Ashi Pustak Class 11 Marathi Chapter 3 Question Answer Maharashtra Board

Balbharti Maharashtra State Board Marathi Yuvakbharati 11th Digest Chapter 3 अशी पुस्तकं Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

11th Marathi Chapter 3 Exercise Question Answer Maharashtra Board

अशी पुस्तकं 11 वी मराठी स्वाध्याय प्रश्नांची उत्तरे

11th Marathi Digest Chapter 3 अशी पुस्तकं Textbook Questions and Answers

कृती

1. अ. तुलना करा.

प्रश्न 1.
Maharashtra-Board-Class-11-Marathi-Yuvakbharati-Solutions-Chapter-3-अशी-पुस्तकं-1
उत्तर :

‘पुस्तकरूपी’ मित्र ‘मानवी’ मित्र
उत्तेजक, आनंददायी मित्र दुरावतात.
प्रेम, भावना, विचारांनी ओसंडणारं मित्रांना कधी कधी प्रेमाची विस्मृती होते.
विशाल अंत:करण, निःस्वार्थीपणा वैर, स्वार्थीपणा या भावनेत अडकतात.
उत्कट अनुभूती देणारे विश्वासघातकी असतात.

Maharashtra-Board-Solutions

आ. कारणे लिहा.

प्रश्न अ.
ग्रंथप्रेमीने पुस्तक देताना केलेल्या सूचना लेखकाला अपमानकारक वाटल्या नाहीत, कारण……….
उत्तर :
लेखक हा ग्रंथप्रेमी वाचकाप्रमाणे पुस्तकांवर मनापासून प्रेम करणारा आहे. त्यामुळे पुस्तकांची हेळसांड करणारे, पुस्तकांकडे व्यवहारी दृष्टीने पाहणारे लोक यांच्याविषयी लेखकालाही चीड आहे. तोही ग्रंथप्रेमी वाचकाप्रमाणे गंथांना आपल्या कपाटात जिवापाड जपून ठेवतो. म्हणून ग्रंथप्रेमीने पुस्तक देताना केलेल्या सूचना लेखकाला अपमानकारक वाटल्या नाहीत.

प्रश्न आ.
प्रत्यक्ष परमेश्वर आला तरी त्याला पुस्तक दयायचं नाही असा पुस्तकप्रेमीने निश्चय केला कारण …
उत्तर :
पुस्तक प्रेमीने अतिशय प्रेमाने, जिवापाड जपलेली दोन कवितेची पुस्तकं एका कवीला वाचण्यासाठी दिली. पण पंधरा दिवस झाले तरी त्याने ती पुस्तके परत केली नाहीत. उलट मी ती पुस्तके नेलीच नाहीत. असा कांगावा त्याने केला. या कटू अनुभवामुळे प्रत्यक्ष परमेश्वर आला तरी त्याला पुस्तक दयायचं नाही असा निश्चय पुस्तकप्रेमीने केला.

प्रश्न इ.
रसिकतेचा आणि वयाचा संबंध जोडणं हेच अरसिकपणाचं आहेट कारण…..
उत्तर :
रसिकता ही एक वृत्ती आहे. त्यामुळे तिचं अस्तित्व हे वयावर नव्हे तर मनावर अवलंबून असते. कलात्मक-आशयामधून साहित्य आपल्याला समृद्ध करतं. आपल्या जाणिवा त्यामुळे विस्तारतात, वैचारिक क्षमता वाढतात. रसमय पुस्तकांमुळे चित्तवृत्ती प्रसन्न होतात. या सर्व भावनेचा अनुभव घेऊन आपली रसिकवृत्ती अधिक बहरते. पुस्तके माणसाला कलात्मक आनंद देतात. माणसाच्या मनाला ताजेतवाने करतात. हा अनुभव कोणत्याही वयात घेता येतो. कारण वाचन संस्कृती ही कालातीत आहे. तिला वेळ-काळ-स्थळ-वय यांचे बंधन नाही म्हणूनच रसिकतेचा आणि वयाचा संबंध जोडणं हेच अरसिक आहे.

इ. कृती करा.

प्रश्न 1.
Maharashtra-Board-Class-11-Marathi-Yuvakbharati-Solutions-Chapter-3-अशी-पुस्तकं-2
उत्तर :
Maharashtra-Board-Class-11-Marathi-Yuvakbharati-Solutions-Chapter-3-अशी-पुस्तकं-5

प्रश्न 2.
Maharashtra-Board-Class-11-Marathi-Yuvakbharati-Solutions-Chapter-3-अशी-पुस्तकं-3
उत्तर :
Maharashtra-Board-Class-11-Marathi-Yuvakbharati-Solutions-Chapter-3-अशी-पुस्तकं-6

2. अर्थ स्पष्ट करा.

प्रश्न अ.
दुधाने तोंड पोळल्याने ताक कुंकून पिणे
उत्तर :
दुधाने तोंड पोळल्याने ताक कुंकून पिणे – एका वाईट अनुभवामुळे दुसऱ्या तशाच प्रकारच्या अनुभवाला सामोरे जाताना, प्रत्येक बाबतीत सावधगिरी बाळगणे.

Maharashtra-Board-Solutions

प्रश्न आ.
पुस्तकाला माहेरी आल्यासारखं वाटणे .
उत्तर :
पुस्तकाला माहेरी आल्यासारखं वाटणे – आईच्या घरी आल्यासारखे वाटणे.

3. व्याकरण :

अ. सूचनेनुसार सोडवा.

प्रश्न 1.
‘चवदार’ सारखे शब्द लिहा. …………… ………… …………….. …………..
उत्तर :
धारदार, फौजदार, डौलदार, लज्जतदार

प्रश्न 2.
जसे विफलताचे वैफल्य, तसे –
अ. सफलता → ……….
आ. कुशलता → ……….
इ. निपुणता → ……….
उत्तर :
अ. सफलता → साफल्य
आ. कुशलता → कौशल्य
इ. निपुणता → नैपुण्य

आ. शब्दाच्या शेवटी ‘क’ असलेले चार शब्द लिहा. उदा. ‘उत्तेजक’

प्रश्न आ.
शब्दाच्या शेवटी ‘क’ असलेले चार शब्द लिहा. उदा. ‘उत्तेजक’
……… ……….. ……… ……….. ………..
उत्तर:
प्रोत्साहक, मारक, प्रायोजक, आयोजक, समन्वयक

Maharashtra-Board-Solutions

इ. या शब्दगटातील विशेषणे ओळखा.

प्रश्न 1.
या शब्दगटातील विशेषणे ओळखा.
Maharashtra-Board-Class-11-Marathi-Yuvakbharati-Solutions-Chapter-3-अशी-पुस्तकं-4
उत्तर:
Maharashtra-Board-Class-11-Marathi-Yuvakbharati-Solutions-Chapter-3-अशी-पुस्तकं-7

4. स्वमत :

प्रश्न अ.
वैचारिक साहित्यातून मिळणारे वैशिष्ट्यपूर्ण अनुभव स्वभाषेत लिहा.
उत्तर:
‘अशी पुस्तकं’ या पाठाद्वारे लेखक डॉ. निर्मलकुमार फडकुले यांनी माणसाच्या जडणघडणीत पुस्तकांची भूमिका महत्त्वपूर्ण असते असे सांगितले आहे. पुस्तकांचे महत्त्व वर्णन करताना वैचारिक साहित्य हे मानवी मनाला नेहमी प्रेरणा देते असा व्यापक दृष्टिकोन लेखकाने येथे व्यक्त केला आहे. वैचारिक साहित्यातून मिळणारे अनुभव हे वैशिष्ट्यपूर्ण आणि प्रेरणादायी असतात. माणसाला जगण्याचे बळ देतात. मानवी जीवन आनंदी व अर्थपूर्ण कसं असावं हे पुस्तकं सांगतात.

वैचारिक साहित्याद्वारे विविध मूल्यांची शिकवण माणसाला मिळते. माणुसकी, न्याय, प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्याची वृत्ती, समता, बंधुता, सहृदयता अशा विविध मूल्यांची शिकवण वैचारिक साहित्यामुळे माणसाला मिळते. माणसाचे मन व्यापक व उदार बनवण्यात वैचारिक साहित्याचा फार मोठा वाटा असतो, वैचारिक साहित्य हे प्रबोधनपर व मार्गदर्शनपर असते. वैचारिक साहित्यामुळे विचारांची पायाभरणी मजबूत होते. एकूणच मानवी जीवन अर्थपूर्ण, समृद्ध करण्यास वैचारिक साहित्य सहकार्य करते.

प्रश्न आ.
पुस्तकांविषयीचा लेखकाचा दृष्टिकोन तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तर :
‘अशी पुस्तक’ या पाठातून डॉ. निर्मलकुमार फडकुले यांनी माणसाच्या जडणघडणीत पुस्तकांची भूमिका महत्त्वपूर्ण आहे असे सांगितले आहे. पुस्तक वाचनाचा व्यापक दृष्टिकोन लेखकाने व्यक्त केला आहे. पुस्तके ही माणसाची जगण्याची हिंमत वाढवतात. प्रेरणा देतात. पुस्तके ही मानवी जीवन आनंदी व अर्थपूर्ण करतात.

जगातील सर्वांत सुंदर वस्तू म्हणजे पुस्तक असा व्यापक दृष्टिकोन लेखकाचा आहे. आपल्याजवळ जे काही चांगलं आहे ते सगळं देण्याची वृत्ती पुस्तकांची असते. पुस्तके माणसाला भरभरून प्रेम देतात. लेखकाची पुस्तकांवर आत्यंतिक निष्ठा आहे. लेखकाच्या मते पुस्तके ही माणसाला जन्मभर भावनिक सोबत करतात, मनाला धीर देतात. जीवनाला नवचैतन्य देतात.

लेखकाच्या मते कोणतेही साहित्य हे नवे जुने नसते. पुस्तके ही नेहमी मनाला मंत्रमुग्ध करणारी, हसवणारी, रडवणारी, अंतरंगाला भिडणारी असतात, जगण्याचा अर्थ पुस्तकं सांगतात. एकूणच पुस्तकांचे महत्त्व वर्णन करताना पुस्तकांविषयीचा व्यापक दृष्टिकोन लेखकाने व्यक्त केला आहे.

Maharashtra-Board-Solutions

प्रश्न इ.
हेमिंग्वेचा जीवनविषयक दृष्टिकोन तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
उत्तर :
क्रूर नियती व दुर्बल परंतु महत्त्वाकांक्षी माणूस यांच्यामध्ये कधीही न संपणारे युद्ध वर्षानुवर्षे चालत आलेले आहे. जीवन एक संघर्ष आहे. नियती क्रूर आहे असं आपण अनेकवेळा म्हणतो ते अगदी खरं आहे. आज जगण्या-मरण्याचा खेळ अखंड चाललेला आहे. स्पर्धा प्रचंड वाढलेली आहे. मरणाच्या, संकटाच्या जाळ्यात आपण सापडायचं नाही. नियतीनं जाळ टाकलं तरी ते आपण तोडून, फेकून दयायचं आणि जीवनाच्या अथांग सागरात स्वैर संचार करायचा.

परिस्थितीशी झुंज देत आयुष्याचा आनंदाने उपभोग घ्यायचा असं प्रत्येकाला वाटतं पण घडतं वेगळंच, कारण निष्ठुर नियती आड येते. पण निष्ठुर नियती त्याला हुलकावण्या देत असली तरी, त्याच्या मार्गात अनेक संकटे, अडचणी निर्माण करत असली तरी एक क्षण असा येणार आहे की, दुर्बल वाटणारा माणूस नियतीचा पराभव करून विजयाच्या दिशेने घोडदौड करणार आहे. कारण दुर्दम्य विश्वास, आशा व संघर्ष करण्याची तयारी यांच्या बळावर माणूस नियतीशी कायमच लढत आला आहे.

अभिव्यक्ती :

प्रश्न अ.
उत्तम साहित्यकृती आपल्याला जन्मभर भावनिक सोबत करतात. हे विधान सोदाहरण स्पष्ट करा.
उत्तर :
‘अशी पुस्तकं’ या पाठातून लेखक डॉ.निर्मलकुमार फडकुले यांनी माणसाच्या जडणघडणीत पुस्तकांची भूमिका महत्त्वपूर्ण असुन उत्तम साहित्यकृती आपल्याला जन्मभर भावनिक सोबत करतात. अशी व्यापक भूमिका मांडली आहे. महात्मा गांधीजींची आत्मकथा, व्हिक्टर ह्यूगो आणि मून्शी प्रेमचंदांची कादंबरी, रवींद्रनाथ टागोरांची ‘गार्डनर’ व ‘गीतांजली’, शेक्सपिअरची नाटकं ‘संत तुकारामांचे अभंग’, ‘संस्कृत महाकवी’ कालिदासाचे मेघदूत, टॉलस्टॉपची ‘अॅना करनिना,’ जी.ए. कुलकर्णी यांच्या कथा, हेमिंग्वेचं ‘द ओल्ड मॅन अँड द सी’ अशा विविध प्रकारांच्या रसमय साहित्याशी माणसाचे नाते जोडले जाते. उत्तम साहित्य वाचनाने माणसांचा एकाकीपणा दूर होतो.

पुस्तकांच्या जगात शिरले की मनावरचे मळभ दूर होते. आयुष्यात आलेल्या दुःखमय प्रसंगात दुःखी, निराश विचार दूर करण्याचे तसेच मनातील अंधार दूर करून चैतन्य निर्माण करण्याचे काम पुस्तके करतात. पु.ल.देशपांडे यांच्या अनेक पुस्तकांनी वाचकांच्या मनावरील ताणतणाव कमी करून दुःख विसरायला लावून आपले आयुष्य हसरे केले आहे.

Maharashtra-Board-Solutions

प्रश्न आ.
निष्ठावंत वाचक आता दुर्मिळ झाले आहेत. हे विधान स्पष्ट करा.
उत्तर :
‘अशी पुस्तकं’ या पाठाद्वारे डॉ.निर्मलकुमार फडकुले यांनी पुस्तकांचे महत्त्व वर्णन करण्याबरोबर पुस्तक वाचनाचा व्यापक दृष्टिकोनही सांगितला आहे. लेखकाच्या मते जगातील सर्वात सुंदर वस्तू म्हणजे पुस्तकांवर आत्यंतिक प्रेम करणारी माणसं या जगात आहेत. पुस्तकांवर उदंड प्रेम करणारी माणसं दुसऱ्याला पुस्तकं देताना चिंतीत होतात.

पुस्तकांची हेळसांड करणारी, पुस्तकांकडे व्यवहारी दृष्टीने पाहणाऱ्या माणसांचा पुस्तकप्रेमी लोकांना राग येतो, पुस्तकप्रेमी माणसे पुस्तकांवर आपल्या अपत्याप्रमाणे (मुलांप्रमाणे) प्रेम करतात. अशा पुस्तक प्रेमी लोकांना वाचायला भरपूर ग्रंथ असले तर त्यांना जन्मठेपेची शिक्षासुद्धा आनंदमय वाटते, पुस्तकं नसतील तर राजवाडासुद्धा स्मशानासारखा वाटतो. अनेक प्रसिद्ध लेखकांची नावेही आजच्या तरुण पिढीला माहीत नाहीत. एकूणच पुस्तकांवर स्वतःच्या जीवापेक्षा उदंड प्रेम करणारे पुस्तकांवर निष्ठा, श्रद्धा असणारे वाचक आता फारच कमी होत चालले आहेत अशी खंत लेखकाने व्यक्त केली आहे.

शब्दसंपत्ती :

पुढील शब्दसमूहासाठी एक शब्द लिहा.

प्रश्न अ.
पंधरा दिवसांनी प्रकाशित होणारे : ………..
उत्तर:
पाक्षिक

प्रश्न आ.
ज्याला एकही शत्रू नाही असा : ………
उत्तर:
अजातशत्रु

प्रश्न इ.
मंदिराचा आतील भाग : ……….
उत्तर:
गाभारा

Maharashtra-Board-Solutions

प्रश्न ई.
गुडघ्यापर्यंत हात लांब असणारा : ………….
उत्तर:
आजानुबाहु

प्रश्न उ.
केलेले उपकार न जाणणारा : ……….
उत्तर:
कृतघ्न

प्रकल्प.

प्रश्न 1.
जी. ए. कुलकर्णी, भा. द. खेर, दुर्गा भागवत, व्यंकटेश माडगूळकर या साहित्यिकांची माहिती व यासंबंधीचे संदर्भसाहित्य वाङ्मय कोशातून शोधून लिहा.

11th Marathi Book Answers Chapter 3 अशी पुस्तकं Additional Important Questions and Answers

खालील पठित गदय उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सुचनेनुसार कृती करा.

खालील कृती सोडवा.

प्रश्न 1.
Maharashtra-Board-Class-11-Marathi-Yuvakbharati-Solutions-Chapter-3-अशी-पुस्तकं-8
उत्तर:
Maharashtra-Board-Class-11-Marathi-Yuvakbharati-Solutions-Chapter-3-अशी-पुस्तकं-9

प्रश्न 2.
Maharashtra-Board-Class-11-Marathi-Yuvakbharati-Solutions-Chapter-3-अशी-पुस्तकं-10
उत्तर:
Maharashtra-Board-Class-11-Marathi-Yuvakbharati-Solutions-Chapter-3-अशी-पुस्तकं-11

प्रश्न 3.
Maharashtra-Board-Class-11-Marathi-Yuvakbharati-Solutions-Chapter-3-अशी-पुस्तकं-12
उत्तर:
Maharashtra-Board-Class-11-Marathi-Yuvakbharati-Solutions-Chapter-3-अशी-पुस्तकं-13

चौकट पूर्ण करा.

प्रश्न 1.
Maharashtra-Board-Class-11-Marathi-Yuvakbharati-Solutions-Chapter-3-अशी-पुस्तकं-14
उत्तर:
Maharashtra-Board-Class-11-Marathi-Yuvakbharati-Solutions-Chapter-3-अशी-पुस्तकं-15

परिणाम लिहा.

प्रश्न 1
Maharashtra-Board-Class-11-Marathi-Yuvakbharati-Solutions-Chapter-3-अशी-पुस्तकं-16
उत्तर :
पुस्तकांना स्पर्श केला की आपले अंत:करण विचारांनी आणि भावनांनी ओसंडून जाते.

उपयोजित कृती

खालील पठित गदध उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सुचनेनुसार कृती करा.

प्रश्न अ.
‘काळजीपूर्वक’ या शब्दापासून चार शब्द तयार करा.
उत्तर :

  • काळ
  • पूर्व
  • कळ
  • काक

प्रश्न आ.
‘अंतरंग’ या शब्दापासून चार शब्द तयार करा.
उत्तर :

  • अंत
  • रंग
  • तरंग
  • गत

Maharashtra-Board-Solutions

प्रश्न इ.
‘विश्वासघातकी’ या शब्दापासून चार शब्द तयार करा.
उत्तर :

  • विश्वास
  • श्वास
  • घात
  • घास

खालील वाक्यातील विशेषण ओळखा.

प्रश्न 1.
आत्यंतिक प्रेम करणारी माणस मी पाहिली आहेत.
उत्तर :
आत्यंतिक.

खालील शब्दासाठी योग्य समानार्थी शब्दांचा पर्याय निवडा.

प्रश्न 1.
वैर – शत्रुत्व, क्रूर, अपमान, विरस
उत्तर :
शत्रुत्व.

गटात न बसणारा शब्द ओळखा.

प्रश्न 1.
अंतरंग, मन, चित्त, अर्थ
उत्तर :
अर्थ

प्रश्न 2.
विस्मृती, विसर, विस्मरण, स्मरण
उत्तर :
स्मरण

Maharashtra-Board-Solutions

स्वमत :

प्रश्न 1.
माणसाच्या जडणघडणीत असलेल्या पुस्तकाची भूमिका तुमच्या शब्दात व्यक्त करा.
उत्तर :
‘वाचाल तर वाचाल’ ही उक्ती जुनी असली तरी त्या उक्तीचे महत्त्व आताच्या जमान्यातही तसूभर कमी झालेले नाही. कारण माणसाचा सर्वागीण विकास होण्यासाठी पुस्तकांचे महत्व अनन्यसाधारण आहे. वाचनाची आवड लहानपणीच मुलांमध्ये रुजवली तर मुलांमध्ये वाचनाची गोडी निर्माण होते. त्यांची विचारप्रवृत्ती वाढते. आकलन व स्मरणशक्ती दोन्हीचा विकास होतो.

आत्मविश्वास वाढतो. जिद्दीने काम करण्याची नवी प्रेरणा मिळते. वाचनाचा छंद जोपासल्याने आपल्याला मानसिक समाधान मिळते. पुस्तकातील समृद्ध विचार आपल्याला जीवनाकडे सकारात्मकतेने बघण्याची दृष्टी देतात, किमान साक्षरता समाजात नसेल तर जनजागृतीचा प्रयत्न फसतो. ज्या समाजात निरक्षर व्यक्ती अधिक असतात त्या समाजात गुन्हेगारी, दंगली वाढीस लागतात. वाचनकौशल्यात मागे असणारे लोक बऱ्याच वेळा बेकार राहतात व गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळतात.

लोकशाहीच्या यशस्वीतेसाठी वाचन-लेखन इ.गोष्टी नागरिकांना येणे फार गरजेचे आहे. वाचन दुर्बलता किशोरवयीन मुलांच्या विकासावर परिणाम करते. वाचनाअभावी भावनिक दुर्बलता निर्माण होते. अशी बालके ‘माणूस’ म्हणून संवेदनशीलता वाचनाअभावी हरवून बसतात. थोडक्यात पुस्तके वाचण्याचे व्यक्तिगत व सामाजिक असे दोन्ही फायदे आहेत. उत्तम प्रशासक, उत्तम शिक्षक, कार्यक्षम, सुसंस्कारीत भावी पिढी ही वाचनातूनच तयार होते.

संवेदनशील मनाच्या वाढीसाठी हे विचार कारणीभूत ठरतात, त्यामुळे इतरांचा आपण माणूस म्हणून विचार करायला लागतो, चांगले संस्कार होण्यासाठी, समाजाबाबत आपली काही कर्तव्ये आहेत याचे भान येण्यासाठी पुस्तकांची भूमिका मोलाची ठरते, माणुसकी, समता, न्याय, बंधुत्व, सहृदयता या मूल्यांची शिकवण आपल्याला पस्तकामुळे मिळते. कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळवण्यासाठी वाचन करून नवीन ज्ञान व माहिती आत्मसात करणे गरजेचे आहे. अशा त-हेने माणसाच्या जडाघडणीत पुस्तकांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे.

सुखदुःखाच्या प्रसंगी पुस्तकांमुळे आपल्या मनावरील ताण कमी होतो. पुस्तके जगण्याची हिंमत वाढवितात.

Maharashtra-Board-Solutions

प्रश्न 2.
‘माझी पुस्तक हीच माझी अपत्यं’ हे विधान स्पष्ट करा.
उत्तर :
डॉ. निर्मलकुमार फडकुले यांनी माणसांच्या जडणघडणीत पुस्तकांची महत्त्वपूर्ण भूमिका असते हे सांगितले आहे. पुस्तके ही माणसाला जन्मभर सोबत करतात. एका ग्रंथप्रेमी वाचकाने ‘माझी पुस्तकं हीच माझी अपत्यं आहेत’ अशी प्रतिक्रिया लेखकाजवळ व्यक्त केली. ग्रंथप्रेमीचे पुस्तकांवर अतिशय प्रेम होते. आपल्याकडे असणाऱ्या पुस्तकांना त्याने जिवापाड सांभाळले होते. आपण आपल्या अपत्यावर जिवापाड प्रेम करतो. त्यांचा सांभाळ करतो.

त्याला काही दुखल-खुपलं तर आपण व्याकुळ होतो तसेच ग्रंथप्रेमी वाचक आपले जिवापाड जपून ठेवलेले पुस्तक लेखकाला देताना व्याकुळ झाला होता. लेखकाला पुस्तक देण्याआधी ग्रंथप्रेमीने अनेक सूचना केल्या. पुस्तक काळजीपूर्वक वापरा, त्याची पाने दुमडू नका, पुस्तकावरचं कव्हर काढू नका. पुस्तकांशी निर्दयी चाळा करू नका. अशा अनेक सूचना केल्या. कारण त्याचं त्याच्या पुस्तकांवर मुलांप्रमाणेच प्रेम होतं. या आधी एका व्यक्तीला दिलेलं पुस्तक त्यांच्याकडे परत आले नव्हते. प्रत्येक व्यक्तीला आपली मुले म्हणजे सर्वस्व असते त्याना कोणताही त्रास होऊ नये म्हणून तो खूप काळजी घेत असतो.

तेवढेच प्रेम ग्रंथप्रेमीचे पुस्तकांवर होते. आपली मुले आपल्याबरोबर असली की आपण नेहमीच आनंदी असतो आणि ती आपल्या सोबत नसतील तर आपले कोठल्याही गोष्टीत लक्ष लागत नाही. तेवढ्याच उत्कटतेने ग्रंथप्रेमी आपल्या पुस्तकांशी आपुलकीने वागतो म्हणून तो म्हणतो माझी पुस्तकं हीच माझी अपत्यं.

स्वाध्यायासाठी कृती

  • तुमच्या व्यक्तिमत्वावर प्रभाव टाकणाऱ्या पुस्तकाविषयी तुमचे मत मांडा.
  • ‘वाचाल तर वाचाल’ याविषयी तुमचे विचार व्यक्त करा.
  • ‘जगातील सौंदर्यपूर्ण वस्तू म्हणजे पुस्तक’ यातील व्यापक दृष्टिकोन तुमच्या शब्दात व्यक्त करा.
  • तुम्हाला आवडलेल्या एखादया पुस्तकाविषयी 10 ते 12 ओळीत माहिती लिहा.

अशी पुस्तकं Summary in Marathi

प्रस्तावना :

मराठी संत साहित्याचे अभ्यासक, समीक्षक, संपादक व वक्ते म्हणून डॉ. निर्मलकुमार फडके प्रसिद्ध आहेत. ललित लेखन आणि संतसाहित्याच्या लेखनाबरोबरच त्यांची ‘आस्वाद समीक्षा’ साहित्य जगतात कौतुकास पात्र ठरली होती. त्यांनी लिहिलेली अनेक स्वतंत्र व संपादित पुस्तके प्रसिद्ध आहेत. ‘कल्लोळ अमृताचे’, ‘चिंतनाच्या वाटा’, ‘प्रिय आणि अप्रिय’, ‘सुखाचा परिमळ’ अशी ही विविध साहित्यसंपदा आहे.

‘संतकवी तुकाराम : एक चिंतन’, ‘संत चोखामेळा आणि समकालीन संतांच्या रचना’, ‘संतांचिया भेटी’, ‘संत वीणेचा झंकार’, ‘संत तुकारामांचा जीवनविचार’ ही संत साहित्याचा अभ्यास मांडणारी पुस्तके तसेच ‘समाजपरिवर्तनाची चळवळ : काल आणि आज’, ‘साहित्यातील प्रकाशधारा’ हे लेखसंग आहेत. डॉ. निर्मलकुमार फडकुले यांचा संतसाहित्य हा विशेष आस्थेचा विषय होता.

‘प्रबोधनातील पाऊलखुणा’ आणि ‘निवडक लोकहितवादी’ या संपादित पुस्तकातून एकोणिसाव्या शतकातील सुधारणाविषयक चळवळीसंबंधीचा त्यांचा व्यासंग दिसून येतो. या त्यांच्या साहित्य सेवेबद्दल ‘भैरू रतन दमाणी’ या साहित्य पुरस्काराने त्यांना सन्मानित केले आहे. तसेच नाशिक येथे झालेल्या अस्मितादर्श साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. गंभीरता, अंतर्मुखता, चिंतनशीलता हे त्यांच्या साहित्याचे लेखनविशेष आहेत.

Maharashtra-Board-Solutions

पाठाचा परिचय :

माणसाच्या जडणघडणीत असलेली पुस्तकांची भूमिका प्रस्तुत पाठात मांडली आहे. पुस्तकांचे महत्त्व वर्णन करताना पुस्तक वाचनाचा व्यापक दृष्टिकोन लेखकाने व्यक्त केला आहे. जन्मभर भावनिक सोबत करणारी पुस्तके ही जगण्याची हिंमत वाढवून प्रेरणा देतात. पुस्तके ही मानवी जीवन आनंदी व अर्थपूर्ण करतात, हा विचार व्यक्त करताना लेखकाने ‘जगातील सौंदर्यपूर्ण वस्तू म्हणजे पुस्तक हा व्यापक दृष्टिकोन मांडला आहे.

पुस्तकं आपल्याला जगण्याची हिंमत देतात, पुस्तकं जगण्याचा अर्थ सांगतात. जगण्याला एक सुवासिक स्पर्श देतात. पुस्तके आपल्या व्यक्तिमत्त्वाला आकार देतात. आपल्याला जी पुस्तके विशेषत्वाने आवडतात ती हृदयाच्या कण्यात जपून ठेवायला हवी. मनाची सुदृढ आणि सशक्त वाढ होण्यासाठी पुस्तके वाचावीत. आपल्या जीवनप्रवासात पुस्तकं एक मार्गदर्शक म्हणून उभी राहतात. ग्रंथ हे गुरु आहेत हा विचार या पाठात अधोरेखित झाला आहे.

पुस्तकं आपल्याला झपाटून टाकतात, अंत:करणात भावनांची प्रचंड खळबळ उडवून देण्याची त्यांच्यात शक्ती असते. अशी पुस्तके कधी विसरता येत नाहीत. दीर्घकाळ टिकणाऱ्या सुगंधाप्रमाणे ती पुस्तकं मनात दरवळत राहतात. उत्तम साहित्यकृतीचं वाचन करत राहणं यासारखं दुसरं उत्तेजक आणि आनंददायी काहीही नाही. यावरून लेखकांचे ग्रंथप्रेम दिसून येते.

लेखकांने एकदा एका ग्रंथप्रेमी वाचकाकडून एक पुस्तक आणले होते. ते पुस्तक देताना या ग्रंथप्रेमीने लेखकाला “अतिशय काळजीपूर्वक वापरा, दुसयांच्या हाती देऊ नका, पुस्तकाची पानं मुडपू नका, कोणताही मजकूर पेन्सिलीनं किंवा शाईनं अधोरेखित करू नका, बरचं कव्हर काढू नका, तिसऱ्या दिवशी कटाक्षानं पुस्तक परत करा.” अशा सूचना दिल्या. त्या सूचना लेखकाला अपमानकारक वाटल्या नाहीत कारण त्या अटी खरोखरच अत्यंत सयुक्तिक होत्या, कारण ग्रंथप्रेमी व्यक्ती पुस्तकाला स्वत:ची अपत्ये समजतात. उत्तम साहित्यकृती आपल्याला जन्मभर भावनिक सोबत करतात. मनाला धीर देतात. जीर्ण होत चाललेल्या जीवनशक्तीला चैतन्य प्राप्त करून देतात. मनातल्या अंधाराला स्वप्नं दाखवून मनाला ताजे आणि टवटवीत करतात.

उदा. ‘मेघदूत-कालिदास’, ‘टॉलस्टॉयची अॅना कॅरेनिना’ ही कादंबरी, गांधीजींचे आत्मचरित्र, व्हिक्टर ह्यूगोची आणि मुन्शी प्रेमचंदांची कादंबरी, रवींद्रनाथ टागोरांची ‘गार्डनर’ व ‘गीतांजली’, शेक्सपिअरची नाटकं, संत ज्ञानेश्वर, संत तुकारामांचे अभंग इत्यादी, अर्नेस्ट हेमिंग्वे यांच्या ‘द ओल्ड मॅन अण्ड द सी’ कादंबरीतील एक म्हातारा कोळी देवमाशाची शिकार करण्यासाठी अथांग सागरात पोटात अन्नाचा कण नसताना आपली होडी ढकलतो, देवमाशाला जिंकण्याचे धाडस ठेवून हा काटक म्हातारा होडी वल्हवत कित्येक मैल सागराच्या आत जातो.

त्याच्यात लाटांबरोबर झुजण्याची जिद्द, कणखर आशावाद, आकांक्षा, हटवादी मन, विजयोन्माद असतो. या कादंबरीतून निष्ठुर नियती त्याला हुलकावण्या देत असली तरी एक क्षण असा येणार आहे, की दुर्बल वाटणारा माणूस नियतीला पराभूत करून विजय प्राप्त करणार आहे असे हेमिंग्वेला सुचवायचं आहे. ललित आणि वैचारिक साहित्यातून मिळणारे अनुभव वैशिष्ट्यपूर्ण असून त्यातून नव्या प्रेरणा वाचकाला मिळतात.

Maharashtra-Board-Solutions

समानार्थी शब्द / पर्यायी शब्द :

  1. उत्तेजक – हुरूप आणणारे, प्रोत्साहक – (stimulant)
  2. कोळी – मासेमारी करून निर्वाह करणारा – (a fisherman)
  3. वज़ – इंद्राचे आयुध – (thunderbolt)
  4. विमनस्क – उद्विग्न, खिन्न, गोंधळलेला – (depressed)
  5. प्रेरणा – स्फूर्ती – (inspiration)
  6. विजय – यश – ( victory)
  7. मूर्खहस्ते न दातव्यम एवं वदति पुस्तकम् – पुस्तक म्हणते मला मुर्खाच्या हाती देऊ नका
  8. साहित्य – ग्रंथसंपदा – (literature)
  9. तेज – प्रकाश – (light)
  10. प्रारब्ध / नियती – नशीब – (destiny)
  11. होडी – नाव – (boat)
  12. अपत्य – मुले – (an offspring, child)
  13. माणुसकी – मानवता – (huminity)
  14. शिकार – पारध – (hunt)
  15. किमया – जादू – (magic)
  16. बंडखोर – क्रांतिकारी – (rehel)

वाक्प्रचार व त्यांचे अर्थ :

  1. दुधाने तोंड पोळल्यामुळे ताक कुंकून पिणे – एका वाईट अनुभवामुळे दुसऱ्या तशाच प्रकारच्या अनुभवाला सामोरे जाताना, प्रत्येक बाबतीत सावधगिरी बाळगणे.
  2. खिळवून ठेवणे – मन गुंतवून ठेवणे.
  3. आरोळी ठोकणे – मोठ्याने हाक मारणे.

Maharashtra-Board-Solutions

टिपा :

  1. शेक्सपिअर – सुप्रसिद्ध इंग्रजी कवी, नाटककार, मॅकवेध, किंग लियर ही त्यांची प्रसिद्ध नाटके.
  2. अर्नेस्ट हेमिंग्वे – अमेरिकन साहित्यिक.
  3. व्हिक्टर हयूगो – फ्रेंच कवी, लेखक व नाटककार,
  4. मुन्शी प्रेमचंद – थोर हिंदी कथाकार व कादंबरीकार.
  5. लिओ टॉलस्टॉय – रशियन लेखक.
  6. कवी कालिदास – संस्कृत महाकवी यांची मेघदूत व शाकुंतल नाटके प्रसिद्ध.
  7. जी.ए. कुलकर्णी – एक आधुनिक श्रेष्ठ कथालेखक.
✨ Free AI tutor

Ask the AI tutor about Class 11 Marathi Yuvakbharati Chapter 3

Stuck on a question? Type it, 🎤 speak it or 📷 snap a photo of it and get simple, step-by-step help with “अशी पुस्तकं” — important questions, a quick quiz, revision notes — in English, मराठी or हिंदी.

Sign in with Google to ask the AI tutor. It's free — 20 questions a day, one TalentJR account.

Sign in to ask

How the free AI tutor works →

👩‍🏫 Class 11 Marathi Yuvakbharati classes near you — online or at home

Prefer a real teacher? TalentJR teachers take live online classes anywhere in India and visit homes in selected cities. Tell us what you need and our team will call you with timings and fees.

Live online classesSmall groups or 1:1 with a teacher, from home, any city.
Teacher at homeA TalentJR teacher visits your home (selected cities).
At a centreClasses at a TalentJR partner centre near you, where available.

Keep learning