Aapli Samasya Aaple Upay Class 7 Marathi Chapter 7.2 Question Answer Maharashtra Board

Balbharti Maharashtra State Board Class 7 Marathi Solutions Sulabhbharati Chapter 7.2 आपली समस्या आपले उपाय Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Class 7th Marathi Chapter 7.2 आपली समस्या आपले उपाय Question Answer Maharashtra Board

Std 7 Marathi Chapter 7.2 Question Answer

Marathi Sulabhbharti Class 7 Solutions Chapter 7.2 आपली समस्या आपले उपाय Textbook Questions and Answers

1. चित्र पाहा. संवाद वाचा.

Maharashtra-Board-Class-7-Marathi-Solutions-Chapter-7.2-आपली-समस्या-आपले-उपाय-1

  • नीता : आजी हे बघ, नदीतलं पाणी दिसतच नाही.
  • आजी : हो, नदीत जलपर्णी उगवली आहे.
  • नीता : जलपर्णी म्हणजे काय गं आजी?
  • आजी : पाण्यात उगवणारी वनस्पती.
  • नीता : ती पाण्यात का उगवते?
  • आजी : पाणी अशुद्ध, प्रदूषित झालं की उगवते.
  • नीता : आजी, आपल्यामुळेच नदीचं पाणी प्रदूषित झालयं ना!
  • आजी : हो, माणसांच्या वाईट सवयींमुळे नदीची हानी होत आहे. शहराच्या सांडपाण्यातून, रासायनिक खतांचा वापर केलेल्या शेत जमिनीतून झिरपणाऱ्या पाण्यातील किंवा कारखान्याच्या सांडपाण्यातील नायट्रोजन व फॉस्फरस ही द्रव्ये पाण्यात मिसळली की जलपर्णी वाढते. जलपर्णीची वाढ ही खऱ्या अर्थाने जलप्रदूषणाची निदर्शक आहे.
  • नीता : अरेरे! आजी, आता या जलपर्णीचं काय करायचं?
  • आजी : पाणी दूषित होणार नाही याची काळजी घ्यायची.

प्रश्न 1.
नदीचे पाणी कशामुळे प्रदूषित होते?
उत्तर:
शहाराच्या सांडपाण्यामुळे, रासायनिक खतांचा वापर केलेल्या शेतजमिनीतून झिरपणाऱ्या पाण्यामुळे, कारखान्यातील दूषित पाण्यामुळे नदीचे पाणी प्रदूषित होते.

Maharashtra-State-Board-Solutions

प्रश्न 2.
नदीचे पाणी प्रदूषित होऊ नये, म्हणून काय उपाय करता येतील?
उत्तर:
नदीचे पाणी प्रदूषित होऊ नये म्हणून कारखान्यातील पाणी नदीत सोडू नये. तसेच शहरातील सांडपाणी’ नदीत सोडू नये.

प्रश्न 3.
जलपर्णी उगवल्याने पाण्यावर कोणता परिणाम होतो?
उत्तर:
जलपर्णी उगवल्याने पाणी अशुद्ध होते.

प्रश्न 4.
नदीमध्ये जलपर्णी होऊ नये, यासाठी काय करायला हवे, असे तुम्हांला वाटते?
उत्तर:
नदीमध्ये जलपर्णी होऊ नये यासाठी दूषित पाणी नदीमध्ये सोडू नये.

प्रश्न 5.
नदीतले पाणी का दिसत नव्हते?
उत्तर:
नदीतल्या पाण्यात जलपर्णी उगवल्यामुळे नदीचे पाणी दिसत नव्हते.

Maharashtra-State-Board-Solutions

प्रश्न 6.
जलपर्णी म्हणजे काय?
उत्तर:
जलपर्णी म्हणजे पाण्यात उगवणारी वनस्पती.

शब्दार्थ :

1. सांडपाणी – मैला (sewage)

✨ Free AI tutor

Ask the AI tutor about Class 7 Marathi Chapter 7.2

Stuck on a question? Type it, 🎤 speak it or 📷 snap a photo of it and get simple, step-by-step help with “आपली समस्या आपले उपाय – १” — important questions, a quick quiz, revision notes — in English, मराठी or हिंदी.

Sign in with Google to ask the AI tutor. It's free — 20 questions a day, one TalentJR account.

Sign in to ask

How the free AI tutor works →

👩‍🏫 Class 7 Marathi classes near you — online or at home

Prefer a real teacher? TalentJR teachers take live online classes anywhere in India and visit homes in selected cities. Tell us what you need and our team will call you with timings and fees.

Live online classesSmall groups or 1:1 with a teacher, from home, any city.
Teacher at homeA TalentJR teacher visits your home (selected cities).
At a centreClasses at a TalentJR partner centre near you, where available.

Keep learning