Patang Poem 5th Hindi Question Answer Chapter 26 Maharashtra Board

Std 5 Hindi Lesson 26 पतंग Question Answer Maharashtra Board

Balbharti Maharashtra State Board Class 5 Marathi Solutions Sulabhbharati Chapter 26 पतंग Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

5th Std Hindi Poem Patang Question Answer

5th Standard Marathi Digest Chapter 26 पतंग Textbook Questions and Answers

1. एका वाक्यात उत्तरे लिहा.

प्रश्न (अ)
सूर्य मावळण्याच्या वेळेस ढगांवर कोणता रंग दिसतो?
उत्तरः
सूर्य मावळण्याच्या वेळेस ढगांवर लाल पिवळसर रंग दिसतो.

Maharashtra-State-Board-Solutions

प्रश्न (आ)
पतंग कोणासारखे तरंगतात?
उत्तर:
आभाळात पंख पसरून उडणाऱ्या पाखरांप्रमाणे पतंग तरंगतात.

2. विरुद्ध अर्थाचे शब्द माहीत करून घ्या. लिहा.

प्रश्न 1.
विरुद्ध अर्थाचे शब्द माहीत करून घ्या. लिहा.
(अ) चढणे
(आ) ओढणे
(इ) मावळणे
(ई) मऊ
(उ) चांगला
(ऊ) भराभर
उत्तर:
(अ) उतरणे
(२) ढकलणे
(इ) उगवणे
(ई) कडक
(उ) वाईट
(ऊ) हळूहळू

3. खालील शब्दांना ‘सर’ शब्द जोडून नवीन शब्द तयार करा व लिहा.

प्रश्न 1.
खालील शब्दांना ‘सर’ शब्द जोडून नवीन शब्द तयार करा.
उदा., पिवळा – पिवळसर.

  1. काळा
  2. निळा
  3. लाल

उत्तर:

  1. काळसर
  2. निळसर
  3. लालसर

Maharashtra-State-Board-Solutions

4. मोकळ्या जागी कवितेतील योग्य शब्द लिहा व या कडव्याचा अर्थ समजून घ्या.

1. जशी ……………… आभाळात,
…………………….. पसरुनी तरंगतात,
दिसतिल तैसे ……………….. रंगित,
खेळ किती …………….!
उत्तर:
1. पाखरे, पंख, पतंग, चांगला

5. तुम्हांला आवडणाऱ्या पाच खेळांची नावे सांगा.

प्रश्न 1.
तुम्हांला आवडणाऱ्या पाच खेळांची नावे सांगा.
उत्तरः

  1. लंगडी
  2. क्रिकेट
  3. खोखो
  4. कबड्डी
  5. फुटबॉल.

6. हे शब्द असेच लिहा.

प्रश्न 1.
हे शब्द असेच लिहा.
झुळझुळ, रीळ, पिवळसर, पतंग, रंगित.

7. खालील शब्द वाचा. असे आणखी शब्द लिहा.

प्रश्न 1.
खालील शब्द वाचा. असे आणखी शब्द लिहा.
(अ) पळापळ, रडारड, पडापड़,
(अ) मऊमऊ, वरवर, कळकळ,
(इ) रडतखडत, हसतखेळत, वाजतगाजत,
उत्तरः
(अ) धडाधड, पटापट
(आ) कटकट, झुळूझुळू, फडफड, सरसर, करकर
(इ) अटकमटक, पडतसडत

8. समान अक्षराने शेवट होणारे कवितेतील शब्द लिहा.

प्रश्न 1.
समान अक्षराने शेवट होणारे कवितेतील शब्द लिहा.
उत्तरः
(अ) मावळतीचा – मजेचा
(अ) रोवूनी – ओढुनि, चढुनी
(इ) बरोबर – भराभर
(ई) आभाळात – तरंगतात

9. गोलातील शब्द जोडून वाक्ये बनवा.

प्रश्न 1.
गोलातील शब्द जोडून वाक्ये बनवा.
उदा., चेंडू झेलणे.
वाक्ये: 1. मी चेंडू झेलतो.
2. शिवानी चेंडू झेलते.
Maharashtra-Board-Class-5-Marathi-Solutions-Chapter-26-पतंग-1
उत्तरः

  1. त्याने चेंडू विकत घेतला.
  2. मी चेंडू विकला.
  3. गणूने चेंडू फेकला.
  4. गणूने चेंडू टाकला.
  5. रामने चेंडू झेलला.
  6. श्यामने चेंडू उचलला.
  7. आम्ही चेंडू उडवला.
  8. त्यांनी चेंडू पकडला.

Maharashtra-State-Board-Solutions

वाचा. लक्षात ठेवा:

घराच्या छतावर उभे राहून पतंग उडवू नका. मोकळ्या मैदानात पतंग उडवा. काटलेला पतंग पकडण्यासाठी रस्त्यावर धावू नका. अवघड ठिकाणी चढू नका.

Marathi Sulabhbharati Class 5 Solutions Chapter 26 पतंग Additional Important Questions and Answers

प्रश्न 1.
एका शब्दात उत्तरे लिहा.

  1. मावळतीचा रंग कशावर आला आहे?
  2. सुरुवात कशी करू?
  3. वाऱ्यावर काय चढवावेत?
  4. वाळू कशी आहे?
  5. झटका कसा देऊ?
  6. पतंगाला कशाची गरज नाही?
  7. आभाळात कोण आहेत?
  8. पतंग कसे आहेत?

उत्तरः

  1. ढगांवर
  2. बरोबर
  3. पतंग
  4. मऊमऊ
  5. दोरा ओढून
  6. पंखांची
  7. पाखरे
  8. रंगीत

एका वाक्यात उत्तरे लिहा.

प्रश्न 1.
नदीकाठचा वारा कसा वाहतो आहे?
उत्तर:
नदीकाठचा वारा झुळझुळ वाहतो आहे.

Maharashtra-State-Board-Solutions

प्रश्न 2.
नदीकाठच्या बाजूला काय आहे?
उत्तर:
नदीकाठच्या बाजूला डोंगरमळा आहे.

प्रश्न 3.
पतंग कोणाला भेटायला जात आहे?
उत्तर:
पतंग ढगांना भेटायला जात आहे.

प्रश्न 4.
पतंगाला कोणती उपमा दिली आहे?
उत्तर:
पतंगाला उडणाऱ्या पाखरांची उपमा दिली आहे.

प्रश्न 5.
‘पतंग’ या कवितेचे कवी कोण आहेत?
उत्तर:
पतंग’ या कवितेचे कवी ‘अ. ज्ञा. पुराणिक’ आहेत.

कविता पूर्ण करा.

प्रश्न 1.
रंग ढगांवर ……………………… डोंगरमळा
उत्तर:
रंग ढगांवर मावळतीचा,
लाल पिवळसर किती मजेचा,
झुळझुळ वारा नदीकाठचा.
बाजुस डोंगरमळा.

प्रश्न 2.
करू चला ……………. भेटायला
उत्तर:
करू चला सुरवात बरोबर,
सोडा सोडा रीळ भराभर,
पतंग चढवा हे वाऱ्यावर
ढगांस भेटायला.

प्रश्न 3.
खालील शब्दांना कवितेत कोणते शब्द आले आहेत ते सांगा.
उत्तरः

  1. आकाश – आभाळ
  2. हवेत उडणे – तरंगणे
  3. मंद वारा – झुळझुळ वारा
  4. सूर्यास्त – मावळती
  5. मित्रांनो – गड्यांनो
  6. पक्षी – पाखरे
  7. त्याला – त्याजला

Maharashtra-State-Board-Solutions

प्रश्न 4.
रिकाम्या जागी कवितेतील योग्य शब्द लिहा.
मउमउ ………………. पाय रोवुनी,
……………………. झटका दोरा ओढुनि,
………………….. जातिल वर वर चढुनी,
पंख नको ………………………………
उत्तर:
वाळुत, देऊ, पतंग, त्याजला

व्याकरण व भाषाभ्यास:

प्रश्न 1.
समानार्थी शब्द लिहा.

  1. ढग
  2. मजा
  3. वारा
  4. नदी
  5. डोंगर
  6. वाळू
  7. पंख
  8. आभाळ
  9. चांगला

उत्तरः

  1. मेघ
  2. मौज
  3. वात, वायू
  4. सरिता
  5. गिरी
  6. रेती
  7. पर
  8. नभ
  9. छान

प्रश्न 2.
विरुद्धार्थी शब्द लिहा.

  1. सुरुवात
  2. बरोबर
  3. वर
  4. रंगीत

उत्तर:

  1. शेवट
  2. चूक
  3. खाली
  4. रंगहीन

Maharashtra-State-Board-Solutions

प्रश्न 3.
खाली एक षट्कोन दिला आहे. षट्कोनाच्या मधोमध एक शब्द दिला आहे व बाहेर त्या शब्दाशी संबंधित क्रियापदे दिली आहेत. त्या क्रियापदाचे योग्य रूप वापरून व गोलातील शब्द वापरून वाक्य बनवा.
Maharashtra-Board-Class-5-Marathi-Solutions-Chapter-26-पतंग-2
उत्तर:

  1. ती कविता लिहिते.
  2. कौस्तुभने कविता सादर केली.
  3. दर्शनने कविता ऐकवली.
  4. सुषीने कविता गायली.
  5. हेमलाने कविता पाठ केली.
  6. अर्चनाला कविता स्फुरली.
  7. गीतने कविता रचली.
  8. आम्ही कविता वाचली.

प्रश्न 4.
‘प’ या अक्षरापासून तयार होणारे शब्द लिहा.
उत्तर:
पतंग, पंगत, परात, पगार, पवन, पक्षी, पर्वत

पतंग Summary in Marathi

पदयपरिचय:

‘पतंग’ या कवितेत पतंग उडवण्याच्या खेळाचे रंजक वर्णन कवीने केले आहे. मुलांना हा खेळ खेळताना आलेला अनुभव कवीने वर्णन केला आहे.

Maharashtra-State-Board-Solutions

शब्दार्थ:

  1. गड्यांनो – मित्रांनो (friends)
  2. मावळती – सूर्य अस्ताला जाणे (sunset)
  3. मजा – मौज (fun)
  4. झुळझुळ – मंदपणे (gently)
  5. डोंगरमळा – डोंगराभोवतीचा सपाट भूप्रदेश (the tract around or along a hill)
  6. ढग – मेघ (clouds)
  7. मऊ – नरम (soft)
  8. रीळ – (roller)
  9. रोवणे – खुपसणे (to plant)
  10. झटका – जोरदार तडाखा (a smart blow)
  11. पाखरे – छोटे पक्षी (a birdie)
  12. वाळू – रेती (sand)
✨ Free AI tutor

Ask the AI tutor about Class 5 Marathi Chapter 26

Stuck on a question? Type it, 🎤 speak it or 📷 snap a photo of it and get simple, step-by-step help with “पतंग” — important questions, a quick quiz, revision notes — in English, मराठी or हिंदी.

Sign in with Google to ask the AI tutor. It's free — 20 questions a day, one TalentJR account.

Sign in to ask

How the free AI tutor works →

👩‍🏫 Class 5 Marathi classes near you — online or at home

Prefer a real teacher? TalentJR teachers take live online classes anywhere in India and visit homes in selected cities. Tell us what you need and our team will call you with timings and fees.

Live online classesSmall groups or 1:1 with a teacher, from home, any city.
Teacher at homeA TalentJR teacher visits your home (selected cities).
At a centreClasses at a TalentJR partner centre near you, where available.

Keep learning