव्यक्ती)
   प्रश्न 1.
   
   ‘माणसाचे व्यक्तिमत्त्व त्याच्या भोवतालावर अवलंबून असते,’ हे विधान प्रीतम लुथरा यांच्या आधारे स्पष्ट करा.
   
   उत्तर:
   
   प्रीतम लुथरा हा सात वर्षांचा मुलगा. चार वर्षांपूर्वी त्याची आई वारली होती. म्हणजे त्या वेळी तो केवळ तीन वर्षांचा होता. आईचे प्रेम आणि तिचा आधार त्याला लाभलाच नव्हता. त्यात भर म्हणजे त्याचे वडील सैन्यात होते. ते नेहमी सरहद्दीवर असत. त्यांचाही त्याला सहवास लाभलेला नाही. आईवडिलांच्या सुरक्षित छत्रछायेत त्याला वावरायलाच मिळालेले नाही. कधी बंगाल, कधी पंजाब अशा भिन्न वातावरणात राहावे लागले. दुसरीत असताना तो महाराष्ट्रात आला होता.
  
अशा परिस्थितीमुळे तो सतत बुजरा राहिला. तो कोणात मिसळत नसे. कोणत्याही उपक्रमात भाग घेत नसे. वर्गात शिकताना खूपदा खिडकीबाहेर रिकाम्या आकाशाच्या तुकड्याकडे एकटक पाहत राही. तो एकलकोंडा, घुमा, अबोल बनला होता. मुक्तपणे खेळणारा-बागडणारा बालक न राहता, तो चारही बाजूंनी दबलेला, मनातून खचलेला बालक बनला होता. हे केवळ त्याच्या बाह्य परिस्थितीमुळे घडले होते. याचा अर्थ, माणसाच्या भोवतालची परिस्थिती माणसाला घडवते.
उतारा क्र. 2
1. पुढील उतारा वाचून दिलेल्या सूचनांनुसार कृती करा :
कृती 1 : (आकलन)
   प्रश्न 1.
   
   प्रतिक्रिया लिहा:
   
   प्रीतमला कुणी नातेवाईक नाहीत, हे कळल्यावर बाईंची प्रतिक्रिया –
   
   उत्तर:
   
   बाईंचा आवाज एकदम खाली आला.
  
    
  
   प्रश्न 2.
   
   लेखिकांची कृती आणि त्यांच्या कृतीतून अभिव्यक्त होणारे गुण यांची जुळणी करा:
  
| कृती | गुण | 
| 1. बाईंचा आवाज एकदम खाली आला. | कनवाळूपणा | 
| 2. बाईंनी प्रीतमला पालकांना आणायला सांगितले. | ममत्व | 
| 3. बाईंना प्रीतमचा देह सुकल्यासारखा जाणवला. | चुकीची जाणीव | 
उत्तर:
| कृती | गुण | 
| 1. बाईंचा आवाज एकदम खाली आला. | चुकीची जाणीव | 
| 2. बाईंनी प्रीतमला पालकांना आणायला सांगितले. | कर्तव्यनिष्ठा | 
| 3. बाईंना प्रीतमचा देह सुकल्यासारखा जाणवला. | कनवाळूपणा | 
कृती 2 : (आकलन)
   प्रश्न 1.
   
   का ते लिहा:
   
   1. प्रीतमला मराठीखेरीज अन्य विषयसुद्धा येत नसत.
   
   2. मामांनी प्रीतमला स्वत:कडे ठेवून घेतले.
   
   उत्तर:
   
   1. सर्व विषय मराठीतून शिकवले जात. प्रीतमला मराठी नीट येत नसे. त्यामुळे अन्य विषयसुद्धा येत नसत.
   
   2. प्रीतमच्या बाबांनी वारंवार विनंती केल्यामुळे मामांनी प्रीतमला स्वत:कडे ठेवून घेतले.
  
   प्रश्न 2.
   
   कोण ते लिहा:
  
- प्रीतमला टाकून बोलणाऱ्या
- प्रीतमला मार देणारे
- प्रीतमला घरी ठेवून घ्यावे, अशी मामांना विनंती करणारे
- प्रीतमला मधल्या सुट्टीत मराठी शिकायला बोलावणाऱ्या
उत्तर:
- प्रीतमला टाकून बोलणाऱ्या – मामी
- प्रीतमला मार देणारे – मामा
- प्रीतमला घरी ठेवून घ्यावे, अशी मामांना विनंती करणारे – बाबा
- प्रीतमला मधल्या सुट्टीत मराठी शिकायला बोलावणाऱ्या – बाई
    
  
कृती 3 : (स्वमत/अभिव्यक्ती)
   प्रश्न 1.
   
   बाईंनी प्रीतमला मराठी शिकायला बोलावले, याबद्दल तुमचे मत लिहा.
   
   उत्तर:
   
   प्रीतमचे बाबा हे त्याचे एकुलते एक नातेवाईक. पण ते सैन्यात असल्यामुळे नेहमी देशाच्या सीमेवर असतात. मामा-मामी त्याला प्रेमाने वागवत नाहीत. परक्या भाषिकांमध्ये, परक्या वातावरणात तो राहतो. त्याला कोणाचाच आधार नाही. सगळीकडून तो दूर लोटला गेला होता. त्याला मायेची गरज होती. मायेला पारखा झाल्यामुळे त्याला कशातच गोडी वाटत नव्हती. त्यामुळे शिकण्यातही रस नव्हता. बाईंनी त्याला माया दिली. मराठी शिकवले. त्याला इतर विषयही कळू लागले. एकंदरीत कोणालाही प्रेमाने वागवल्यास तो आनंदाने जीवन जगतो. जगण्याची त्याची ताकद वाढते. म्हणून बाईंनी प्रीतमला मराठी शिकायला बोलावून त्याच्यात उमेद निर्माण केली, असे मला वाटते.
  
उतारा क्र. 3
1. पुढील उतारा वाचून दिलेल्या सूचनांनुसार कृती करा:
कृती 1 : (आकलन)
   प्रश्न 1.
   
   कारणे लिहा:
   
   1. प्रीतमला इतर विषय समजू लागले.
   
   2. आपुलकी वाटत नसतानाही मामा-मामी प्रीतमला खाऊ घालत.
   
   उत्तर:
   
   1. सर्व विषय मराठीतून शिकवले जात. त्याला मराठी येऊ लागले, तेव्हापासून त्याला इतर विषय समजू लागले.
   
   2. प्रीतमचे बाबा पैसे पाठवत, म्हणून मामा-मामी त्याला खायला घालत.
  
   प्रश्न 2.
   
   विविध व्यक्तींच्या कृती व त्यांतून अभिव्यक्त होणारे गुण यांची जुळणी करा:
  
| कृती | गुण | 
| 1. प्रीतमने बाईंना भेटवस्तू दिली. | व्यवहारी वृत्ती | 
| 2. प्रीतमचे बाबा पैसे पाठवत, म्हणून मामा-मामी त्याला खायला घालत. | आपुलकी | 
| 3. शाळेतल्या मुलांनी बाईंच्या लग्नाचा आनंद व्यक्त करण्यासाठी छोटासा समारंभ केला. | कार्यनिष्ठा | 
उत्तर:
| कृती | गुण | 
| 1. प्रीतमने बाईंना भेटवस्तू दिली. | आपुलकी | 
| 2. प्रीतमचे बाबा पैसे पाठवत, म्हणून मामा-मामी त्याला खायला घालत. | व्यवहारी वृत्ती | 
| 3. शाळेतल्या मुलांनी बाईंच्या लग्नाचा आनंद व्यक्त करण्यासाठी छोटासा समारंभ केला. | कृतज्ञता | 
    
  
कृती 2 : (आकलन)
   प्रश्न 1.
   
   पुढील घटनांचे परिणाम लिहा:
  
| घटना | परिणाम | 
| 1. बाई प्रीतमशी चार शब्द प्रेमाने बोलल्या. | |
| 2. बाईंनी प्रीतमला वाढदिवशी भेट दिली. | |
| 3. प्रीतमने बाईंना दिलेल्या बांगड्या पाहून सगळेजण हसले. | |
| 4. बाई प्रीतमला मधल्या सुट्टीत शिकवू लागल्या. | 
उत्तर:
| घटना | परिणाम | 
| 1. बाई प्रीतमशी चार शब्द प्रेमाने बोलल्या. | प्रीतमला संजीवनी मिळाली. त्याची प्रकृती सुधारली. | 
| 2. बाईंनी प्रीतमला वाढदिवशी भेट दिली. | प्रीतमला खूप आनंद झाला. | 
| 3. प्रीतमने बाईंना दिलेल्या बांगड्या पाहून सगळेजण हसले. | प्रीतम ओशाळला. | 
| 4. बाई प्रीतमला मधल्या सुट्टीत शिकवू लागल्या. | प्रीतम मनापासून शिकू लागला. | 
   प्रश्न 2.
   
   फरक लिहा:
  
| मामा-मामी | बाई | 
| 1. ………………………………………….. | ………………………………………….. | 
| 2. ………………………………………….. | ………………………………………….. | 
| 3. ………………………………………….. | …………………………………………… | 
उत्तर:
| मामा-मामी | बाई | 
| 1. प्रीतमबद्दल आपुलकी नव्हती. | प्रीतमबद्दल खूप आपुलकी वाटे. | 
| 2. कधीही प्रेमाचा शब्द व स्पर्श नव्हता. | प्रीतमशी चार शब्द प्रेमाने बोलत. आईच्या ममतेने कुरवाळत. | 
| 3. मामा-मामींकडे परकेपणा वाटे. | बाईंकडे आईची माया मिळे. | 
    
  
कृती 3 : (स्वमत/अभिव्यक्ती)
   प्रश्न 1.
   
   प्रीतमच्या वर्तनातील बदल सांगून त्याबद्दलचे तुमचे मत लिहा.
   
   उत्तर:
   
   मधल्या सुट्टीत बाई शिकवू लागल्यापासून प्रीतम मन लावून शिकू लागला. त्याचे मराठीचे कौशल्य वाढले. त्यामुळे त्याला इतर विषयही समजू लागले. बाईंच्या प्रेमळ वागण्याने त्याला जणू संजीवनी मिळाली. त्याची प्रकृती सुधारली. तो आनंदाने वावरू लागला.
  
बाईंच्या लग्नानिमित्त शाळेतल्या मुलांनी एक छोटासा समारंभ केला. बाईंना एक छोटीशी भेटही दिली. त्यासाठी मुलांनी वर्गणीही काढली होती. त्यात प्रीतम सहभागी होऊ शकला नाही. मात्र, प्रत्यक्ष समारंभात प्रीतम आत्मविश्वासाने बाईंजवळ गेला. त्याने स्वत:च्या आईच्या जुन्या बांगड्या बाईंना भेट म्हणून दिल्या. या कृतीमागे त्याच्या मनात उदात्त भावना आहेत. तो आता दबलेला, खचलेला मुलगा राहिलेला नाही. तो आता समंजस, शहाणा, जाणता मुलगा बनला आहे. प्रीतममध्ये झालेला हा बदल बाईंच्या मायेमुळे झाला आहे. मुलांना धाकाने, दहशतीने न वागवता प्रेमाने वागवले, तर मुलांमध्ये चांगला बदल होतो, हे सर्वांनी लक्षात घ्यायला हवे.
उतारा क्र. 4
1. पुढील उतारा वाचून दिलेल्या सूचनांनुसार कृती करा:
कृती 1 : (आकलन)
   प्रश्न 1.
   
   पुढे दिलेली विधाने आणि त्यांतून अभिव्यक्त होणारे गुण यांच्या जोड्या लावा:
  
| विधाने | गुण | 
| 1. माझ्या बोलण्यावर त्यांना ‘हो’ म्हणावेच लागले. | दिलासा | 
| 2. दुसरे कुणी हसले तरी तू वाईट वाटून घेऊ नकोस. | सौजन्यशीलता | 
| 3. पुढे तो चांगल्या रितीने मॅट्रिक झाला. | संवेदनशीलता | 
उत्तर:
| विधाने | गुण | 
| 1. माझ्या बोलण्यावर त्यांना ‘हो’ म्हणावेच लागले. | सौजन्यशीलता | 
| 2. दुसरे कुणी हसले तरी तू वाईट वाटून घेऊ नकोस. | दिलासा | 
| 3. पुढे तो चांगल्या रितीने मॅट्रिक झाला. | कर्तव्यदक्षता | 
   प्रश्न 2.
   
   पुढे दिलेल्या घटनेचा परिणाम लिहा:
  
| घटना | परिणाम | 
| 1. त्या जुन्या बांगड्या पाहून सगळेजण हसले. | |
| 2. प्रीतमला जवळ घेऊन बाईंनी त्याच्या केसांतून हात फिरवला आणि त्याची समजूत काढली. | 
उत्तर:
| घटना | परिणाम | 
| 1. त्या जुन्या बांगड्या पाहून सगळेजण हसले. | प्रीतम ओशाळवाणा झाला. | 
| 2. प्रीतमला जवळ घेऊन बाईंनी त्याच्या केसांतून हात फिरवला आणि त्याची समजूत काढली. | प्रीतम व बाई यांच्यातील भावनेचा धागा अधिक चिवट होत गेला. | 
    
  
कृती 2 : (आकलन)
   प्रश्न 1.
   
   का ते सांगा:
   
   1. प्रीतम ओशाळवाणा झाला.
   
   2. प्रीतमने आईच्या वापरलेल्या बांगड्या बाईंना भेट दिल्या.
   
   उत्तर:
   
   1. प्रीतम ओशाळवाणा झाला, कारण जुन्या बांगड्या बघून सगळेजण हसू लागले.
   
   2. प्रीतमने आईच्या वापरलेल्या जुन्या बांगड्या बाईंना भेट दिल्या, कारण त्याच्याकडे वर्गणी देण्यासाठी पैसे नव्हते.
  
   प्रश्न 2.
   
   कोण ते लिहा:
   
   1. बाईंना दरवर्षी नव्या वर्षाच्या शुभेच्छा देणारा – ……………………..
   
   2. प्रीतमला आईसारख्या वाटणाऱ्या – ……………………….
   
   उत्तर:
   
   1. प्रीतम
   
   2. बाई.
  
कृती 3 : (स्वमत/अभिव्यक्ती)
   प्रश्न 1.
   
   ‘ते धागे फुलत आमच्यामध्ये नाते विणत राहिले,’ हे विधान स्पष्ट करा.
   
   उत्तर:
   
   प्रीतमकडे पैसे नव्हते. पण बाईंविषयीची आपुलकी, कृतज्ञता व्यक्त करण्याची त्याची इच्छा तीव्र होती. म्हणून त्याने त्याच्याजवळची एकुलती एक खास वस्तू बाईंना भेट म्हणून दिली. बाईंनी तिचा प्रेमाने स्वीकार केला. दोघांच्याही मनातील भावना एकमेकांपर्यंत पोहोचल्या. असे प्रत्येक वेळेला होत गेले. प्रीतम चांगल्या रितीने मॅट्रिक झाला. त्याने एन. डी. ए. मध्ये प्रवेश घेतला. त्याची ही प्रगती बाईंना कळत होती आणि त्यांना आनंद होत होता. तो दरवर्षी शुभेच्छापत्र न चुकता पाठवायचा. त्याच्या भावना त्यांना कळत होत्या. अशा प्रकारे दोघांमधील आपुलकीची भावना घट्ट होत होती, वाढत होती. हा संपूर्ण भाव वर दिलेल्या विधानातून व्यक्त होतो.
  
उतारा क्र. 5
1. पुढील उतारा वाचून दिलेल्या सूचनांनुसार कृती करा :
कृती 1 : (आकलन)
   प्रश्न 1.
   
   कोण ते लिहा:
   
   1. ट्रेनिंग संपवून सेकंड लेफ्टनंट झाला.
   
   2. प्रीतमच्या छातीवर बिल्ला लावला जातो, तेव्हा जोराने टाळ्या वाजवतात.
   
   उत्तर:
   
   1. प्रीतम लुथरा.
   
   2. बाई.
  
    
  
   प्रश्न 2.
   
   कोणाला ते लिहा:
   
   1. पासिंग आऊट परेडच्या वेळी विशेष जागी बसवतात.
   
   2. प्रीतमने पुण्याला येण्याचे विशेष निमंत्रण दिले होते.
   
   उत्तर:
   
   1. यशस्वी कॅडेटच्या आईवडिलांना.
   
   2. बाईंना.
  
   प्रश्न 3.
   
   आकृती पूर्ण करा:
   
    
   
   उत्तर:
   
    
  
कृती 2 : (आकलन)
   प्रश्न 1.
   
   आकृती पूर्ण करा:
   
    
   
   उत्तर:
   
    
  
    
  
   प्रश्न 2.
   
   पुढील प्रसंगांतील भाव लिहा:
  
| प्रसंग | भाव | 
| 1. प्रीतमच्या छातीवर बिल्ला लावला, तेव्हा बाईंनी टाळ्या वाजवल्या. | |
| 2. प्रीतम म्हणाला, “गेल्या जन्मी मी नक्कीच तुमचा मुलगा होतो.” | 
उत्तर:
| प्रसंग | भाव | 
| 1. प्रीतमच्या छातीवर बिल्ला लावला, तेव्हा बाईंनी टाळ्या वाजवल्या. | उत्कट आनंद | 
| 2. प्रीतम म्हणाला, “गेल्या जन्मी मी नक्कीच तुमचा मुलगा होतो.” | आई लाभल्याचा आनंद | 
   प्रश्न 3.
   
   का ते सांगा:
  
- प्रीतमच्या सासुरवाडीच्या लोकांनी आईसाठी दिलेली साडी त्याने बाईंना दिली.
- प्रीतम म्हणाला, “या बाई माझ्या एकुलत्या एक कुटुंबीय.”
- प्रीतम म्हणाला, “केव्हाही मुलगा म्हणून हाक मारा, धावत येईन.”
उत्तर:
- प्रीतम बाईंना आईच मानत होता.
- प्रीतमचे एकही नातेवाईक नव्हते, पण बाई परक्या असूनही त्यांनी आईची माया दिली होती.
- प्रीतमला मुलगा मानून त्यांनी त्याला भावनिक आधार दिला होता.
    
  
कृती 3 : (स्वमत/अभिव्यक्ती)
   प्रश्न 1.
   
   या उताऱ्यातून जाणवणारा, तुमच्या मते, महत्त्वाचा असलेला भाव स्पष्ट करा.
   
   उत्तर:
   
   स्टेशनवर बाईंना प्रीतमचे देखणे भरदार रूप जाणवते. आपण त्याच्या खांदयाखाली आहोत, हेही त्यांना जाणवते. कोणत्याही आईला आपला मुलगा देखणा, रुबाबदार व्हावा, आपल्यापेक्षा उंच व्हावा, असे वाटते. म्हणूनच प्रीतमला पाहताच बाई आनंदी होतात. आपल्या सर्व अडचणी दूर सारून त्या प्रीतमच्या लग्नाला हजर राहतात. बाई आता त्याच्या शाळेतल्या शिक्षिका राहत नाहीत. त्या मनोमन त्याची आई बनतात.
  
दुसऱ्या बाजूने पाहिले, तर प्रीतम बाईंचा मुलगा असल्याचे सुख अनुभवत असतो. तो त्यांना आई-बाबांच्या आसनावर बसवतो. “गेल्या जन्मी मी नक्कीच तुमचा मुलगा होतो,” असे म्हणतो. त्या आपल्या एकुलत्या एक कुटुंबीय आहेत, असे पत्नीला सांगतो. एखादया आईने आपल्या मुलाला घडवावे, तसे बाईंनी आपल्याला घडवले असे तो मानतो. आपल्याला मुलगा मिळाला, असे बाईंना वाटते; तर, आपल्याला आई मिळाली, असे प्रीतमला वाटते. दोघांनाही साफल्याचा आनंद मिळतो. आपण कृतार्थ झालो, असे दोघांनाही वाटते. हा भाव दोघांमधील नात्यातून संपूर्ण उताऱ्यात भरून राहिला आहे.
भाषाभ्यास:
(अ) व्याकरण घटकांवर आधारित कृती :
1. समास:
   प्रश्न 1.
   
   तक्ता पू+
   
   उत्तर:
  
| सामासिक शब्द | विग्रह | समास | 
| 1. दाणापाणी | दाणा, पाणी वगैरे | समाहार द्ववंद्ववं | 
| 2. सत्यासत्य | सत्य किंवा असत्य | वैकल्पिक द्ववंद्ववं | 
| 3. महोत्सव | महान असा उत्सव | कर्मधारय | 
| 4. दशदिशा | दहा दिशांचा समूह | द्विगू | 
2. शब्दसिद्धी:
   प्रश्न 1.
   
   चार अभ्यस्त शब्द लिहा.
   
   उत्तर:
  
- कामधंदा
- पाऊसपाणी
- वारंवार
- मधेमधे.
    
  
(आ) भाषिक घटकांवर आधारित कृती:
1. शब्दसंपत्ती:
   प्रश्न 1.
   
   एकवचन लिहा:
  
- बांगड्या
- साड्या
- धागे
- टाळ्या.
उत्तर:
- बांगड्या – बांगडी
- साड्या – साडी
- धागे – धागा
- टाळ्या – टाळी.
   प्रश्न 2.
   
   विरुद्धार्थी शब्द लिहा:
  
- खाली
- सुगंध
- सावकाश
- नापास.
उत्तर:
- खाली × वर
- सुगंध × दुर्गंध
- सावकाश × जलद
- नापास × पास.
2. लेखननियम:
   प्रश्न 1.
   
   अचूक शब्द निवडा:
   
   उत्तर:
   
   1. दृष्टीक्षेप, दृष्टिक्षेप, द्रुष्टीक्षेप, दृश्टिक्षेप. – दृष्टिक्षेप
   
   2. सरहद्द, सराहद्द, सरहद, सारहद्द. – सरहद्द
  
    
  
3. विरामचिन्हे:
   प्रश्न 1.
   
   पुढील वाक्यात योग्य विरामचिन्हे घालून वाक्य पुन्हा लिहा:
   
   तो म्हणाला बाई तुम्ही येणार म्हणून मला खात्री होती
   
   उत्तर:
   
   तो म्हणाला, “बाई, तुम्ही येणार म्हणून मला खात्री होती.”
  
4. पारिभाषिक शब्द:
   प्रश्न 1.
   
   योग्य पर्याय निवडा:
   
   Honorable.
   
   (अ) आदरणीय
   
   (आ) माननीय
   
   (इ) वंदनीय
   
   (ई) प्रार्थनीय.
   
   उत्तर:
   
   माननीय.
  
प्रीतम Summary in Marathi
प्रस्तावना:
माधुरी शानभाग यांनी विविध प्रकारचे लेखन केले आहे. त्यात विज्ञानकथांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. मुलांमध्ये, तरुणांमध्ये विज्ञानाचा प्रसार व्हावा, म्हणून त्यांनी विज्ञानकथा लिहिल्या. प्रस्तुत पाठात प्रीतम नावाच्या मुलाची कथा आली आहे. त्या मुलाला आईवडिलांचे प्रेमळ छत्र लाभले नाही.
त्यातच, त्याला सतत बदलत्या वातावरणात राहावे लागले. याचा त्याच्या मनावर विपरीत परिणाम झाला. मनाचा कोंडमारा झालेल्या स्थितीत तो जगत राहिला. दरम्यान त्याला शाळेतल्या बाई भेटल्या. त्यांनी त्याला वात्सल्याची ऊब दिली. त्यामुळे त्याचे आयुष्य पूर्णपणे बदलले. तो एक कर्तबगार माणूस बनला. समाधानी आयुष्य जगू लागला. या संपूर्ण जीवनप्रवासाचे हृदयस्पर्शी चित्रण या कथेत आले आहे.
    
  
शब्दार्थ:
- रया – तेज.
- केळवण – लग्न होण्यापूर्वी नियोजित वधूवरांना त्यांचे नातेवाईक देतात ती मेजवानी.
- दटावणे – दरडावणे, भीती घालणे.
- टेलिपथी – जिव्हाळ्याच्या दोन व्यक्तींना एकाच वेळी मध्ये कोणतीही संपर्क व्यवस्था नसूनही एकच विचार सुचणे.
- एकलकोंडा – कोणाशीही न मिसळणारा.
- घुमा – बाहेरून शांत वाटणारा पण आतून धुसफुसणारा.
वाक्प्रचार व त्यांचे अर्थ:
- रया जाणे – तेज जाणे, मूळ रुबाब जाणे.
- खांदे पाडणे – निराश, दीनवाणा होणे.
- टाकून बोलणे – मनाला दुःख होईल असे अपमानकारक बोलणे.
- भडाभडा बोलणे – मनात साचलेले संधी मिळताच भराभर बोलून टाकणे.
- अंग चोरून घेणे – अंग आक्रसून घेणे.