Indhan Bachat Poem 5th Marathi Question Answer Chapter 11 Maharashtra Board

Std 5 Marathi Lesson 11 इंधनबचत Question Answer Maharashtra Board

Balbharti Maharashtra State Board Class 5 Marathi Solutions Sulabhbharati Chapter 11 इंधनबचत Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

5th Std Marathi Poem Indhan Bachat Question Answer

5th Standard Marathi Digest Chapter 11 इंधनबचत Textbook Questions and Answers

1. एका वाक्यात उत्तरे लिहा.

प्रश्न (अ)
हा संवाद कोठे झाला?
उत्तरः
हा संवाद स्वयंपाकघरात झाला.

Maharashtra-State-Board-Solutions

प्रश्न (आ)
संवादात किती पात्रे आहेत?
उत्तरः
या संवादात दोन पात्रे आहेत.

प्रश्न (इ)
दिनूला कशाचे महत्त्व पटले?
उत्तरः
दिनूच्या इंधन बचतीचे महत्त्व पटले.

2. खालील चित्रे पाहा त्याखालील वाक्ये वाचा. इंधन बचतीचे आणखी मार्ग सांगा.

प्रश्न 1.
खालील चित्रे पाहा त्याखालील वाक्ये वाचा. इंधन बचतीचे आणखी मार्ग सांगा.
Maharashtra-Board-Class-5-Marathi-Solutions-Chapter-11-इंधनबचत-1
Maharashtra-Board-Class-5-Marathi-Solutions-Chapter-11-इंधनबचत-2
उत्तर:
इंधन बचतीचे मार्गः

  1. पाणी तापवण्यासाठी सौरउर्जेचा वापर करा.
  2. बायोगॅसचा इंधन म्हणून वापर करा.
  3. अन्न प्रेशर कुकरमध्ये शिजवा.
  4. जवळपास जायचे असल्यास व घाई नसल्यास कुठल्याही वाहनाने न जाता चालत जा.
  5. भाजी शिजवताना भांड्यावर झाकण ठेवा.
  6. बाहेर जाताना व रात्री झोपताना गॅसच्या सिलिंडरचे बटण बंद करा.

Maharashtra-State-Board-Solutions

3. खालील साधने ओळखा. ही साधने वापरण्यासाठी कोणते इंधन लागते? यांपैकी कोणते साधन वापरल्यामुळे सर्वांत जास्त इंधनबचत होते ते घरी चर्चा करून सांगा.

प्रश्न 1.
खालील साधने ओळखा. ही साधने वापरण्यासाठी कोणते इंधन लागते? यांपैकी कोणते साधन वापरल्यामुळे सर्वांत जास्त इंधनबचत होते ते घरी चर्चा करून सांगा.
Maharashtra-Board-Class-5-Marathi-Solutions-Chapter-11-इंधनबचत-3
उत्तर:
यांपैकी सौरपेटी व बायोगॅस संयंत्र वापरल्यास सर्वात जास्त इंधन बचत होते.

वाचू आणि हसू.

Maharashtra-Board-Class-5-Marathi-Solutions-Chapter-11-इंधनबचत-4
सनी: आई, बाढदिवसाला मी तुला आरसा देणार आहे.
आई: अरे सनी, पण आपल्याकडे आहे ना आरसा!
सनी: अगं आई, तो मघाशीच माझ्याकडून फुटला ना!

Marathi Sulabhbharati Class 5 Solutions Chapter 11 इंधनबचत Additional Important Questions and Answers

प्रश्न 1.
खालील प्रश्नांची उत्तरे एका शब्दात लिहा.

  1. इंधन म्हणजे काय?
  2. इंधनाशिवाय चालणारे दुचाकी वहान कोणते?
  3. पूर्वी आगगाडी कशावर चालत असे?
  4. पूर्वी लोकं जेवण कशावर बनवत असत?
  5. Solar Energy ला मराठीत काय म्हणतात?

उत्तरः

  1. जळण
  2. सायकल
  3. कोळशावर
  4. चुलीवर
  5. सौर उर्जा

Maharashtra-State-Board-Solutions

1. खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा.

प्रश्न 1.
कोणाची आई आजारी होती?
उत्तरः
दिनूची आई आजारी होती.

प्रश्न 2.
दिनू आईसाठी काय बनवत होता?
उत्तरः
दिनू आईसाठी चहा बनवत होता.

प्रश्न 3.
दिनूच्या वर्गमैत्रिणीचे नाव काय होते?
उत्तरः
दिनूच्या वर्गमैत्रिणीचे नाव फातिमा होते.

प्रश्न 4.
फातिमाने कशासाठी नकार दिला?
उत्तरः
फातिमाने चहा घेण्यासाठी नकार दिला.

प्रश्न 5.
योग्य गोष्टींसमोर (✓) अशी खूण व अयोग्य गोष्टींसमोर (✗) अशी खूण करा.
उत्तरः

  1. झाडे तोडणे [✗]
  2. सायकलवरून प्रवास करणे [✓]
  3. कारखान्यातील धूर हवेत सोडणे [✗]
  4. बायोगॅसचा इंधन म्हणून वापर करणे [✓]
  5. पाणी तापवण्यासाठी बंबाचा उपयोग करणे [✓]
  6. अन्न शिजविण्यासाठी सौरचूल वापरू नये [✗]

Maharashtra-State-Board-Solutions

प्रश्न 6.
खालील चित्रे पहा व योग्य जोड्या लावा.
Maharashtra-Board-Class-5-Marathi-Solutions-Chapter-11-इंधनबचत-5
उत्तरः
(1 – क) (2 – ड) (3 – ब) (4 – अ)

थोडक्यात उत्तरे लिहा.

प्रश्न 1.
फातिमाने दिनूला इंधनाची बचत कशी करायला सांगितली?
उत्तरः
एक कप चहासाठी जर मोठ्या पातेल्याऐवजी लहान पातेले घेतले तर पाणी लवकर उकळते आणि गॅसचीही बचत होते, चहाही लवकर होतो, असे म्हणून फातिमाने दिनूला इंधनाची बचत करायला सांगितली.

प्रश्न 2.
तुमची आई घरात इंधनाची बचत कशाप्रकारे करते ते लिहा.
उत्तरः
आई वरण भात करताना प्रेशर कुकरचा वापर करते. भाजी शिजवताना भांड्यावर झाकण ठेवून त्यावर पाणी ठेवते. उगाचच गॅस चालू ठेवत नाही. बाहेर जाताना व रात्री झोपताना गॅसच्या सिलेंडरचे बटण बंद करते.

व्याकरण व भाषाभ्यास:

प्रश्न 1.
समानार्थी शब्द लिहा.

  1. आई
  2. दार
  3. छोटं
  4. पाणी
  5. इंधन
  6. लक्ष

उत्तर:

  1. माता
  2. दरवाजा
  3. लहान
  4. जल
  5. सरपण
  6. ध्यान

Maharashtra-State-Board-Solutions

प्रश्न 2.
विरुद्धार्थी शब्द लिहा.

  1. आजारी
  2. उघड
  3. बिघाड
  4. छोटा
  5. लक्ष

उत्तर:

  1. निरोगी
  2. बंद
  3. दुरुस्ती
  4. मोठा
  5. दुर्लक्ष

प्रश्न 3.
वचन बदला.

  1. स्वयंपाकघर
  2. दार
  3. घर
  4. पातेली

उत्तर:

  1. स्वयंपाकघरे
  2. दारे
  3. घरे
  4. पातेल

प्रश्न 4.
लिंग बदला.

  1. आई
  2. वर्गमैत्रिण
  3. मुलगा

उत्तर:

  1. वडील
  2. वर्गमित्र
  3. मुलगी

इंधनबचत S-ummary in Marathi

पाठ्यपरिचय:

‘इंधन बचत’ या पाठात दिनूची वर्गमैत्रीण फातिमा त्याला इंधनबचतीचे महत्त्व व इंधनाची बचत कशाप्रकारे करायची ते समजावून सांगत आहे.

Maharashtra-State-Board-Solutions

शब्दार्थ:

  1. इंधन – जळण (fuel)
  2. चहा – एक प्रकारचे पेय (tea)
  3. पातेले – लहान आकाराचे भांडे (a small utensil)
  4. आजारी – रुग्ण (sick)
  5. दार – दरवजा (door)
  6. वर्गमैत्रीण – वर्गातील मैत्रीण (a classmate)
  7. घर – सदन (home)
  8. उकळणे – कढवणे (to boil)
  9. समजणे – आकलन (to understand)
  10. लक्षात येणे – समजणे (to realise)
  11. ओतणे – (to pour)
  12. स्वयंपाकघर – स्वयंपाकाची खोली (kitchen)
✨ Free AI tutor

Ask the AI tutor about Class 5 Marathi Chapter 11

Stuck on a question? Type it, 🎤 speak it or 📷 snap a photo of it and get simple, step-by-step help with “इंधनबचत” — important questions, a quick quiz, revision notes — in English, मराठी or हिंदी.

Sign in with Google to ask the AI tutor. It's free — 20 questions a day, one TalentJR account.

Sign in to ask

How the free AI tutor works →

👩‍🏫 Class 5 Marathi classes near you — online or at home

Prefer a real teacher? TalentJR teachers take live online classes anywhere in India and visit homes in selected cities. Tell us what you need and our team will call you with timings and fees.

Live online classesSmall groups or 1:1 with a teacher, from home, any city.
Teacher at homeA TalentJR teacher visits your home (selected cities).
At a centreClasses at a TalentJR partner centre near you, where available.

Keep learning